Join us  

दिवसभर फ्रेश राहायचं तर सकाळी रिकाम्या पोटी खा ५ पदार्थ; आहारतज्ज्ञांचा सल्ला, उपाशीपोटी चहा नको तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2022 2:17 PM

Food to Eat on Empty Stomach In Morning : सकाळी उठल्या उठल्या काय खावं या प्रश्नाचे नेमके उत्तर...

ठळक मुद्देकलिंगडात असणारे इलेक्र्टोलाइटस आणि लायकोपीन हे गुणधर्म हृदय आणि डोळ्यांचे कार्य चांगले ठेवण्यास मदत करते. चहा- कॉफी घेण्यापेक्षा सकाळी उठल्यावर खा ५ पदार्थ

सकाळी झोपेतून उठलो की आपण सगळ्यात आधी चहासाठी आधन ठेवतो. ब्रश करुन झाला की आपल्याला पहिल्यांदा चहा लागतो. चहा किंवा कॉफी प्यायल्याने आपल्याला फ्रेश वाटते आणि आपण जोमाने कामाला लागू शकतो असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते अतिशय चुकीचे आहे. आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उठल्या उठल्या चहा घेणे आरोग्यासाठी योग्य नसते. उलट अशाप्रकारे रिकाम्या पोटी चहा घेणे घातक ठरु शकते. त्यामुळे चहाने दिवसाची सुरवात करत असाल तर तसे करणे हळूहळू बंद करा. आता चहा बंद केला पण त्याला पर्याय काय? तर दिवसभर फ्रेश राहायचं असेल आणि आपली एनर्जी टिकवून ठेवायची असेल तर सकाळी उठल्यावर काय कायला हवे याविषयी आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा काही महत्त्वाच्या टिप्स देतात. सकाळी उठल्यावर रीकाम्या पोटी खाऊ शकतो अशा ५ गोष्टी त्या सांगतात, त्या कोणत्या पाहूया (Food to Eat on Empty Stomach In Morning )...

(Image : Google)

१. गरम पाणी आणि मध 

सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी मध घालू प्यायलेले केव्हाही चांगले. याचे कारण म्हणजे मधात खनिजे, व्हिटॅमिन्स, फ्लेवोनाइडस आणि एन्झाइम असतात. या घटकांमुळे पोट साफ होण्यास मदत होते. गरम पाण्यामुळे शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि पोट चांगले साफ व्हायला त्याचा फायदा होतो. 

(Image : Google)

२. पपई

तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधीचा त्रास असेल तर सकाळी उठल्यावर आवर्जून पपई खावी. पोटातील घाण बाहेर येण्यास तसेच आतडी मजबूत बनण्यासाठी रिकाम्या पोटी पपई खाणे उपयुक्त ठरते. शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर टाकण्यासाठीच नाही तर खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही पपई खाण्याचा अतिशय चांगला फायदा होतो. 

(Image : Google)

३. दलिया 

तुम्ही वजन कमी करण्याच्या मोहीमेवर असाल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर सकाळी उठल्यावर दलिया खाणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून आतड्यांचे कार्य सुरळती चालण्यासाठी दलिया अतिशय फायदेशीर असतो. दलिया खाल्ल्याने कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्याने पोट दिर्घ काळ भरलेले राहण्यास मदत होते. 

४. भिजवलेले बदाम

बदाम आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असून त्यातून शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण मिळत असल्याचे आपल्याला माहित आहे. मँगनीज, व्हिटॅमिन इ, प्रोटीन, फायबर, ओमेगा -३, ओमेगा ६ फॅटी अॅसिड अशा बऱ्याच गोष्टी बदामामध्ये असतात. त्यामुळे रात्रभर बदाम पाण्यात भिजत घालून खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो. बुद्धी शार्प होण्यासाठीही बदामाचा अतिशय चांगला फायदा होतो. 

(Image : Google)

५. कलिंगड 

नाश्त्यामध्ये फळं आवर्जून खायला हवीत असं आपण नेहमी म्हणतो. ९० टक्के पाणी असलेल्या कलिंगडामुळे आपली डीहायड्रेशनपासून सुटका होते. सकाळी उठल्यावर गोड काहीतरी खावेसे वाटते अशावेळी कलिंगड खाणे केव्हाही फायद्याचे असते कारण ते गोड तर असतेच पण त्यात कॅलरीजही कमी प्रमाणात असतात. कलिंगडात असणारे इलेक्र्टोलाइटस आणि लायकोपीन हे गुणधर्म हृदय आणि डोळ्यांचे कार्य चांगले ठेवण्यास मदत करते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाहेल्थ टिप्सलाइफस्टाइल