Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन वाढेल म्हणून तूप खाणं टाळता? आहारतज्ज्ञ सांगतात, तूप खाऊन वजन घटवण्याचे २ उपाय

वजन वाढेल म्हणून तूप खाणं टाळता? आहारतज्ज्ञ सांगतात, तूप खाऊन वजन घटवण्याचे २ उपाय

How To Do Weight Loss By Eating Ghee?: वजन वाढेल म्हणून अनेक जण तूप खाणं टाळतात. तुम्हीही असंच करत असाल तर ही माहिती एकदा बघाच...(2 ways of eating ghee for weight loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 01:53 PM2024-07-25T13:53:05+5:302024-07-25T16:14:35+5:30

How To Do Weight Loss By Eating Ghee?: वजन वाढेल म्हणून अनेक जण तूप खाणं टाळतात. तुम्हीही असंच करत असाल तर ही माहिती एकदा बघाच...(2 ways of eating ghee for weight loss)

ghee is really useful for weigt loss, how to do weight loss by eating ghee, 2 ways of eating ghee for weight loss, benefits of eating ghee | वजन वाढेल म्हणून तूप खाणं टाळता? आहारतज्ज्ञ सांगतात, तूप खाऊन वजन घटवण्याचे २ उपाय

वजन वाढेल म्हणून तूप खाणं टाळता? आहारतज्ज्ञ सांगतात, तूप खाऊन वजन घटवण्याचे २ उपाय

Highlightsआहारतज्ज्ञ असं सांगत आहेत की तूप खाऊन वजन मुळीच वाढत नाही. उलट तूप हे फॅट बर्नर आहे.

तूप हा आपल्याकडचा असा एक पारंपरिक पदार्थ आहे जो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. काही जणांच्या मते तूप खाल्ल्याने वजन वाढतं. तर काही आहारतज्ज्ञांच्या मते तूप खाऊन अजिबात वजन वाढत नाही. त्यामुळे पोळीवर तेल लावण्याऐवजी तूप लावा, फोडणीसाठी तूप वापरा असा सल्ला आहारतज्ज्ञ बऱ्याचदा देतात (benefits of eating ghee). तुपाशिवाय खरंतर आपलं होत नाही. पण प्रत्येकवेळी भातावर, पोळीवर, पराठ्यांवर तूप घेताना वाढत्या वजनाचा विचार डोक्यात येतो ( how to do weight loss by eating ghee?) आणि आपण तूप खाणं टाळतो. तुम्हीही फक्त वजन वाढेल या भीतीने तूप खाणं बंद किंवा कमी केलं असेल तर एकदा हे वाचा....(2 ways of eating ghee for weight loss)

 

तूप खाऊन वजन वाढतं?

हा प्रश्न अनेकांच्या मनात आहेच. याप्रश्नाचं उत्तर देताना आहारतज्ज्ञ असं सांगत आहेत की तूप खाऊन वजन मुळीच वाढत नाही. उलट तूप हे फॅट बर्नर आहे. याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ indian.yogic.lifestyle या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

वजन वाढू नये म्हणून कतरिना कैफ खाण्यापिण्याची कोणती पथ्ये पाळते? तिच्या डाएटिशियन सांगतात...

यामध्ये असं सांगितलं आहे की तूप हे सॅच्युरेटेड फॅट जरी असलं तरी त्यामध्ये कार्बनचा एक विशिष्ट बॉण्ड असतो तो शरीरातली जास्तीची चरबी कमी करण्यासाठी मदत करतो. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे हा तुपाचा गुणधर्म आहे. त्यामुळे ते खाऊन वजन वाढतं, असं म्हणणं चुकीचं असल्याचं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

 

तूप खाऊन वजन कमी कसं करायचं?

तूप खाऊन वजन कमी करायचं याच्या दोन पद्धती आहेत. यापैकी पहिली पद्धत म्हणजे आपण रोज ज्या पोळ्या, पराठे खातो त्यांना तेलाऐवजी तूप लावायचं. असं केल्याने त्या पोळीचा किंवा पराठ्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात. 

केस खूप गळतात- पांढरेही झाले? 'या' पद्धतीने आवळा पावडर लावा- काही दिवसांतच होतील दाट

सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात १ चमचा तूप टाकून पिणे हा देखील एक उत्तम उपाय आहे. हा उपाय केल्याने काही महिन्यांत खरोखरच वजन कमी झाल्याचा अनुभव अनेकांनी कमेंटमध्ये शेअर केला आहे. गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्यास बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. पण हे सगळे परिणाम दिसून येण्यासाठी तूप मात्र घरी केलेलं असावं. घरच्या तुपासारखे गुणधर्म विकतच्या तुपामध्ये नसतात. 


 

Web Title: ghee is really useful for weigt loss, how to do weight loss by eating ghee, 2 ways of eating ghee for weight loss, benefits of eating ghee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.