Join us  

रोज बदाम-पनीर खाणं परवडत नाही? २० रूपयांत प्रोटीन देणारे ५ पदार्थ खा-मसल्स होतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 1:04 PM

Foods For Protein Weight Loss : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी जास्तीत जास्त प्रोटीन्सचा आहारात समावेश करावा असा सल्ला दिला जातो.

लठ्ठपणा सध्या एक गंभीर समस्या बनली आहे. (Health Tips) लाईफस्टाईलमधील काही चुका मोठ्या आजारांचे कारण ठरतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना जास्तीत जास्त प्रोटीन्सचा आहारात समावेश करावा असा सल्ला दिला जातो. (Best High Protein Foods for Weight Loss) लठ्ठपणा वाढल्याने डायबिटीस, कॅन्सर, बीपी, थायरॉईड यांसारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी गंभीर आजारांचे कारण ठरतात. (Foods For Protein Weight Loss)

सकाळी उठताच पराठा, पुरी, समोसा, छोटे भटूरे यांसारख्या पदार्थांचे सेवन करणं  हेल्दी मानले जात नाही. यातील मैदा आणि तेल लठ्ठपणा वाढण्याचे  कारण ठरते.  याशिवाय या पदार्थांमध्ये  जराही पोषक तत्व नसतत. नाश्त्याला या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते. डॉ. शिखा अग्रवाल यांच्यामते जर तुम्हाला वजन कमी करायचे असल तर हेल्दी ब्रेकफास्ट करायाल हवा. नाश्त्याला अशा पदार्थांचे सेवन करा ज्यात प्रोटीन्स, फायबर्स, कॅल्शियम यांसारखी पोषक तत्व असतात. (The Best High Protein Foods for Weight Loss)

1) मोड आलेली कडधान्य

जर तुम्ही वजन कमी करणार असाल तर मोड आलेले मूग एक हेल्दीऑप्शन आहे. हा एक प्रोटीन्स आणि फायबर्सययुक्त नाश्ता आहे.  हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. मूगात मल्टिव्हिटामीन्स आणि एंजाईन्स मोठ्या प्रमाणात असतात. 

ओटी पोट सुटलंय-पोटावर कपडे घट्ट बसतात? झोपण्याआधी ३ गोष्टी करा-झरझर घटेल वजन

2) मूंग डाळ चिला

प्रोटीन्सनी परिपूर्ण असा मूग डाळ चिला एक स्वादीष्ट पर्याय आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर पोटभर या डाळीचे सेवन करा ज्यामुळे पोट निरोगी राहून वजन कमी होण्यास मदत होईल. यात जास्त प्रोटीन्स आणि कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं. मूग डाळ चिल्यात फॉलेट बी-६ यांसारखे व्हिटामीन्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी पोषक तत्व असतात.

रोज जेवणात चमचाभर 'ही' चटणी खा; बीपी-कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहील आणि मेंदूलाही मिळेल चालना

3) व्हेजिटेबल उपमा

वजन  कमी करण्यासाठी व्हेजिटेबल उपमा एक उत्तम पर्याय आहे. यात कमीत कमी कॅलरीज असतात. यात रवा आणि फायबर्सयुक्त भाज्यांचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. यात व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, बीटा-कॅरोटीन आणि अन्य पोषक तत्व असता ज्यामुळ कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

4) क्विनोआ

क्विनोआ पुलाव एक उत्तम पर्याय आहे. क्विनोआ पुलाव ग्लुटेन फ्री आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यात पोषक मुल्य असल्यामुळे क्विनोआ  एक उत्तम पर्याय आहे. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. आवश्यक अमीनो एसिड्स असतात.

5) शेंगदाणे

शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. कमीत कमी खर्चात शेंगदाण्यांचा आहारात समावेश करु शकता. शेंगदाणे खाल्ल्याने एनर्जी वाढण्यास मदत होते. याशिवाय पोषक घटकांची कमतरताही भासत नाही. शेंगदाणे तब्येतीसाठी उत्तम पर्याय आहेत. यात हेल्दी फॅट्स असतात.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स