शरीर निरोगी राहण्यासाठी आणि शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटीन्सप्रमाणे व्हिटामीन बी-१२ ची आवश्यकता असते. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत पडण्याचा त्रास होऊ शकतो. (Health Tips) भारतातील पुरूष आणि महिलांमध्ये व्हिटामीन बी-१२ ची कमकरता एक सायलेंट किलरच्या स्वरूपात वाढत आहे.(Foods That Are High in Vitamin B-12) याचं सगळ्यात मोठं कारण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे असू शकतं. व्हिटामीन बी-१२ ला कोबालीन असंही म्हणतात. रेड ब्लड सेल्स बनवण्यासाठी, डिएनए तयार करण्यासाठी आणि न्युरोलॉजिकल हेल्थसाठी हे आवश्यक आहे. (Foods For Vitamin B12)
वेब एमडीच्या रिपोर्टनुसार व्हिटामीन बी-12 च्या कमतरतेमुळे थकवा येणं, कमकुवतपणा, एनिमिया, डिप्रेशन अशी लक्षणं उद्भवू शकतात. फक्त प्लांट बेस्ड पदार्थांचे सेवन करणं, वाढत्या वयात शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होणं, पचनासंबंधी विकार, एसिड रिफ्लेक्स यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांच्यामते जेवणात व्हिटामीन बी-१२ चा समावेश केल्यास याच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजार कमी होतील. बीन्स, डाळी, डेअरी, उत्पादनं, फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.
1) जर खाण्यापिण्यात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेट्स घेऊ शकता. यामुळे पोट आणि आतड्यांशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.
2) दूधात प्रोटीन, कॅल्शियमबरोबरच अनेक पोषक तत्व असतात. ज्यात व्हिटामीन बी-१२ असते. याव्यतिरिक्त जिंक, व्हिटामीन एस पोटॅशियमही असते जे शरीरासाठी फायदेशीर ठरते.
रोज पायी चालता तरी पोट १ इंचही कमी होईना? ५ कॉमन चुका टाळा, कमी वेळात येईल स्लिम लूक
3) टोफू व्हिटामीन बी१२ चा एक चांगला स्त्रोत आहे. टोफूच्या सेवनाने शरीराला प्रोटीन्स आणि इतर पोषक तत्व मिळतात. जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
4) ताजी फळं आणि हिरव्या भाज्या यात व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही बीट, मशरूम या भाज्यांचे सेवन करू शकता.
पोट खूप सुटलंय-धड व्यायामही होत नाही? रोज रिकाम्या पोटी हा पदार्थ घ्या-पोट होईल स्लिम
5) बटाटा हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे. बटाटा पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. बटाटा व्हिटामीन बी-१२ चा चांगला स्त्रोत आहे. यात स्टार्च मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशियम, सोडियम, व्हिटामीन बी१३ आणि व्हिटामीन ए चा चांगला स्त्रोत आहे.
6) केळी आणि सफरचंद या फळांत फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. व्हिटामीन बी-१२ चे प्रमाणही जास्त असते. सफरचंदात पॉलिफेनोल्स असतात. ही दोन्ही फळं व्हिटामीन बी-१२ चा चांगला स्त्रोत आहेत.
7) बीटात व्हिटामीन्स, मिनरल्स, आयर्न आणि कॅल्शियमसारखी पोषक तत्व असतात. ही लाल रंगाची भाजी व्हिटामीन बी-१२ चा चांगला स्त्रोत आहे. सॅलेड किंवा कच्च्या स्वरूपात तुम्ही बीट खाऊ शकता.
८) नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार मशरूमध्ये व्हिटामीन बी-12 चे प्रमाण जास्त असते. ५० ग्राम मशरूम खाल्ल्याने रोजची कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते.