Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज खा ५ पदार्थ; तब्येत राहील ठणठणीत-कायम राहाल निरोगी

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज खा ५ पदार्थ; तब्येत राहील ठणठणीत-कायम राहाल निरोगी

Foods to Eat and Avoid for High Cholesterol : हृदयाच्या संबंधित समस्या टाळण्यासाठी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. (Foods to Eat and Avoid for High Cholesterol)

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 03:26 PM2023-06-01T15:26:57+5:302023-06-01T18:50:12+5:30

Foods to Eat and Avoid for High Cholesterol : हृदयाच्या संबंधित समस्या टाळण्यासाठी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. (Foods to Eat and Avoid for High Cholesterol)

Foods to Eat and Avoid for High Cholesterol : 5 food combinations that will reduce bad cholesterol in veins | बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज खा ५ पदार्थ; तब्येत राहील ठणठणीत-कायम राहाल निरोगी

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज खा ५ पदार्थ; तब्येत राहील ठणठणीत-कायम राहाल निरोगी

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत कोलेस्टेरॉल वाढणं ही एक गंभीर समस्या बनली आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवय याचं प्रमुख कारण आहे. रोज जंक फूड खाल्ल्यानं रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रक्तदाब, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.  हृदयाच्या संबंधित समस्या टाळण्यासाठी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. (Foods to Eat and Avoid for High Cholesterol)

बॅड कोलेस्टेरॉल नसांसाठी नुकसानकारक ठरतं.  चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयी, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली यासाठी गरजेची असते. वेबएमडीच्या रिपोर्टनुसार रोजच्या आहारात काही फूड कॉम्बिनेश्न्सचा समावेश केला तर तब्येत चांगली राहण्यास मदत होऊ शकते. ( 5 food combinations that will reduce bad cholesterol in veins)

डाळ आणि ब्राऊन राईस

डाळ आणि ब्राऊन राईस कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. डाळीत भरपूर फायबर्स असतात.  ज्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. याऊलट ब्राऊन राईस हृदयाशी सबंधित आजार कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. या दोन्हींच्या सेवनानं तुम्ही हृदय निरोगी ठेवू शकता. 

मिलेट्स- धान्य

मिलेट्सचा आहारात समावेश केल्यानं कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. यात भरपूर फायबर्स असतात आणि बाजरी हृदयाच्या आजारांचा धोका कमी करते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करू शकता. यामुळे कोलेस्टेरॉल लेव्हलही वाढत नाही.

बदाम आणि दही

बदाम आणि दह्याचे कॉम्बिनेशन हाय कोलेस्टेरॉलची समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते.  बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असून यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही बदाम आणि दही एकत्र खाता तेव्हा कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता ४ टक्क्यांनी वाढते.  यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

हळद आणि काळी मिरी

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हळद आणि काळी मिरीची कॉम्बिनेशन फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही  १ ग्लास पाण्यात हळद पावडर आणि काळी मिरी पावडर घालून उकळून याचे सेवन करा. याव्यतिरिक्त तुम्ही कच्य्या हळदीचाही वापर करू शकता. काळ्यामिरीससह याचे सेवन केल्यास चांगले फायदे मिळतात.

रोज चालूनही पोट कमी होत नाही? 'ही' आहे चालण्याची योग्य वेळ; स्लिम-मेंटेन राहण्याचं सिक्रेट

फॅटी- फिश

सॅल्मन, मॅकेरल, ब्लॅक कॉड यासारखे फॅटी मासे उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. प्रथिने समृद्ध या माशांमध्ये संतृप्त चरबी, ओमेगा फॅटी ऍसिडस् यांसारखे गुणधर्म आहेत आणि ते हृदयविकाराच्या झटक्यापासून स्ट्रोकपर्यंतच्या गंभीर आजारांचा धोका कमी करतात.

Web Title: Foods to Eat and Avoid for High Cholesterol : 5 food combinations that will reduce bad cholesterol in veins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.