Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नका ५ पदार्थ; वेळीच काळजी घ्या- नाहीतर...

रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नका ५ पदार्थ; वेळीच काळजी घ्या- नाहीतर...

Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वरालक्ष्मी सांगतात, रात्रीच्या वेळी आहारात कोणते पदार्थ टाळायला हवेत याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 03:51 PM2022-11-13T15:51:05+5:302022-11-13T15:57:13+5:30

Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वरालक्ष्मी सांगतात, रात्रीच्या वेळी आहारात कोणते पदार्थ टाळायला हवेत याविषयी...

Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda : Do not eat 5 foods at dinner; Be careful in time- or else… | रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नका ५ पदार्थ; वेळीच काळजी घ्या- नाहीतर...

रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नका ५ पदार्थ; वेळीच काळजी घ्या- नाहीतर...

Highlightsबाजारात मिळणारे पॅकेट फूड करतानाही त्यामध्ये अनेक प्रिझर्व्हेटीव्ह वापरलेले असतात. काही पदार्थ पचायला जड असल्याने त्याचा पचनसंस्थेवर ताण येतो, त्यामुळे हे पदार्थ रात्री टाळलेलेच बरे

आपले आरोग्य हे आपल्या जीवनशैलीशी निगडीत असते. आपण कसा, कधी, किती आहार घेतो, व्यायाम करतो की नाही, झोपेच्या बाबतीत काय करतो यांसारख्या गोष्टी आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आहार-विहार चांगला असेल तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अन्यथा आपल्याला कमी वयातच आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी भेडसावण्यास सुरुवात होते. आहाराचे काही नियम असतात आणि ते नियम पाळले तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी झोपताना काही गोष्टी आहारात आवर्जून टाळायला हव्यात असे आयुर्वेदात सांगितले जाते (Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda). 

रात्रीचा आहार हा हलका असायला हवा. रात्री झोपताना जर जड पदार्थ खाल्ले तर ते पचत नाहीत आणि त्यामुळे पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते. रात्री झोपल्यावर आपल्यी शरीराची पुरेशी हालचाल होत नाही. अशावेळी आहारात सहज पचणारे पदार्थ घ्यायला हवेत. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वरालक्ष्मी सांगतात, रात्रीच्या वेळी आहारात कोणते पदार्थ टाळायला हवेत याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. दही 

दह्यामध्ये प्रोटीन असल्याने ते आरोग्यासाठी आवश्यक असते. पण दही पचायला काही प्रमाणात जड असल्याने ते रात्रीच्या वेळी खाणे शक्यतो टाळायला हवे. तसेच दही प्रकृतीने थंड असल्याने त्यामुळे सर्दी-कफ यांसारख्या समस्या होण्याची शक्यता असते. 

२. तळलेले पदार्थ 

तळलेले पदार्थ खाणे आपल्या सगळ्यांनाच आवडते. मात्र रात्रीच्या वेळी तळलेले पदार्थ खाल्ले तर ते पचायला जड असल्याने बराच वेळ लागतो. रात्री आपण जेवल्यानंतर विशेष हालचाल न करता लगेच झोपतो. त्यामुळे हे पदार्थ पचत नसल्याने ते रात्री खाणे टाळलेलेच बरे.

३. फळं

फळांमध्ये शर्करा असते. तसेच फळं पचायला जड असल्याने ती शक्यतो सूर्यास्त होण्याच्या आत खायला हवीत असे सांगितलेले आहे. फळं रात्रीच्या वेळी खाल्ली तर ती पचायला जड होत असल्याने ती शक्यतो दिवसाच खावीत.


 

४. प्रोसेस्ड फूड आणि खारट पदार्थ 

प्रोसेस्ड फूड आरोग्यासाठी केव्हाही घातकच. त्याचप्रमाणे बाजारात मिळणारे पॅकेट फूड करतानाही त्यामध्ये अनेक प्रिझर्व्हेटीव्ह वापरलेले असतात. मात्र हे आरोग्यासाठी घातक असल्याने ते खाणे रात्रीच्या वेळी टाळायला हवे. 

५. नॉनव्हेज 

नॉनव्हेजचे पदार्थही पचायला जड असल्याने ते रात्रीच्या वेळी खाणे टाळलेले केव्हाहीच चांगले. 
 

Web Title: Foods Should not be Eaten in Dinner According to Ayurveda : Do not eat 5 foods at dinner; Be careful in time- or else…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.