Join us  

रोज चहा-बिस्किटे खाता? चहासोबत बिस्किटे फस्त करण्याची सवय धोक्याची, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 1:49 PM

चहा सोबत बिस्किटं (having biscuits with tea) मोठ्या आवडीनं खाल्ली जातात. पण ही सवय म्हणजे बसल्याजागी आजारांना आमंत्रण ( side effects of having biscuits with tea) देण्यासारखं आहे. तज्ज्ञ चहासोबत बिस्किटांऐवजी पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. त्यामागचं कारण समजून घ्यायला हवं. 

ठळक मुद्देचहासोबत बिस्किटं खाण्याची सवय त्वचेसाठी हानिकाकरक असते.पचनाचे विकार बिस्किटं खाल्ल्यानं उद्भवतात. वजन आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. 

सकाळी उठल्यानंतर चहा ( tea)  मिळाला नाही तर दिवसाची सुरुवातच होत नाही अशी परिस्थिती बहुतेकांची असते. तर अनेकांना  सकाळ- संध्याकाळ चहासोबत बिस्किटंही (having biscuits with tea)  लागतात. सकाळचा नाश्ता टाळून अनेकजण सकाळची भूक चहा बिस्किटांवर भागवतात. तर संध्याकाळी लागलेल्या भुकेसाठी हलकी फुलकी बिस्किटं बरी म्हणत चहासोबत बिस्किटं खाल्ली जातात. पूर्वी तरी बिस्किटांचे मर्यादित प्रकार होते. आता वेगवेगळ्या चवीच्या बिस्किटांचे अनेक प्रकार आहेत.  चीझ सारख्या घटकांनी बिस्किटातही प्रवेश केला आहे. अशी बिस्किटं लहान मुलांसोबत मोठ्यांनाही आवडतात. पण चहा सोबत बिस्किटं खाणं ही आरोग्यासाठी (side effect of having biscuits with tea) योग्य बाब नाही. या सवयीमुळे आपण बसल्या बसल्या आजारांना आमंत्रण देतो. 

Image: Google

चहासोबत बिस्किटं न खाण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञही वेळोवेळी देत असतात. पण रोजच्या सवयीपुढे अशा महत्वाच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष होतं. पण या सल्ल्याची दखल 2019 मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं घेतली. त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं की बैठकांच्या वेळेस दिल्या जाणाऱ्या चहासोबत बिस्किटांऐवजी पौष्टिक पदार्थ दिले जावेत. चहासोबत बिस्किटं देणं बंद करावं. सरकारी पातळीवर घेतल्या गेलेल्या भूमिकेमागे आरोग्याचा दृष्टिकोन आहे जो आजही सामान्यांकडून अव्हेरला जातो. चहासोबत बिस्किटं खाण्याचे परिणाम समजून घेतल्यास कदाचित आपण आपल्या पातळीवर चहासोबत बिस्किटं न खाण्याचा निर्णय नक्कीच घेऊ शकतो. 

Image: Google

चहा सोबत बिस्किटं खाल्ल्यास..

1. चहामध्ये असलेलं कॅफीन आणि बिस्किटातील साखर जेव्हा एकत्र होते तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर होतो. चहा आणि बिस्किटं एकत्र सेवन करण्यामुळे चेहेऱ्यावर मुरुम-पुटकुळ्या, फोड येतात. केमी वयातच स्किन एजिंगची समस्या निर्माण होते. 

2. बिस्किटांमध्ये साखर आणि कर्बोदकं यांचं प्रमाण जास्त असतं. चहा सोबत काय बिस्किटं खाल्ली जात असतील तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. रक्तातील साखर जास्त झाल्यास त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यावर होतो. 

3. आज बाजारात शुगर फ्री, डायजेस्टिव्ह, गव्हाचे, ओट्सचे असे बिस्किटांचे हेल्दी प्रकार मिळतात. पण ते खरोखरच आरोग्यदायी असतात का याबाबत मात्र कोणीच खात्री देत नाही. पारंपरिक पध्दतीनं बिस्किटं तयार करताना त्यात तेल, मैदा आणि साखर यांचा वापर केलेला असतो. बिस्किटातील मैदा आणि तेल या घटकांमुळे बिस्किटं खाल्ल्याने बध्दकोष्ठता, छातीत जळजळ होणं, अपचन होणं अशा पचनाशी निगडित समस्या निर्माण होतात. 

Image: Google

4. चहासोबत बिस्किटं खाणं ही सवय दातांच्या आरोग्यासाठीही नुकसानकारक असते. बिस्किटांमध्ये साखर जास्त असते. साखरचे कण जर दातात चिकटून राहिले तर दाता जिवाणू निर्माण होवून दात् खराब आणि कमजोर होतात. बिस्किटांमुळे हिरड्या, जीभही खराब होते. चहासोबत बिस्किटं खाल्ल्यानं दात किडतात.

5. चहामधील कॅफीन आणि बिस्किटांमधील साखर हे दोन घटक वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. सकाळी रिकाम्या पोटी चहासोबत बिस्किटं खाल्ल्यास शरीरात जास्त उष्मांक जातात त्यामुळे वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. 

चहासोबत बिस्किटं खायचीच असतील तर दिवसभरात केवळ दोन बिस्किटं खायला हवीत. संध्याकाळच्या चहासोबत बिस्किटं खाऊ नये . त्यापेक्षा चहासोबत आरोग्यदायी पदार्थ खावेत. ज्यांना मधुमेह, किडनीचे विकार किंवा हदयरोग असल्यास त्यांनी बिस्किटं खाण्याबाबत आपल्या डाॅक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजना