Join us

ओटीपोट सुटलं, मागचा भागही वाढला? ‘हा’ चिमूटभर मसाला पाण्यात मिसळून प्या, स्लिम-फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:08 IST

Ginger Turmeric And Black Pepper Drink To Reduce Belly Fat : अनेकदा असं पाहिलं जातं की जे लोक कमी खातात त्यांचे वजन जास्त असते.

पोटाची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही काही उपयोग  होत नाही. लोकांना असं वाटतं की लठ्ठपणा किंवा फॅट अशा लोकांमध्ये असतो ते जास्त प्रमाणात खातात. मोठं, थुलथुलीत पोट कमी न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात (Ginger Turmeric And Black Pepper Drink To Reduce Belly Fat). अनेकदा असं पाहिलं जातं की जे लोक कमी खातात त्यांचे वजन जास्त असते. बेली फॅट कमी न होण्यामागे फक्त डाएट कारणीभूत नसते तर पोट कमी न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. (Weight Loss Tips) 

पोट सुटण्याची कारणं

शरीरात हॉर्मोनल इंबेलेन्स असणं, ताण-तणाव, फिजिकल एक्टिव्हीटीज कमी असणं, जळजळं अशी अनेक कारणं बेली फॅट कमी न होण्यामागे असू शकतात. बेली फॅट कमी करण्यासाठी खाली दिलेल्या ड्रिंकचे सेवन करायला हवे. ज्यामुळे लटकणारं पोट कमी होईल. डायटिशियन नंदिनी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. नंदिनी या सर्टिफाईड न्युट्रिशनिस्ट आहेत.

थुलथुलित पोट आत घेण्यासाठी पाण्यात ३ पदार्थ मिसळून प्या

हळदीत करक्यूमिन असते ज्यामुळे पोट वेगानं कमी होण्यास मदत होते. शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिझ्म वेगानं वाढते. फॅट टिश्यूज कमी होतात. हे एका फॅट कटरप्रमाणे काम करते. आल्यातील थर्मोजेनिक गुण फॅट बर्निंगसाठी मदत करतात. आल्यात एंटी इफ्लेमेटरी गुणही असतात. ज्यामुळे इंफ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बेली फॅट कमी करण्यासही मदत होते.

थकवा येतो- व्हिटामीन B-12 कमी झालं? जेवणात या डाळीचं वरण खा, भराभर वाढेल व्हिटामीन B-12

काळ्या मिरीतील पिपेरिन,  हळदीतील करक्यूमिन अब्जॉर्बशन वाढवते. यामुळे इंफ्लेमेशन कमी होते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि फॅट बर्न होण्यासही मदत होते.  लिंबात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म दुरूस्त होतो. शरीर डिटॉक्स होते आणि बेली फॅट कमी होते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स