Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तब्येतीसाठी वरदान आहेत ५ साधेसोपे फूड कॉम्बिनेशन्स, रोज खा, पोट कमी होईल- राहा नेहमी निरोगी

तब्येतीसाठी वरदान आहेत ५ साधेसोपे फूड कॉम्बिनेशन्स, रोज खा, पोट कमी होईल- राहा नेहमी निरोगी

Great Food Combos for Losing Weight : लिंबू आणि पालकाची जोडी  शरीरासाठी बरीच फायदेशीर ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 01:07 PM2023-09-16T13:07:08+5:302023-09-16T15:21:00+5:30

Great Food Combos for Losing Weight : लिंबू आणि पालकाची जोडी  शरीरासाठी बरीच फायदेशीर ठरते.

Great Food Combos for Losing Weight : Five best food combinations you should eat daily | तब्येतीसाठी वरदान आहेत ५ साधेसोपे फूड कॉम्बिनेशन्स, रोज खा, पोट कमी होईल- राहा नेहमी निरोगी

तब्येतीसाठी वरदान आहेत ५ साधेसोपे फूड कॉम्बिनेशन्स, रोज खा, पोट कमी होईल- राहा नेहमी निरोगी

भारतात खाण्यापिण्यााच्या पदार्थात बरीच विविधता दिसू येते. आपण  रोज जे खातो त्यात बदल न करता काही उत्तम फूड कॉम्बिनेशन्स खाल्ले तर  शरीराला त्याचे दुप्पट फायदे मिळतील. (Great Food Combos for Losing Weight)  पारंपारीक फूड कॉम्बनेशन्स आहेत ज्यामुळे शरीराला भरपूर फायदे मिळतात. (Five best food combinations you should eat daily) डॉ. दिपीका यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

लिंबू आणि पालक (Lemon and Spinach)

लिंबू आणि पालकाची जोडी  शरीरासाठी बरीच फायदेशीर ठरते. पालकात आयर्न मोठ्या प्रमाणात असते.  लिंबातील व्हिटामीन सी शरीराला आयर्न शोषून घेण्यात मदत करते. म्हणून जेव्हाही तुम्ही पालकाचे सूप किंवा भाजी बनवाल तेव्हा लिंबाचा आहारात समावेश करा. 

टोमॅटो आणि ऑलिव्ह ऑईल (Tomato and Olive oil)

टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे फायटोकेमिकल्स असतात. ज्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. याशिवाय प्रोस्टेट आरोग्यात सुधारणा करून हृदय रोगाचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर टरते. यात  कॅरोटिनॉयड्स फॅट असल्यामुळे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून खाल्ल्यास याचे दुप्पट फायदे मिळतात. 

दही भात (Curd and Rice)

हे कॉम्बिनेशन मायक्रोबायल संतुलन चांगले ठेवते.  ही दही प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्त्रोत आहे. दही खाल्ल्याने पोटाचे त्रास दूर होतात. भातातील फायबर्स त्यात एड झाल्याने पचनाचे विकार उद्भवत नाहीत. यात एंटी ऑक्सिडेंट्स असल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि उर्जा मिळते. 

खजूर आणि दूध (Dates and Milk)

जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा अशक्तपणा आला असेल तर खजूर आणि दूध घ्या. यामुळे वजन वाढण्यास मदत होते. हाडांना बळकटी मिळते.  याशिवाय रक्ताची कमतरताही जाणवत नाही. शरीरात रक्तभिसारण व्यवस्थित होते. 

खरबूज साखर आणि गूळ (Muskmelon and Sugar)

खरबूज बरोबर गूळ किंवा साखर खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय तुम्ही केळ्यासह वेलची या फूड कॉम्बिनेशन्सचा आहारात समावेश करू शकता. याशिवाय एपल आणि पिनट बटर, दूधाबरोबर बदाम, ओट्स आणि बेरीज या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.  

Web Title: Great Food Combos for Losing Weight : Five best food combinations you should eat daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.