Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दंड, पोटावर फॅट्स- शरीर जाड दिसतं? नियमित ३ गोष्टी करा, १५ दिवसांत वजन होईल कमी

दंड, पोटावर फॅट्स- शरीर जाड दिसतं? नियमित ३ गोष्टी करा, १५ दिवसांत वजन होईल कमी

Food for Weight Loss (Vajan kami karnyasathi kay khave) : जेवणाचे टायमिंग, दोन जेवणांमधलं अंतर या गोष्टींचा वजनावर परिणाम होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 09:38 AM2023-10-03T09:38:00+5:302023-10-03T10:31:03+5:30

Food for Weight Loss (Vajan kami karnyasathi kay khave) : जेवणाचे टायमिंग, दोन जेवणांमधलं अंतर या गोष्टींचा वजनावर परिणाम होतो.

Foods That Burn Belly Fat : What food is good for getting rid of belly fat | दंड, पोटावर फॅट्स- शरीर जाड दिसतं? नियमित ३ गोष्टी करा, १५ दिवसांत वजन होईल कमी

दंड, पोटावर फॅट्स- शरीर जाड दिसतं? नियमित ३ गोष्टी करा, १५ दिवसांत वजन होईल कमी

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले बरेच लोक चुका करतात. (Fat Loss Tips) वजन कमी करण्यासाठी बराचवेळ उपाशी राहतात. पण उपाशी राहिल्याने तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो. (What Foods Help Burn Belly Fat) वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना कोणत्याही प्रकारे घाई करू नये. योग्य मार्गाने तुम्ही वजन घटवू शकता. जेवणाचे टायमिंग, दोन जेवणांमधलं अंतर या गोष्टींचा वजनावर परिणाम होतो. (Weight Loss Tips)

योग्य पद्धतीने या टिप्स फॉलो केल्यास १५ दिवसात वजनात फरक  झालेला दिसून येईल. एका आठवड्यात तुम्ही २ ते ३ किलोपर्यंत वजन कमी करू शकता. डायटिशियन आणि न्युट्रिशनिस्ट सिमरन कौर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (weight loss tips for women in marathi)

वजन कमी करण्यासाठी आहारात प्रोटीन्सचा समावेश करावा. प्रोटीन्स शरीरात फॅट्स जमा होऊ देत नाहीत आणि बराचवेळ काहीही खाण्याची इच्छाही होत नाही.  आहारात बीन्स, ड्रायफ्रुट्स आणि नट्सच समावेश करा. खाण्यात कार्ब्स, हेल्दी फॅट्सचा समावेश असावा. वजन कमी करण्यासाठी प्रोटीन रिच डाएट फार महत्वाचे असते. 

दुधापेक्षा दुप्पट कॅल्शियम देतील ८ पदार्थ; प्रोटीन-कॅल्शियम भरभरून मिळेल, हाडं होतील बळकट

वजन कमी करण्यासाठी इंफ्यूज्ड वॉटर

वजन कमी करण्यासाठी तुम्ही इंफ्यूज्ड वॉटरचा आहारात समावेश करावा. काकडी,  चिया सिड्स, पुदीना, आलं असे अनेक पदार्थ आहेत. ज्यातील इंफ्यूज्ड वॉटरमुळे वजन कमी करण्यास मदत होते. या पाण्याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते. वजन कमी करणंही सोपं होतं. यामुले डायजेशन चांगले राहते.

आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या

वजन कमी करण्याासाठी गट्स हेल्थ म्हणजे आतड्यांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते. जर पचनक्रिया  चांगली नसेल तर वजन कमी करणं कठीण होऊ शकतं. यासाठी सफरचंद, ग्रीन टी, बदाम, दही असे पदार्थ खा.  यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही.

पोट सुटलंय, व्यायामाला वेळ नाही? बेडवर पडल्या पडल्या ३ योगासनं करा-पोट होईल एकदम फ्लॅट

पोट साफ होत नसेल तर वजन कमी  होण्यास अडचणी येऊ शकतात. मैदायुक्त पदार्थ, सोडा, गोड पदार्थ असे पदार्थ खाऊ नका. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना गोड पदार्थांवर आणि तेलकट पदार्थांवर नियंत्रण ठेवा. 

Web Title: Foods That Burn Belly Fat : What food is good for getting rid of belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.