Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > हिवाळ्यात सर्दी खोकल्यावर गुणकारी भाजलेला लसूण! आता रोस्टेड गार्लिक खाण्याचा नवा ट्रेंड

हिवाळ्यात सर्दी खोकल्यावर गुणकारी भाजलेला लसूण! आता रोस्टेड गार्लिक खाण्याचा नवा ट्रेंड

Food: लसणाची फोडणी (garlic tadka) देऊन तळलेला लसूण तर आपण खातोच. पण यापेक्षाही हिवाळ्यात (winter special) थोड्या वेगळ्या पद्धतीने लसूण खाणे अधिक फायद्याचे ठरते. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 07:22 PM2021-12-02T19:22:37+5:302021-12-02T19:32:54+5:30

Food: लसणाची फोडणी (garlic tadka) देऊन तळलेला लसूण तर आपण खातोच. पण यापेक्षाही हिवाळ्यात (winter special) थोड्या वेगळ्या पद्धतीने लसूण खाणे अधिक फायद्याचे ठरते. 

Food trend: Benefits of eating roasted garlic in winter, natural immunity booster | हिवाळ्यात सर्दी खोकल्यावर गुणकारी भाजलेला लसूण! आता रोस्टेड गार्लिक खाण्याचा नवा ट्रेंड

हिवाळ्यात सर्दी खोकल्यावर गुणकारी भाजलेला लसूण! आता रोस्टेड गार्लिक खाण्याचा नवा ट्रेंड

Highlightsहिवाळ्यात तळलेल्या लसूणापेक्षा रोस्टेड गार्लिक म्हणजेच भाजलेला लसूण खाणे चांगले मानले जाते.

हिवाळा (winter food) हा आरोग्यासाठी किंवा शरीर कमविण्यासाठी सगळ्यात चांगला ऋतू मानला जातो. पण असं असलं तरीही सर्दी (cold), खोकला (cough), जुनाट दमा, अस्थमा, सांधेदुखी असे आजार बळावण्याची शक्यताही हिवाळ्यातच जास्त असते. म्हणूनच तर हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक (immunity) शक्ती चांगली असली पाहिजे, जेणेकरून वारंवार उद्भवणाऱ्या संसर्गजन्स आजारांचा त्रास आपल्याला होणार नाही. हा त्रास होऊ नये, वारंवार आजारी पडू नये, यासाठी हिवाळ्यात लसूण खाणे फायदेशीर (benefits of eating garlic) ठरते. कारण लसूणामध्ये कॅल्शिअम, लोह, फायबर्स, कार्बोहायड्रेट आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. 

 

हिवाळ्यात लसूण खाण्याची योग्य पद्धत
Correct way of eating garlic in winter 

फोडणीमध्ये टाकून तळलेला लसूण तर आपण खातोच. पण हिवाळ्यात तळलेल्या लसूणापेक्षा रोस्टेड गार्लिक म्हणजेच भाजलेला लसूण खाणे चांगले मानले जाते. लसूण भाजण्यासाठी पापड भाजतो ती जाळीदार चाळणी वापरली तरी चालते. गॅस पेटवून ही चाळणी गॅसवर ठेवा. त्यावर लसूणाच्या पाकळ्या मोकळ्या करून पसरवा. असे करताना लसूण सोलू नका. तो सालासकट भाजून घ्या. पाकळ्या चांगल्या भाजल्या गेल्यानंतर त्याचे वरचे टरफल काढा. त्यावर थोडे मीठ किंवा चाट मसाला टाका आणि अशा पाकळ्या दिवसातून दोन वेळा दोन- तीन खा. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात अशा भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या खाव्या. पापड भाजायची चाळणी नसेल तर तव्यावर लसूण भाजला तरी चालेल. 

 

भाजलेला लसूण खाण्याचे फायदे
Benefits of eating roasted garlic 
१. संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षा 

हिवाळा म्हणजे साथीचे आजार वाढण्याचा काळ. साथीचे आजार किंवा संसर्गजन्य आजार होऊ द्यायचे नसतील, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. त्यामुळेच हिवाळ्यात रोस्टेड गार्लिक म्हणजेच भाजलेला लसूण खावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

२. वाईट कोलेस्टरॉल होते कमी
bad cholesterol decreases

कच्चा लसूण, रोस्टेड लसूण आहारात नियमितपणे घेतल्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊन हृदयावर ताण येत नाही. त्यामुळेच हृदयाचे कार्य सुधारण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही लसूणाचा उपयोग होतो. 

 

३. वेटलॉससाठी उपयुक्त
Beneficial for weight loss

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सगळ्यांसाठीच रोस्टेड लसूण खाणे हा एक चांगला उपाय आहे. भाजलेला लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. लसूण आपली चयापचय क्रिया वेगवान करतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते. अन्न नीट पचल्यामुळे शरीरावर चरबी साचत नाही. त्यामुळे वेटलॉससाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाने रोस्टेड लसूणाच्या पाकळ्या नियमितपणे खाव्या. 

 

४. दमा, खोकला कमी होतो
हिवाळ्यात जुनाट दमा, जुना खोकला असे त्रास उफाळून येतात. हे सगळे त्रास कमी करण्यासाठी रोस्टेड लसूण खाणे उपयुक्त ठरते. लसूण उष्ण असल्याने तो अशा आजारांवर गुणकारी ठरतो. भाजलेला लसूण आणि गुळ असे एकत्रित खाल्ल्यास दमा, खोकला, सर्दी असा त्रास कमी होतो. 

 

Web Title: Food trend: Benefits of eating roasted garlic in winter, natural immunity booster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.