सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायाम, कोणी डाएट तर कोणी घरगुती उपाय करताना दिसून येतं. कारण कोरोनाकाळात जास्तीत जास्त वेळ घरात बसून घालवावा लागत असल्यानं शरीरावरची अतिरिक्त चरबी वाढलेली दिसून येतेय. नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार रोज विशिष्ट वेळेला चॉकलेट खाल्ल्यानं तुम्ही वाढलेलं वजन कमी करू शकता.
हार्वर्ड गॅझेटमधील एका अहवालानुसार, विशिष्ट वेळी चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. परंतु या अहवालात दुधाच्या चॉकलेटचा म्हणजेच व्हाईट चॉकलेटचा वापर उपयुक्त ठरला आहे. मिल्क चॉकलेटसह वजन कमी होण्याची शक्यता दर्शवणारा हा अभ्यास काय सांगतो जाणून घ्या.
वेट लॉस आणि चॉकलेट यांचा संबंध कसा?
The FASEB Journal मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाचे लेखन मान्यता प्राप्त Brigham and Women's Hospital चे दोन प्राध्यापक Frank A.J.L. Scheer आणि Marta Garaulet यांनी केले आहे. त्यांनी स्पेनच्या एका महाविद्यालयासह मेनोपॉझ झालेल्या १९ महिलांना सकाळी (उठल्यानंतर १ तासाच्या आत) रात्री ( झोपण्याआधी १ तास) १०० ग्राम चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर चॉकलेटच्या सेवन करणारे आणि न करणारे अशा लोकांचे निरिक्षण करण्यात आले आणि परिणाम नोंदवले गेले.
सकाळी किंवा रात्रीच्यावेळी मिल्क चॉकलेट खाल्ल्यानं वजन वाढत नाही. सकाळी किंवा रात्री चॉकलेट खाल्ल्यानं भूक आणि डाएट, मायक्रोबायोटा कंपोजिशन, झोपेसह इतर गोष्टींवर सकारात्मक परिणाम होतो. सकाळी मिल्क चॉकलेटचं सेवन केल्यानं वजन कमी होण्यासह रक्तातील ग्लूकोजचा स्तर कमी करण्यास मदत होते. संध्याकाळी किंवा रात्रीच्यावेळी मिल्क चॉकलेट खाल्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी रेस्टिंग किंवा व्यायाम मेटाबॉलिज्ममध्ये फरक दिसून येतो.
तज्ज्ञ स्कीअर म्हणतात की आमच्या संशोधनात असे दिसून आले आहे की 'आपण काय खातो' आणि 'आपण' कधी खातो याचा संबंध वजन कमी करण्याशी असतो. त्याच वेळी, गॅरालेट म्हणतात की वाढत्या कॅलरीचे प्रमाण असूनही, या अभ्यासातील सहभागींचे वजन वाढले नाही. मिल्क चॉकलेटचे सेवन चरबी जाळण्यात आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
याआधीच्या रिसर्च दरम्यान, हार्वर्ड टी एच स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसातून २ फळं आणि ३ भाज्या खाल्यानं तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. म्हणजेच नॉनव्हेज नाही तर व्हेज फूड तुमच्यासाठी जास्त फायद्याचे ठरतं. या अभ्यासाचे प्रमुख लेखक डोंग डी. वांग जे एपिडेमियोलॉजिस्ट, न्यूट्रिशनिस्ट आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलचे फॅकल्टी मेंबर आहेत. त्यांनी सांगितले की, ''नमुद केलेले ५ पदार्थ जुन्या आणि गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतात. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कोणत्याही प्रकारची फळं आणि भाज्या खायला सुरूवात करायची. सगळ्याच भाज्या आणि फळं शरीरासाठी गुणकारक असतात. पण या रिसर्चमध्ये नमुद करण्यात आलेली फळं आणि भाज्या तुमच्यासाठी अधिक फायद्याच्या ठरू शकतात. ''
या फळं आणि भाज्यांचे परिणाम जास्त प्रभावी
या यादीत स्टार्च असलेल्या भाज्या, मटार, मक्का आणि बटाटा यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त फळांच्या रसांचाही समावेश होता. नवीन रिसर्चनुसार स्टार्च असलेल्या भाज्या, पल्प फ्रूट्स, आजारांपासून वाचवतात. याशिवाय दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होते.
फक्त हे ५ पदार्थ खावेत का?
तुमच्यापैकी अनेकजण असा विचार करत असतील की हे ५ पदार्थ इतके फायदेशीर आहेत. तर आपण इतर पदार्थ खायचे की नाही. तुम्ही नक्कीच इतर पदार्थही खाऊ शकतात. यामुळे तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहिल.