Join us  

कलिंगडाचं कूल सरबत ट्राय करा, जो दिल का रखे खास खयाल, वो इस सरबतसे नहीं करता इन्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 3:47 PM

डोळे, हाडं, हदय आणि स्नायूंचं आरोग्य जपण्यासाठी कलिंगड हे खूप उपयूक्त ठरतं. कलिंगडचं सरबत यासाठी जास्त प्रभावी मानलं जातं. पण बाहेर मिळणारं, अति साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह घातलेलं कलिंगडचं सरबत  हे हानिकारक ठरु शकतं. घराच्याघरी तयार केलेलं कलिंगडचं सरबत आरोग्य राखण्यास फायदेशीर ठरतं.

ठळक मुद्देकलिंगडमधे लायकोपेनी नावाचं एक प्रभावी अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट असतं. हदयाच्या आरोग्यासाठी ते अतिशय उपयुक्त असतं. हाडांमधून रक्तात कॅल्शिअम जातं या प्रक्रियेत हाडांचं जे नुकसान होतं ते कलिंगडमधील कॅल्शिअम या घटाकानं भरुन निघतं.कलिंगडच्या रसात मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं. आपल्या शरीरातील स्नायूंच्या ंसहज हालचालीसाठी हे खनिज खूप महत्त्वाचं असतं.

 उन्हाळा म्हटलं  की आवर्जून कलिंगड खाण्याचे दिवस. फळांमधे कलिंगड हे सगळयांचं आवडतं फळ. रसरशीत, लाल रंगाचं आणि गोड चवीचं कलिंगड उन्हाची काहिली कमी करतं. उन्हामुळे सतत लागणारी तहान नियंत्रित करण्याचं काम कलिंगड करत असतं. पण कलिंगड खातांना ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणून खाल्लं जातं असं नाही  तर ते जिभेला आणि डोळ्यांना भावतं म्हणून खाल्लं जातं. पण कलिंगडमधे असलेल्या पोषक तत्त्वांमुळे कलिंगड हे अनेक कारणांनी आरोग्यास फायदेशीर ठरतं. डोळे, हाडं, हदय आणि स्नायूंचं आरोग्य जपण्यासाठी कलिंगड हे खूप उपयुक्त ठरतं. कलिंगडचं सरबत यासाठी जास्त प्रभावी मानलं जातं. पण बाहेर मिळणारं, अति साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह घातलेलं कलिंगडचं सरबत  हे हानिकारक ठरु शकतं. घराच्याघरी तयार केलेलं कलिंगडचं सरबत आरोग्य राखण्यास फायदेशीर ठरतं.

कलिंगडचं सरबत पिण्याचे फायदे

-हदय निरोगी ठेवण्यासाठी कलिंगडच्या सरबताचा उपयोग होतो. कलिंगडमधे लायकोपेनी नावाचं एक प्रभावी अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट असतं. हदयाच्या आरोग्यासाठी ते अतिशय उपयुक्त असतं. शिवाय कलिंगडमधे सायट्रूलिन नावाचं अमिनो अ‍ॅसिड असतं जे हदयाच्या स्नायूंना आराम देतं, रक्तप्रवाह सुधारतं आणि एकूणचं हदयाचं आरोग्य निरोगी ठेवतं. कलिंगडमधे असलेलं कॅरोटेनॉइडस हे हदयांच्या रक्तवाहिन्यांची काळजी घेतं. हा घटक हदयाच्या रक्तवाहिन्या कडक होण्यापासून रोखतो.

- कलिंगडमधे लायकोपेनीसोबतच कॅल्शिअम हे महत्त्वाचं खनिज असतं. हाडांमधून रक्तात कॅल्शिअम जातं या प्रक्रियेत हाडांचं जे नुकसान होतं ते कलिंगडमधील कॅल्शिअम या घटाकानं भरुन निघतं. यामूळे ऑस्टोपोरोसिस या हाडांच्या आजाराचा धोका टाळण्यासही मदत होते.

- कलिंगडच्या रसात मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं. आपल्या शरीरातील स्नायूंच्या सहज हालचालीसाठी हे खनिज खूप महत्त्वाचं असतं. आणि पोटॅशिअम हे खनिज इलेक्ट्रोलाइटसारखं कामं करतं. याची आवश्यकता आपल्या शरीराला श्रमाचं काम केल्यानंतर किंवा व्यायामानंतर विशेष असते. पोटॅशिअमची कमतरता पडल्यास स्नायू दुखतात, आखडतात. ही कमतरता भरुन काढण्याचं काम कलिंगडचं सरबत करतं. श्रमाच्या कामानंतर किंवा व्यायामानंतर तज्ज्ञ म्हणूनच कलिंगडचं ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

- कलिंगडमधील घटक हे जेव्हा शरीरात जातात तेव्हा त्याचं रुपांतर आर्गिनीन या महत्त्वाच्या अमिनो अ‍ॅसिडमधे होतं. आर्गिनीन ही इन्श्यूलिनची संवेदनशीलता नियंत्रित करतं. त्याचा परिणाम म्हणून मधुमेह होत नाही. किंवा ज्यांना तो आहे किंवा जे मधुमेह या आजाराच्या अगदी सीमेवर उभे आहेत त्यांचा मधुमेह नियंत्रणात राहातो.

घराच्याघरी कलिंगड सरबत कसं करायचं?

 सरबत करण्याठी पूर्ण पिकलेलं कलिंगड घ्यावं. गर काढून घ्यावा. हव्या असल्यास बिया काढून टाकाव्यात. काढल्या नाही तरी चालतात. सरबत  गाळून घेताना त्या निघून जातात. कलिंगडचा गर, थोडा लिंबाचा रस, तुळशीची किंवा पुदिन्याची पाच ते सहा पानं, कलिंगडच्या चवीनुसार साखर कमी जास्त आणि थोडं मीठ घ्यावं. हे सर्व मिक्सरच्या भांड्यात एकत्र करावं आणि मिक्सरला फिरवून घ्यावं. हे मिश्रण गाळून घेतलं की कलिंगडचं सरबत तयार होतं. सरबत करण्याचा हा एक प्रकार झाला. पण अद्रक, मिरपूड असे विविध घटक वापरून वेगवेगळ्या चवीचं कलिंगड सरबत बनवता येतं.

टॅग्स :हृदयरोगअन्न