Join us  

उपवास करुन वजन कमी करायचं मग खा भरपूर शिंगाडा, शिंगाड्याची फळं म्हणजे तर तब्येतीसाठी वरदान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 7:35 PM

Chestnuts & Weight Loss: Nutritional Insights & Benefits : वजन कमी करण्यासाठी शिंगाडा फळं खाण्याचे आहेत अनेक फायदे, वजन कमी करण्यापासून ते कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवण्यापर्यंत करते मदत...

सध्या आपण बाजारांत गेला असता आपल्याला काळ्या कवचाचे आतून पांढरे असलेले फळं पाहायला मिळते. हिवाळ्यात येणारे हे शिंगाड्याचे फळं आपल्या सर्वांच्याच आवडीचे फळ आहे. बाजारांत किंवा रस्त्याच्या कडेला ठेल्यावर मिळणारे हे फळ पाहून आपण सगळेच ते हमखास विकत घेतो. पाण्यात उगवलेले हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, त्याची चव गोड आणि अतिशय चवदार असते. शिंगाडा उपवासाला खाणेही अत्यंत फायद्याचे असते(Do chestnuts help you lose weight?).

शिंगाड्यामध्ये (5 Surprising Benefits of Water Chestnuts Plus How to Use Them) कार्बोहायड्रेट, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. हे फळ खायला कुरकुरीत व चविष्ट लागते. हे फळ आपण कच्चे, उकडवून किंवा त्यापासून अनेक पदार्थ तयार करून खाऊ शकतो. शिंगाड्याचे (Singhada Benefits: Weight Loss And 5 Other Reasons To Eat Singhadas ) पीठ आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते आणि उपवासाच्या वेळी हे अधिक प्रमाणात खाल्ले जाते. शिंगाडा हे असे एक फळ आहे जे आपले आरोग्य (From being heart-friendly to promoting weight loss, here are 5 benefits of singhara) चांगले ठेवण्यासाठी आवर्जून खाल्लेच पाहिजे.यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात, जे वजन कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरतात. हे फळ आपल्या शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या सर्व गरजा पूर्ण करते. तसेच शिंगाडा खाल्ल्याने आपले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते याचबरोबर आपले शरीर आतून तंदुरुस्तही ठेऊ शकता. वजन कमी करण्यासाठी शिंगाडा हे फळ का व कसे खावे यासाठी काही टिप्स फॉलो करुयात(Water Chestnuts: A Crunchy Superfood For Weight Loss).

वजन कमी करण्यासाठी शिंगाडे का खावेत ? 

१. कॅलरीजचे प्रमाण कमी :- जर आपण वजन कमी करत असाल तसेच या दरम्यान आपण जे अन्नपदार्थ खात आहात त्यांच्या कॅलरीज मोजून - मापून खात असाल तर शिंगाडा हे सर्वोत्तम फळ असू शकते. कारण या फळात कॅलरीजचे प्रमाण हे अतिशय कमी असते. १०० ग्रॅम शिंगाड्यामध्ये फक्त ९७ इतक्या कॅलरीज असतात. आपल्या वेटलॉस डाएटमध्ये आपण हे फळ रोज खाऊ शकता. 

२. अँटिऑक्सिडंट समृद्ध असे फळ :- शिंगाडा या फळांत अँटिऑक्सिडंटचे प्रमाण हे भरपूर असते. यातील अँटिऑक्सिडंटसमुळे वजन कमी करण्यात, स्ट्रेस कमी करण्यात, तसेच दिवभर आपले शरीर अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यास मदत होते. हे फळ रोज खाल्ल्याने आपल्या पचनक्रियेचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. पचनक्रियेचे कार्य योग्य पद्धतीने सुरु असल्यामुळे अनेक आजार हे दूर होतात. याचबरोबर पचनक्रियेचा वेग वाढून कमी वेळात झटपट वजन कमी होते. 

नवरात्रीच्या उपवासादरम्यान असे करा डाएट, नऊ दिवसात कणभरही वजन वाढणार नाही...

३. फायबरचे प्रमाण अधिक असते :- शिगाड्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे पोट निरोगी ठेवते आणि वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. हे फळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि शरीराला सूज येणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. यामध्ये असलेले फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते, ज्यामुळे आपल्याला जास्त खाण्यापासून रोखले जाते. यासोबतच पोट साफ करण्यासाठी देखील हे फळ फायदेशीर ठरते. 

४. हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर :- शिंगाड्यामध्ये असलेले पोषक तत्व हृदयाला निरोगी ठेवतात. यामध्ये असलेले पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे रक्षण करण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी - ६ अमीनो अ‍ॅसिड होमोसिस्टीनची पातळी नियंत्रित करण्यास फायदेशीर ठरते, ज्यामुळे हृदयरोगाची शक्यता कमी होते. हे फळं खाल्ल्याने रक्ताभिसरण चांगले राहण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते.

५. अशक्तपणा व थकवा येत असल्यास फायदेशीर :- या फळामध्ये असणारे पोटॅशियम, व्हिटॅमिन बी - ६, मॅग्नेशियम, कॉपर आणि राइबोफ्लेविन सारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीरातील कमजोरी, थकवा, अशक्तपणा दूर करतात आणि शरीराला ऊर्जा देतात. शिंगाड्याच्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण हे भरपूर असते, यामुळे हे फळ खाल्ल्याने शरीर हायड्रेटही राहते.

उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे ? तज्ज्ञ सांगतात, मीठ खाणार असाल तर...

उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा...

वजन कमी करण्यासाठी नेमक कोणत्या पद्धतीने शिंगाडा हे फळ खावे ? (How to eat chestnut for weight loss)

१. शिंगाडा आपण पाण्यांत किंचित मीठ घालून उकडवून खाऊ शकता. 

२. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये आपण कच्चे शिंगाडे खाऊ शकता. 

३. यासोबतच आपण शिंगाड्याच्या पिठापासून वेगवेगळे डाएटचे पदार्थ बनवून ते देखील खाऊ शकता. 

४. शिंगाडे उकडवून घेतलेले पाणी देखील आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्रीवेट लॉस टिप्स