सतत वाढणार वजन ही आजकालची एक कॉमन समस्याच झाली आहे. वाढते वजन कमी करण्यासाठी आपण सगळेच अनेक उपाय कायम करत असतो. काहीवेळा वजन कमी करताना ते पटकन (Harmful Effects Of Losing Weight In Some Days ) कमी होत तर काहीवेळा वजन कमी करण्यासाठी बरीच (Rapid Weight Loss Side Effects To Know) वर्ष खर्ची करावी लागतात. जेव्हा अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही तेव्हा आपण वजन कमी करण्यासाठीचा शॉर्टकट किंवा इन्स्टंट पर्याय शोधतो(The Dangers of Losing Weight Too Quickly).
आपण बरेचदा एखाद्या व्हायरल व्हिडीओ किंवा इंस्टाग्रामवरील रिल्समध्ये पाहिले असेल की, अमुक एका व्यक्तीने १० दिवसांत ५ किलो वजन कमी केले किंवा १५ दिवसांत व्हा बारीक, २० दिवसांचा डाएट प्लॅन वजन करेल कमी. अशा अनेक जाहिराती किंवा व्हिडीओ आपण बघतो. परंतु खरेच अशा पद्धतीने वजन कमी होते का? किंवा अशा प्रकारे वजन कमी करणे (What Happens When You Lose a Lot of Weight In Some Days) आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का ? अशा पद्धतीने झटपट वजन कमी केल्याने वजन तर कमी होते परंतु त्याचे आपले शरीर किंवा आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात ते पाहूयात.
कमी कालावधीत झटपट वजन कमी केल्याने नेमकं काय होत ?
१. पचनासंबंधित समस्या :- कमी कालावधीत जास्त वजन कमी केल्याने आतड्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, झटपट वजन कमी करण्याच्या नादात काहीजण कर्ब्स आणि फॅट्स असलेले पदार्थ खाणे बंद करतात. परंतु हे दोन्ही घटक आतड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
२. त्वचा आणि केसांच्या आरोग्यात बदल :- अगदी कमी कालावधीत झटपट वजन कमी केल्याने शरीरात अनेक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. त्यामुळे त्वचा आणि केसांवरही याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे केसगळती वाढू शकते. त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसू लागते सोबतच मुरुम. पुरळ आणि काळी वर्तुळे देखील त्वचेवर येऊ शकतात.
चेहऱ्याला बेसन लावताना दुधात कालवावे की दह्यात? बघा नक्की काय लावल्याने चमकतो चेहरा...
३. हाडे आणि स्नायूंचे नुकसान :- चुकीच्या आहारामुळे हाडे आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. यामुळे शरीरातील हाडे आणि स्नायूंचे दुखणे आणि हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत शरीरात अशक्तपणा येऊ लागतो आणि दुखापतीचा धोका वाढतो.
४. थकवा, अशक्तपणा येणे :- कमी वेळात जलद गतीने वजन कमी केल्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. त्यामुळे शरीरात अशक्तपणा येऊ शकतो. थोडेसे काम करूनही थकवा जाणवू शकतो. अशा परिस्थितीत कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. अतिआळस आणि अशक्तपणामुळे दैनंदिन कामे करणेही तुमच्यासाठी कठीण होऊ शकते.
५. पोषक तत्वांची कमतरता :- जर तुमचे वजन कमी कालावधीत अगदी पटकन खूप कमी झाले तर तुम्हाला अनेक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. यामुळे तुमच्या शरीरातील अनेक पोषक तत्व एकाच वेळी कमी होऊ शकतात. यामुळे तुम्ही अनेक आजारांनाही बळी पडू शकता.
रात्रीचा डाळ - भात उरला ? १५ मिनिटांत करा सकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत धिरडं, घ्या सोपी रेसिपी...