Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > हिरव्या रंगाची कॉफी, वेटलॉससाठी अतिशय उपयुक्त, बघा नेमका काय हा प्रकार- कशी करायची हिरवी कॉफी 

हिरव्या रंगाची कॉफी, वेटलॉससाठी अतिशय उपयुक्त, बघा नेमका काय हा प्रकार- कशी करायची हिरवी कॉफी 

Green Coffee Recipe: आपली ब्राऊन रंगाची कॉफी नेहमीचीच.. आता वजन कमी करण्यासाठी पिऊन बघा हिरव्या रंगाची कॉफी.. (green coffee for weight loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2022 08:10 AM2022-08-21T08:10:10+5:302022-08-21T08:15:01+5:30

Green Coffee Recipe: आपली ब्राऊन रंगाची कॉफी नेहमीचीच.. आता वजन कमी करण्यासाठी पिऊन बघा हिरव्या रंगाची कॉफी.. (green coffee for weight loss)

Green coffee for weight loss, How to do green coffee? Use of Broccoli coffee to control weight | हिरव्या रंगाची कॉफी, वेटलॉससाठी अतिशय उपयुक्त, बघा नेमका काय हा प्रकार- कशी करायची हिरवी कॉफी 

हिरव्या रंगाची कॉफी, वेटलॉससाठी अतिशय उपयुक्त, बघा नेमका काय हा प्रकार- कशी करायची हिरवी कॉफी 

Highlightsही हिरव्या रंगाची कॉफी वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. हे एक लो कॅलरी ड्रिंक असून यात भरपूर प्रमाणात फायबर असते.

वजन कमी करण्यासाठी सगळे प्रयत्न करून झाले, पण वजन काही कमी होण्याचं नाव घेत नाही, हा अनेकांचा अनुभव असतो.  कारण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात कुठेतरी आपलं स्वत:वरचं नियंत्रण सुटतं आणि मग व्यायाम, डाएट यात खंड पडतो.  असं झालं की एकदम बाऊन्स बॅक व्हावं त्याप्रमाणे वजन वाढतं आणि आपण पुन्हा पहिल्या पदावर येऊन पोहोचतो. वजन आटोक्यात (How to control weight) ठेवायचं तर आहार आणि त्याच्या जोडीने व्यायाम करणं गरजेचं आहेच. त्याला पर्याय नाही. पण आहारातून काही पदार्थ आपण नक्कीच असे घेऊ शकतो की जे पचन क्रिया, चयापचय क्रिया (digestion and metabolism) सुरळीत करतील आणि त्याद्वारे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येईल. त्यापैकीच एक पदार्थ आहे हिरव्या रंगाची कॉफी (Green coffee or broccoli coffee for weight loss). 

 

कॉफीचा हा नवा प्रकार ऐकून थोडंसं आश्चर्य वाटणं साहजिक आहे. कारण आपल्याला एकतर आपला हिरव्या रंगाचा ग्रीन टी माहिती असतो किंवा मग नेहमीची चॉकलेटी रंगाची कॉफी. पण ही हिरव्या रंगाची कॉफी वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. हिरव्या रंगाची कॉफी म्हणजे ब्रोकोली कॉफी. ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्यावतीने करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली कॉफी हा एक उत्तम पर्याय होऊन शकतो. याविषयी एका हिंदी वाहिनीला माहिती देताना आहारतज्ज्ञ निखिल वत्स म्हणाले की ब्रोकोली कॉफी हे एक लो कॅलरी ड्रिंक असून यात भरपूर प्रमाणात फायबर असते. ब्रोकोली ही अशी भाजी आहे, ज्यात वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारे अनेक महत्त्वाचे पोषकतत्त्व असून मायक्रोन्युट्रियंट्सही भरपूर प्रमाणात असतात. 

 

कशी करायची ब्रोकोली कॉफी
- सगळ्यात आधी ब्रोकोलीचे छोटे- छोटे काप करून ते उन्हात काही दिवस वाळू द्या.
- ब्रोकोली चांगली वाळली की त्याची पावडर करून एका डब्यात ठेवून द्या.
- कपभर गरम दुधात एक चमचा ब्रोकोली पावडर टाकून असे दूध म्हणजेच हिरवी कॉफी नियमित घ्या. 


 

Web Title: Green coffee for weight loss, How to do green coffee? Use of Broccoli coffee to control weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.