Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन वाढत चाल्लंय-कपडे घट्ट होतात? रात्रीच्यावेळी 'हे' ७ पदार्थ खा, परफेक्ट फिगर-स्लिम दिसाल

वजन वाढत चाल्लंय-कपडे घट्ट होतात? रात्रीच्यावेळी 'हे' ७ पदार्थ खा, परफेक्ट फिगर-स्लिम दिसाल

Food Which Help In Weight Loss : वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि भूक जास्त लागत असेल तर जास्त गोड खाऊ नका.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 08:18 PM2024-08-04T20:18:44+5:302024-08-04T20:28:57+5:30

Food Which Help In Weight Loss : वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि भूक जास्त लागत असेल तर जास्त गोड खाऊ नका.

Food Which Help In Weight Loss Try This Weight Loss At Home For Best Results And Get Perfect Slim Body | वजन वाढत चाल्लंय-कपडे घट्ट होतात? रात्रीच्यावेळी 'हे' ७ पदार्थ खा, परफेक्ट फिगर-स्लिम दिसाल

वजन वाढत चाल्लंय-कपडे घट्ट होतात? रात्रीच्यावेळी 'हे' ७ पदार्थ खा, परफेक्ट फिगर-स्लिम दिसाल

रात्री काहीही खाण्याची इच्छा झाली तर काहीही खाणं टाळायला हवं. वजन  वाढलं तेव्हा असं करण्याची काही गरज नाही. काही पदार्थांचे रात्रीच्यावेळी सेवन केल्याने वजन वाढू शकतं. (Food Which Help In Weight Loss) पण काही पदार्थ रात्री खाल्ल्याने भूक कमी होते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. रात्रीच्यावेळी काही पदार्थ खाल्ल्याने  वजन कमी होईल आणि भूकही शांत राहील. (Food Which Help In Weight Loss)

1) दही

रेडक्लिफलॅबच्या रिपोर्टनुसार दही प्रोटीन आणि कॅल्शियमने परिपूर्ण असते. यातील बॅक्टेरिया पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. रात्री काहीही खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही दही  खाऊ शकता.  ज्यामुळे झोप चांगली येईल. दह्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते आणि मसल्स वाढतात याशिवाय एक्स्ट्रा बेली फॅट कमी होते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासही मदत होते. 

2) ओट्स

रात्री भूक लागल्यानंतर तुम्ही ओट्स खाऊ शकता. ओट्स खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. ओट्समधील फायबर्स ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

3) चिया सिड्स

चिया सिड्समध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. चिया सिड्स रात्री पाण्यात भिजवून प्यायल्याने फॅट्स कमी होण्यास मदत होते. 

पोट, मांड्या फार सुटल्यात? जेवणात 'ही' भाजी खा, पोटावरची चरबी होईल कमी-स्लिम दिसाल

4) केळी

केळ्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे मांसपेशी मजबूत राहण्यास मदत होते. रात्रीच्यावेळी भूक लागल्यानंतर तुम्ही केळी खाऊ शकता. ज्यामुळे झोप चांगली येते.

5) बदाम

बदाम, प्रोटीन आणि फायबर्स भरपूर असतात. बदाम खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण रात्री पोटभर खाऊ शकता.

6) ग्रीन टी

ग्रीन टी एंटीऑक्सिडेंट्सनी परीपूर्ण असते. ग्रीन टीमुळे मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. झोपण्याच्या आधी काही खाण्याची किंवा पिण्याची इच्छा असेल तर ग्रीन टी पिऊ शकता.

चेहरा काळा पडला? जावेद हबीब सांगतात अर्धा बटाटा घेऊन 'हा' उपाय करा; 2 मिनिटांत ग्लो येईल

7) सॅलेड

सॅलेडमध्ये फायबर्स, व्हिटामीन्स भरपूर असतात. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. रात्री तुम्ही काकडी, टोमॅटो, कांदा, पनीर, गाजर, बीट आणि लिंबाचा रस मिसळून सॅलेड बनवू शकता.

रात्री कोणते पदार्थ खाऊ  नये?

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि भूक जास्त लागत असेल तर जास्त गोड खाऊ नका.  याव्यतिरिक्त रात्री तळलेले खाद्यपदार्थ खाऊ नका. सोडियम आणि प्रिजर्व्हेटिव्हज जंक फूड्स आणि सेवन रात्री सेवन केल्यानं वजन वेगाने वाढतं. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार भरपूर पाणी प्या आणि आहारात फायबर्सचा समावेश करा. वजन वेगाने कमी होईल. आपल्या आहारात मशरूम, पालकचा समावेश करा.  याव्यतिरिक्त प्रोसेस्ड फूड किंवा शुगरचा इंटेक करू नका.

Web Title: Food Which Help In Weight Loss Try This Weight Loss At Home For Best Results And Get Perfect Slim Body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.