चांगल्या आरोग्यासाठी सगळ्यांनाच संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स, डाळी, फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असायलाच हवा. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासह, हृदयाच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नट्सच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. अनेक अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार नट्स फायबर्स, एंटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्सचे चांगले स्त्रोत आहे.
हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की अक्रोडचे नियमित सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. जर ते आठवड्यातून पाच वेळा देखील सेवन केले गेले तर ते तुमचे आयुष्य वाढू शकते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की दीर्घायुष्यासह शरीर निरोगी राहण्यासाठी सर्व लोकांनी याचे सेवन केले पाहिजे.
अक्रोडाच्या सेवनाचे फायदे
जर्नल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, सर्व लोकांनी आठवड्यातून किमान पाच दिवस अक्रोड खाणे आवश्यक आहे. हार्वर्ड T.H. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या तज्ञांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या संशोधनातून दिसून आले की, आठवड्यातून 5 दिवस मूठभर (सुमारे 28 ग्रॅम) अक्रोडाचे सेवन केल्यास इतर लोकांच्या तुलनेत 1.3 वर्षांनी आयुष्य वाढवता येऊ शकते.
आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो
अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की जे लोक नियमितपणे अक्रोडचे सेवन करतात त्यांच्यात आरोग्याच्या तक्रारींमुळे मृत्यूचा धोका 14 टक्के कमी असतो तसंच हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचा धोका 25 टक्के कमी असतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला अक्रोड खाणं फारसे आवडत नसेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचे सेवन केल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो.
संशोधन काय सांगतं?
हार्वर्डच्या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार तज्ज्ञ सांगतात की, निरोगी जीवनशैलीसाठी आहारात अक्रोडाचा समावेश करायला हवा. अक्रोड प्रोटीन्स, फायबर्स, मॅग्नेशियम, एंटीऑक्सिडेंट्स ओमेगा-३ चे चांगले स्त्रोत आहे. एंटीऑक्सिडेंट्सयुक्त पदार्थांचे सेवन वजन कमी करण्यापासून कॅन्सरचा धोका कमी करण्यसाठी फायदेशीर ठरतं.
टाईप २ डायबिटीस आणि कॅन्सरपासून बचाव
अक्रोडचे सेवन टाईप -२ डायबिटीस आणि कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करते. अभ्यास दर्शवतात की अक्रोड वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहेत, त्यामुळे ते टाइप -२ डायबिटीसचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. जास्त वजन असणे उच्च रक्तातील साखरेशी संबंधित आहे. त्याच वेळी प्राणी आणि मानवांवर केलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळले की अक्रोड खाल्ल्याने ब्रेस्ट, प्रोस्टेट आणि कोलोरेक्टल कॅन्सरसह इतर अनेक प्रकारच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.