Join us  

Harvard study : अरे व्वा! आहारात 'या' ५ पदार्थांचा समावेश केल्यास उत्तम दीर्घायुष्य मिळणार; हार्वर्ड रिसर्चमधून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 1:53 PM

Harvard study about health : या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार  दिवसातून २ फळं आणि  ३  भाज्या खाल्यानं तुम्ही दीर्घकाळ  निरोगी राहू शकता. म्हणजेच नॉनव्हेज नाही तर व्हेज फूड तुमच्यासाठी जास्त फायद्याचे ठरतं. 

ठळक मुद्देया यादीत स्टार्च असलेल्या भाज्या, मटार, मक्का आणि बटाटा यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त फळांच्या रसांचाही समावेश होता.

सध्याच्या काळात आपण खाण्यापिण्याच्या गोष्टींबाबत जास्त विचार करतोय. कोरोना संक्रमणापासून बचावासाठी जास्तीत जास्त पोषक तत्वाचा आहारात कसा समावेश करता येईल याचा विचार करताना लोक दिसून येत आहेत. अलिकडेच अमेरिकन हेल्थ एसोसियेशननं एक रिसर्च केला आहे. यात हार्वर्ड टी एच स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या तज्ज्ञांचा सहभाग होतात. या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार  दिवसातून २ फळं आणि  ३  भाज्या खाल्यानं तुम्ही दीर्घकाळ  निरोगी राहू शकता. म्हणजेच नॉनव्हेज नाही तर व्हेज फूड तुमच्यासाठी जास्त फायद्याचे ठरतं. 

या अभ्यासाचे प्रमुख लेखक डोंग डी. वांग जे एपिडेमियोलॉजिस्ट, न्यूट्रिशनिस्ट आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलचे फॅकल्टी मेंबर आहेत. त्यांनी सांगितले की, ''नमुद केलेले ५ पदार्थ जुन्या आणि गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतात. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कोणत्याही प्रकारची फळं आणि भाज्या खायला सुरूवात करायची. सगळ्याच भाज्या आणि फळं शरीरासाठी गुणकारक असतात. पण या रिसर्चमध्ये नमुद करण्यात आलेली फळं आणि भाज्या तुमच्यासाठी अधिक फायद्याच्या ठरू शकतात. ''

हिरव्या, ताज्या पालेभाज्या, सॅलेड्स

बीटा कॅरोटीन तत्व असलेल्या भाज्या 

फळं आणि बेरीज

असा करण्यात आला रिसर्च

वांग यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या तज्ज्ञ मित्रांनी मिळून १९८४ ते २०१४ पर्यंत जवळपास १ लाख पुरूष आणि महिलांचा डेटा एकत्र केला. यादरम्यान ते  नेहमीच  दोन, चार वर्षांनी लोकांना जेवणासबंधीत प्रश्न विचारत होते. याव्यतिरिक्त त्यांनी जगभरातील २० लाख लोकांच्या फळं आणि भाज्यांच्या सेवनाचा डेटा एकत्र केला होता. यावर आधारित हा रिसर्च करण्यात आला. 

या फळं आणि भाज्यांचे परिणाम जास्त प्रभावी 

या यादीत स्टार्च असलेल्या भाज्या, मटार, मक्का आणि बटाटा यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त फळांच्या रसांचाही समावेश होता. नवीन रिसर्चनुसार स्टार्च असलेल्या भाज्या, पल्प फ्रूट्स, आजारांपासून वाचवतात. याशिवाय दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होते. 

फक्त हे ५ पदार्थ खावेत का?

तुमच्यापैकी अनेकजण असा विचार करत असतील  की हे ५ पदार्थ इतके फायदेशीर आहेत. तर आपण इतर पदार्थ  खायचे की नाही.  तुम्ही नक्कीच इतर पदार्थही खाऊ शकतात. यामुळे तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहिल. 

ड्रायफ्रुट्स खाणं फायद्याचं

नट्स किंवा ड्रायफ्रूटच्या फायद्यांविषयी बरेच संशोधन केले गेले आहे. अलीकडील संशोधन जे बोस्टन ग्लोबने केले आहे. त्यात असे नमूद केले आहे की मूठभर नट्सचे सेवन केल्याने आपण बर्‍याच दिवसांसाठी निरोगी राहता. या व्यतिरिक्त आपण हृदयरोगांपासून देखील पूर्णपणे संरक्षित राहता. एवढेच नव्हे तर संशोधनानुसार असे लोक जे नट्स सेवन करत नाही ते इतर लोकांच्या तुलनेत जास्त बारीक असतात. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, महिला रुग्णालय आणि कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात असेही दिसून आले आहे की नट्सचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

असे बरेच लोक आहेत जे या संशोधनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. पण हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मधील न्यूट्रिशन डिपार्टमेंटचे अध्यक्ष असलेल्या वॉल्ट विलेट यांनी ड्रायफ्रुट्समधील पोषक घटकांना अधिक फायदेशीर मानले जाते. नट्समध्ये अँटीऑक्सिडेंट्स, अनसॅच्यूरेटेड फॅट्स, फायबर, प्रथिने, खनिजे आणि फायटोस्टेरोल्स यासारखे पोषक असतात हे लक्षात घ्यायला हवं. 

पनीर 

प्राध्यापक विलेट देखील अधिक नट्स सेवन करण्याबद्दल लोकांना सांगितले की, गुणधर्म जाणून घेतल्यानंतर तुम्ही याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू करायला नको. म्हणूनच यासह आपण इतर निरोगी पदार्थांचा विचार करू शकता, जसे की दही, चिकन, पनीर, शेंगा या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. 

मेडिटेरियन डाएट

सध्याच्या काळात आजही, मेडिटेरियन डाएट आहाराबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. परंतु मेडिटेरियन डाएट आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो. तज्ञ म्हणतात की हा आहार नियमितपणे घेतल्यास हृदयाशी संबंधित आजार आणि कर्करोगाचा त्रास टाळता येतो. काही वर्षांपूर्वी एक संशोधन समोर आले होतं. ज्यामध्ये काही स्त्रिया नियमितपणे मेडिटेरियन डाएट घेत होत्या. त्यांच्या आहारात मर्यादित प्रमाणात ऑलिव्ह ऑईल, सोयाबीन, मासे, फळ भाज्या आणि वाइन यांचा समावेश होता. अशा आहाराचे पालन करणार्‍या महिला अधिक निरोगी असल्याचे आढळले. हे संशोधन वर्ष 2014 मध्ये ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले होते.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्ससंशोधन