सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जेनेलियानं आपल्या वेटलॉस ट्रांसफॉर्मेशनबद्दल माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर आपले वर्कआऊट व्हिडिओज शेअर करत तिनं आपल्या या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. ६ आठवड्यात तिनं ४ किलो वजन कमी केलं आहे. ५९.४ किलोवरून ती आता ५५.१ किलो आहे. (Genelia deshmukh weight loss journey secret transfornation weight loss diet exercise workout routine fat to fit journey)
जेनेलिया चित्रपटांपासून दूर असली तरी ती तिच्या इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती दररोज पती आणि मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जेनेलिया आणि रितेश मजेशीर रिल्स शेअर करत असतात. वजन कमी करण्यासाठी तिनं जीम वर्कआऊट्स आणि कार्डिओवर भर दिला.
तिनं सांगितले की हा प्रवास मानसिकदृष्ट्या आणि शारिरीकदृष्ट्याही अवघड होता. वेट लॉससाठी प्रयत्न सुरू असताना जेनेलियानं कधीच चीट मिलला रेग्युलर डाएटचा भाग बनवलं नाही. तिच्यामते फिटनेसमध्ये फक्त वजनच नाही तर उत्साह, लवचिकतासुद्धा तितकीच महत्वाची असते. जेनेलियानं वजन घटवण्यासाठी कोणत्याही किटो डाएट किंवा स्पेशल डाएटचा आधार घेतलेला नाही. जिममध्ये घाम गाळण्याव्यतिरिक्त जेनेलियाने भरपूर डाएट केले.
त्यामुळे तिचे वजन झपाट्याने कमी झाले. जेनेलिया नाश्त्यात ब्राऊन ब्रेड, अंडी यांचा समावेश असतो. जेनेलियाला नाश्त्यात इडली, डोसा खायलाही आवडते. त्याचबरोबर दुपारच्या जेवणात मासे खायला आवडतात. जेनेलियाला रात्रीच्या जेवणात भूक लागल्यास ग्रील्ड सँडविच आणि पोहे खाते.