सकाळी तुम्ही उठता. मोबाइल हातात घेता. मग स्क्रोलिंग सुरु. तु्म्ही इन्स्टाग्रामवर जाता, तिथे तुम्हाला खूप पदार्थांचे व्हिडिओ दिसतात. एकसेएक सुंदर तुम्हाला तो किंवा ती शेफ आवडते. म्हणून ते रिल्स पाहता. सतत पाहता म्हणून अजून पदार्थांचे रिल्स पाहता. मग तुम्ही आपलं घरचंच जेवण ते सारं पाहतापाहता खाता, मनात म्हणता हे असं मिळायला हवं. किंवा आपण करुन पाहू असंही ठरवता. आता हे सारं नुसतं पाहून वजन वाढेल का? तर नाही पण तरी तुम्हाला सतत खा खा वाटते, खाण्याचं क्रेव्हिंग होतं, काहीतरी चमचमीत खाण्याचे विचार मनात येतात, असं कधी झालंय का?
नाही म्हणाल तुम्ही, पण जगभरात माणसांचं असं होतं आहे. फूड क्रेव्हिंगच्या एका नव्याच समस्येनं जगाला घेरलं आहे. खायला प्यायला भरपूर आहे पण तरी सतत खाण्यापिण्याची चर्चा, तेच पाहणं, ऑर्डर करणं, मग वजन कमी करण्याची चर्चा, मग केस किंवा चेहऱ्याला काहीतरी लावण्याची चर्चा. आणि त्यातून आपलं डोकं मोकळंच होत नाही.
त्यात सोशल मीडियात अनेक फूड ब्लॉगर आपले व्हिडिओ घेऊन येतात. बोलबोलून त्या पदार्थांचं वर्शन करता. मग लगेच आपल्या भागातील हाॅटेल्सच्या जाहिराती दिसतात. आपण रिल सेव्ह करतो, ठरवतो इथं एकदा जेवायला जाऊ. आता आपले फोन स्मार्ट तर आहेतच पण काही सर्वेनुसार सोशल मीडिया चुकीच्या खाण्याच्या सवयी तर निर्माण करतंच पण सतत डोक्याला हे खा ते खा असा ताप होतो आणि आपलं चित्त खाण्यापिण्याकडेच.
(Image : google)
त्यात बहूतेक अन्नपदार्थांच्या पोस्ट जंक फूडच्या असतात. सातत्यानं जंक फूडच्या जाहिराती दिसत राहतात. जंक फूडचे टेम्पटेशन वाढतं.सतत जंक फूड खाल्ल्याने शारीरिक, भावनिक समस्या उद्भवताच. ते खाण्याची इच्छा हे रिल्स निर्माण करतात. आपलं असं होत असेल तर वेळीच तपासायला हवं.
पाहा होतं काय?
१. सतत मस्त चमचमीत खावं असं आताशा तुम्हाला नेहमी वाटतं का?
२. जंक फूड खाण्याचं क्रेव्हिंग वाढलं आहे का?
3. आपलं वजन, सुटलेलं पोट, याचा तुम्हाला आता जास्तच त्रास होतो का?
४. आपण अमूक पदार्थ करु असं सतत वाटतं का?
५. आपलं रोजचं जेवण आवडेनासं झालं का?