शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी दुधाचे सेवन केले जाते. (Foods avoid eating with milk) दुधात कॅल्शियम, प्रोटीन्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस अशी गुणधर्म असतात. पण दुधाचा शरीराला (Health Tips) पुरेपूर फायदा होण्यासाठी काही पदार्थांसह दुधाचे सेवन करणं टाळायला हवं. यामुळे दूधातील पोषक तत्व कमी होतात आणि शरीर कमकुवत बनते. (7 Food Items You Must Not Consume with Milk)
दुधासह कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये?
1) दही - आयुर्वेदानुसार दूधाबरोबर दह्याचे सेवन करू नये . दूध प्याल्यानंतर लगेच दही खाणं टाळावं. कारण हे तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात आणि पोट खराब होते.
२) आंबट फळं - आंबट फळं दुधाबरोबर आंबट फळांचे सेवन करू नये. यामुळे पोटदुखी, उलट्या होणं यांसारख्या समस्या उद्भवतात. आंबट फळं खाल्ल्याच्या २ तासानंतर दूध प्या.
३) गूळ - अनेकजण पदार्थाला गोडवा येण्यासाठी त्यात गुळ मिसळतात. यात कोणतीही शंका नाही की गुळात अनेक फायदेशीर तत्व असतात. पण आयुर्वेदात दूध आणि गुळाचे सेवन करणं नुकसानकारक मानलं जातं. यामुळे पोटाच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो.
४) मासे- मासे खाणं तब्येतीसाठी पोषक मानलं जातं. मासे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नका. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकताता. यामुळे पोटदुखी, फूड पॉइजनिंग होऊ शकतं. इतकंच नाही त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
५) चणे- जर तुम्ही मसालेदार चणे खाल्ले तर त्याबरोबर दूध पिऊ नका. यामुळे एसिड रिफ्लेक्स यासह डायजेशन इश्यूज वाढू शकतात.
६) चिप्स- दुधाबरोबर खारट पदार्थ जसं की चिप्स, फरसाण अजिबात खाऊ नका. यात मीठ जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईड बॅलेंन्सवर परिणाम होतो.
७) प्रोटीन - दुधात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. अशात जर तुम्ही प्रोटीन्सयुक्त पदार्थ अजून खाल्ले तर पचनक्रियेवर विपरित परिणाम होतो. पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात.