Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > क्या आपने गुलाबी नमक खाया है? मग आता खा, हिमालयीन गुलाबी मिठाचे फायदे खास !

क्या आपने गुलाबी नमक खाया है? मग आता खा, हिमालयीन गुलाबी मिठाचे फायदे खास !

हिमालयीन पिंक सॉल्ट किंवा हिमालयीन गुलाबी मीठ हा प्रकार तुम्ही ऐकलाय का किंवा खाऊन पाहिला आहे का, नसेल खाल्ला कधी तर खाण्यास नक्की सुरुवात करा कारण हे मीठ अतिशय आरोग्यदायी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 01:35 PM2021-10-14T13:35:08+5:302021-10-14T13:36:37+5:30

हिमालयीन पिंक सॉल्ट किंवा हिमालयीन गुलाबी मीठ हा प्रकार तुम्ही ऐकलाय का किंवा खाऊन पाहिला आहे का, नसेल खाल्ला कधी तर खाण्यास नक्की सुरुवात करा कारण हे मीठ अतिशय आरोग्यदायी आहे.

Have you eaten pink salt? So eat now, the benefits of Himalayan rock pink salt are special! | क्या आपने गुलाबी नमक खाया है? मग आता खा, हिमालयीन गुलाबी मिठाचे फायदे खास !

क्या आपने गुलाबी नमक खाया है? मग आता खा, हिमालयीन गुलाबी मिठाचे फायदे खास !

Highlightsहिमालयीन गुलाबी मीठ सामान्य मीठाप्रमाणे जेवणात किंवा एखादा पदार्थ सिझनिंग करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

हिमालयीन गुलाबी मीठ हे एक प्रकारच्या खडे मीठाचा प्रकार आहे, जो पाकिस्तानच्या पंजाब भागातील हिमालयाच्या पायथ्याजवळ आढळतो. हे मिठाचे सर्वात शुद्ध रूप आहे, कारण ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. रासायनिक प्रकारानुसार हे साधारण मीठासारखेच आहे, ज्यामध्ये ९८ टक्के सोडियम क्लोराईड आहे. हे मीठ गुलाबी रंगाचे असून ते साध्या मिठापेक्षा अधिक आरोग्यदायी आहे असे समजतात. रंगामुळे या मीठाला गुलाबी मीठ म्हणून ओळखले जाते. जेवणात मीठाचे प्रमाण जास्त असेल तर अनेक व्याधी होतात, हे आपण जाणतोच. म्हणूनच अतिमीठामुळे होणाऱ्या व्याधी टाळण्यासाठी किंवा डाएटसाठी आजकाल हिमालयीन मीठ वापरायला सांगतात. नेहमीच्या मीठापेक्षा हिमालयीन गुलाबी मीठ जरा महाग असते. 

 

हिमालयीन गुलाबी मीठामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यासारखे खनिज घटकदेखील असतात. हे मीठ कोणत्याही प्रकारे आरोग्यासाठी नुकसानकारक नाही. असे मानले जाते की, गुलाबी हिमालयीन मीठात सामान्य मीठापेक्षा कमी सोडियम असते. परंतु, हे खरे नाही. त्यामध्ये ९८ टक्के सोडियम क्लोराईड असते. याचाच अर्थ त्यामध्ये समान प्रमाणात सोडियम असते. हे मीठ अधिक नैसर्गिक मानले जाते. क्लेम्पिंग टाळण्यासाठी नेहमीचे मीठ अधिक रिफाईंड केले जाते. त्यात अनेक घटक मिसळले जातात. परंतु, हिमालयीन मीठ रिफाईंड केले जात नाही आणि त्यात कोणतेही घटक मिसळले जात नाहीत. 

 

हिमालयीन मीठ आपल्या शरीरात द्रव संतुलन राखण्यासाठी आणि निर्जलीकरण रोखण्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे म्हणणे योग्य आहे, कारण द्रव संतुलन राखण्यासाठी आपल्या शरीराला सोडियमची आवश्यकता आहे. थायरॉईड फंक्शन्स आणि सेल मेटाबोलिझमसाठी आयोडीन महत्वाचे आहे. गुलाबी हिमालयीन मीठात आयोडीनयुक्त मीठापेक्षा कमी आयोडीन असते. याचमुळे आयोडीनची कमतरता असलेल्या लोकांना, या गुलाबी मीठाबरोबर आयोडीनयुक्त मीठ देखील खाल्ले पाहिजे.

 

हिमालयीन गुलाबी मीठ सामान्य मीठाप्रमाणे जेवणात किंवा एखादा पदार्थ सिझनिंग करण्यासाठी वापरले जाऊ शकते. सॅलडवरती शिंपडायला याहून चांगले मीठ नाही, असे प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांचे मत आहे. लोक हे मीठ अंघोळीसाठी देखील वापरतात किंवा या मीठापासून बनवलेला दिवा किंवा मेणबत्ती घरात लावतात.
या मीठाने स्नायूंना संकुचित करून आराम मिळतो, डिहायड्रेशन रोखले जाते. 

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
 

Web Title: Have you eaten pink salt? So eat now, the benefits of Himalayan rock pink salt are special!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.