Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ऐन तिशीतच दिसतेय ढेरी ? करा आल्याचा एक सोपा उपाय, राहाल कायम स्लिम - ट्रिम...

ऐन तिशीतच दिसतेय ढेरी ? करा आल्याचा एक सोपा उपाय, राहाल कायम स्लिम - ट्रिम...

Drink this ginger water and reduce belly fat : Ginger water for weight loss : आजकाल कमी वयातच पोटाची ढेरी दिसू लागते त्यामुळे बॉडी शेप बिघडतो असे होऊ नये यासाठी खास साधा - सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2024 01:55 PM2024-06-17T13:55:46+5:302024-06-17T14:12:59+5:30

Drink this ginger water and reduce belly fat : Ginger water for weight loss : आजकाल कमी वयातच पोटाची ढेरी दिसू लागते त्यामुळे बॉडी शेप बिघडतो असे होऊ नये यासाठी खास साधा - सोपा उपाय...

Ginger Water For Weight Loss Drink This to Burn Stubborn Belly Fat & Bloating-Ginger Water For Fast Weight Loss | ऐन तिशीतच दिसतेय ढेरी ? करा आल्याचा एक सोपा उपाय, राहाल कायम स्लिम - ट्रिम...

ऐन तिशीतच दिसतेय ढेरी ? करा आल्याचा एक सोपा उपाय, राहाल कायम स्लिम - ट्रिम...

बदलती लाईफस्टाईल, खानपानाच्या बदलत्या सवयी, बैठं काम यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींना आमंत्रणच दिल जात. यात वजन वाढीची समस्या अनेकांना सतावते. वाढलेलं वजन कुणालाही आवडत नाही. काहीवेळा वजन वाढून अचानक आपली ढेरी दिसायला लागते. पुढे आलेल्या ढेरीमुळे आपली पर्सनॅलिटी तर खराब दिसतेच, सोबतच बॉडी शेप देखील बिघडवते. अशावेळी वजन कमी करण्यासाठी जिमिंग सोबतच काहीजण घरगुती उपाय करण्यावर जास्त भर देतात(Ginger Water Reduces Body Weight Gain and Improves Energy Expenditure in Rats).

वाढलेली ढेरी व वजन कमी करण्यासाठी अनेकजण डिटॉक्स वॉटर पितात. याचबरोबर काहीजण मेथी दाणे, जिरे, ओवा अशा वेगवेगळ्या बिया रात्रभर (Drink This to Burn Stubborn Belly Fat & Bloating- Ginger Water For Fast Weight Loss) भिजत ठेवून सकाळी त्याचे पाणी पिणे पसंत करतात. अकाली वाढलेलं वजन आणि पोट यांना कमी करण्यासाठी रोजच्या वापरातलं आलं फायदेशीर ठरत. आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरात आलं हे कायम असत. सर्दी - खोकला झाला असता आपण आल्याचा गरमागरम चहा पितो. याच आल्याचा उपयोग करुन आपण वाढलेलं वजन आणि ढेरी दोन्ही झटपट कमी करु शकतो. वाढलेलं वजन व ढेरी कमी करण्यासाठी आल्याचा वापर कसा करावा ते पाहूयात(Ginger Water For Weight Loss).

वजन व ढेरी कमी करण्यासाठी आलं फायदेशीर : -

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार आल्याचे पाणी वजन कमी करण्यास खूप मदत करते. आल्याच्या पाण्यासोबतच  व्यायाम आणि योग्य आहार घेतल्यास त्याचा अधिक परिणाम दिसून येतो. पोषण तज्ज्ञ डॉ. रचना श्रीवास्तव यांच्या मते, आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. आल्याचे पाणी प्यायल्यामुळे वजन कमी करण्यासोबतच बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची समस्या दूर होते. वाढलेलं वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी रोज आल्याचे पाणी प्यायल्यास, एका महिन्यात ३ ते ४ किलो वजन सहज कमी होऊ शकते. 

विद्या बालन करते  'नो रॉ फूड' डाएट, हे डाएट नेमकं आहे तरी काय ?  

आल्याचे पाणी कसे बनवावे ? 

१. एक ग्लास पाण्यांत रात्रभर आल्याचे तुकडे भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घेऊन आपण पिऊ शकता. 

२. १ ग्लास पाण्यांत २ टेबलस्पून किसलेलं आलं घालून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळवून घ्यावे. असे पाणी थोडे कोमट झाल्यावर प्यावे. 

३. आजकाल बाजारांत तयार जिंजर वॉटरचे ड्रॉप देखील सहज विकत मिळतात, हा आल्याचा अर्कच असतो. हे आल्याचे तयार ड्रॉप्स आपण गरम पाण्यात घालून ते पाणी पिऊ शकतो. 

लिंबू पाणी की ऍपल सायडर व्हिनेगर ? वजन कमी करण्यासाठी काय प्यावे? आहारतज्ज्ञ सांगतात....

तज्ज्ञ डॉ. रचना श्रीवास्तव सांगतात, आल्याचे पाणी बनवण्यासाठी नेहमी ताजे आलेच वापरावे, ताजे आले अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाणही भरपूर असते. याउलट सुकल्यानंतर आल्यामधील पोषक घटक कमी होतात. वाळलेले आले सुगंधी असते परंतु त्यातील जीवनसत्त्वांचे  प्रमाण कमी होते. याशिवाय, वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेले मॅक्रोन्यूट्रिएंट्स फक्त ताज्या आल्यामध्येच असतात. यामुळे नेहमी फ्रेश आले आणून त्याचे पाणी बनवून प्यावे. 

आल्याचे पाणी कधी प्यावे ?

आल्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर ठरते. याशिवाय, आपण जेवणानंतर अर्ध्या तासाने देखील आल्याचे पाणी पिऊ शकता. जेवणानंतर कोमट आल्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्याची प्रक्रियाही वेगाने होते.

Web Title: Ginger Water For Weight Loss Drink This to Burn Stubborn Belly Fat & Bloating-Ginger Water For Fast Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.