शरीरातील हाडांना पुरेपूर कॅल्शियम मिळण्यासाठी (Calcium sathi kay khave) आहारात पोषक घटकांचा समावेश करणं गरजेचं असतं. तुमचं शरीर हाडांवर टिकून आहे. जर हाडं कमकुवत झाली असतील तर शरीराच्या ओव्हरऑल कार्य पद्धतीवर परिणाम होतो. हाडं निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते. जर तुम्ही हाडांकडे वेळेच लक्ष दिले नाही तर आर्थरायटिस सारखे गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे हाडं कमकुवत होऊ लागतात. ही लक्षणं जाणवल्याने फॅक्चर होणं, नखं कमकुवत होणं, पाठदुखी अशा समस्या उद्भवतात. (Foods High in Calcium)
हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम फार महत्वाचे असते. रोज खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते यासाठी काय खायचं काय टाळायचं हे माहीत असावे लागते. योग गुरू बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी हाडांना मजबूत बनवण्यासाठी काही घरगुती उपाय सुचवले आहेत.
हाडं कमकुवत होण्याची लक्षणं
कमकुवत हाडं ताण-तणावाचे कारण ठरतात. ज्यामुळे काम करण्यात अडचण येते. हाडांमध्ये फॅक्चर झाल्यास जखम बरी होण्यास जास्त वेळ लागतो. रात्रीच्यावेळी हाडांमध्ये वेदना जाणवतात. कमकुवत हाडं आणि सांधेदुखी जाणवते, सतत थकवा येतो.
बारीक होण्यासाठी चपाती खाणं का सोडता? गव्हाच्या पिठात हा पदार्थ मिसळा-कणभरही वजन वाढणार नाही
आहारात कॅल्शियम वाढवा (Veg Food For Strong Bones)
१) प्रोटीन आणि आयर्नची शरीराला जास्त आवश्यकता असते. कॅल्शियम हाडं, दातांच्या विकासासाठी आवश्यक असते. यासाठी दूध, दही, पनीर, तीळ, बदाम, ब्रोकोली, बीन्स, संत्री, राजमा, टोफू यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
दिवसरात्र भात खातात तरी साऊथच्या लोकांचे पोट का सुटत नाही? भात खाण्याची योग्य पद्धत-पाहा
२) दूधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. एक कप गाईच्या दूधात जवळपास ३०६ ते ३२५ मिलीग्राम कॅल्शियम असते. डेअरी उत्पादनांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. याव्यतिरिक्त प्रोटीन, व्हिटामीन ए, व्हिटामीन डी चा चांगला स्त्रोत आहे.
३) सफरचंदाचे व्हिनेगर कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. युएसडीएच्या रिपोर्टनुसार १०० ग्राम सफरचंदात जवळपास ७ मिलीग्राम कॅल्शियम असते. कॅल्शियमव्यतिरिक्त मॅग्नेशियम बायकार्बोनेट, सल्फेट्स यांसारखे मिनरल्स असतात.
४) रामदेव बाब सांगतात की हाडांना मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात दालचिनी आणि मध घालून पिऊ शकता. दालचिनी आणि मधाचे सेवन केल्यास कॅल्शियम वाढण्यास मदत होते.