चणे आणि गूळ हे पौष्टीक पदार्थांपैकी एक आहेत. गुळ आणि चणे खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात. गुळात कॅलरीज कमी असतात यामुळे वजन वाढत नाही. म्हणूनच गुळाकडे एक हेल्दी पर्याय म्हणून पाहिलं जातं. चणे आणि गुळ खाल्ल्याने वजन वाढतं का असाही प्रश्न लोकांना पडतो. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी, पोषण मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. (Here Are Some Health Benefits of Eating Roasted Chana)
गूळ आणि चणे खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
जर तुम्ही दररोज भाजलेल्या चण्यांबरोबर गूळ खाल्ल्यास तुमचे वजन वाढू शकते. कारण भाजलेल्या हरभऱ्यात कच्च्या हरभऱ्यापेक्षा जास्त कॅलरीज असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दररोज याचे सेवन करू नये, तर ज्यांना वजन वाढवायचे आहे आणि ज्यांची शरीरयष्टी खूपच बारीक आहे त्यांनी हा आहार घ्यावा.
ओटीपोट सुटलंय, व्यायामाचा कंटाळा येतो? अंथरुणात पडून रोज १ योगासन करा; स्लिम होईल पोट
चण्यांमध्ये थायमिन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी पोषक तत्व असतात. इम्यूनिटी वाढवण्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरते. चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. डायबिटीस असलेल्यांनी आहारात याचा समावेश करावा. चणे, गुळात आयर्नचे प्रमाण जास्त असते. याच्या सेवनाने रक्ताची कमतरता भासत नाही. गूळ आणि चणे खाल्ल्याने मांसपेशी मजबूत होतात. हृदयाचे आजार असलेल्यांनी गुळाचे सेवन करावे. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका टाळता येतो.
गूळ आणि हरभरा यांचे मिश्रण तुमच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करते कारण त्यात भरपूर प्रथिने असतात जे स्नायूंच्या आरोग्यासाठी चांगले असतात. गूळ पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे, जो तुमचे स्नायू तयार करण्यास आणि चयापचय वाढवण्यास मदत करतो.
भात खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही? भात खाण्याचा शरीरावर ‘असा’ परिणाम होतो, तज्ज्ञ सांगतात..
चणे गुळासोबत खाल्ल्याने दात मजबूत होतात. यामध्ये असलेले फॉस्फरस दात मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येकी 10 ग्रॅम गुळात 4 मिलीग्राम फॉस्फरस आणि हरभऱ्यामध्ये 168 मिलीग्राम प्रति 100 ग्रॅम असते. मानवी शरीरात फॉस्फरसची किमान आवश्यकता 700 मिलीग्राम आहे. हाडांची ताकद वाढवण्यासाठी फॉस्फरसची गरज असते. मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर तुम्ही अर्धी वाटी चणे आणि गुळाचे मिश्रण खाऊ शकता