Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नाश्त्याला इडली-सांबार खाण्याचे १० फायदे; वजन कंट्रोलमध्ये राहील-पोटही व्यवस्थित साफ होईल

नाश्त्याला इडली-सांबार खाण्याचे १० फायदे; वजन कंट्रोलमध्ये राहील-पोटही व्यवस्थित साफ होईल

Health Benefits Of Idli Sambhar Eating (Why Should we Eat Idli) : हा पदार्थ तयार करण्याासाठी तेल आणि मसाल्यांची आवश्यकता नसते म्हणून पचायलाही हा पदार्थ हलका असतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:44 PM2023-12-25T12:44:26+5:302023-12-25T15:33:27+5:30

Health Benefits Of Idli Sambhar Eating (Why Should we Eat Idli) : हा पदार्थ तयार करण्याासाठी तेल आणि मसाल्यांची आवश्यकता नसते म्हणून पचायलाही हा पदार्थ हलका असतो. 

Health Benefits Of Idli Sambhar Eating : Why Idli is The Best Weight Loss Food Advantages of Eating Idli | नाश्त्याला इडली-सांबार खाण्याचे १० फायदे; वजन कंट्रोलमध्ये राहील-पोटही व्यवस्थित साफ होईल

नाश्त्याला इडली-सांबार खाण्याचे १० फायदे; वजन कंट्रोलमध्ये राहील-पोटही व्यवस्थित साफ होईल

इडली हा असा पदार्थ आहे (Idli Sambar Eating Benefits) जो दक्षिण भारतातीलच नाही तर संपूर्ण भारतभरातील लोक आवडीने खातात. काहीजण इडली खाण्याचे इतके शौकिन असतात की त्यांना नाश्त्याला आणि जेवणालाही इडली खावीशी वाटते. (Idli Khanyache  Fayde) जर तुम्ही फिट राहू इच्छित असाल आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही बिंधास्त नाश्त्याला इडली सांबार खाऊ शकता. (Benefits of Eating Idli Sambhar in Your Breakfast) फिटनेस एक्सपर्ट गुंजनी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे  ज्यात त्या इडली खाण्याच्या  फायद्यांबद्दल सांगितले आहे. (Idli Eating Benefits)

हेल्दी फाय मी च्या माहितीसनुसार एका मध्यम आकाराच्या इडलीत १५.२ ग्रॅम कार्बोहायट्रेस,  १.३ डाएटरी फायबर्स आणि २.२ ग्रॅम प्रोटीन्स आणि ०.३ ग्रॅम फॅट्स असतात. (Idli is The Best Weight Loss Food) इडली ग्लुटेन फ्री आणि लॅक्टोज फ्री असते यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. याशिवाय रक्तप्रवाह चांगला राहण्यास मदत होते. यात प्रोटीन्स असतात कमी कॅलरीज असतात. (Benefits of Eating Idli Daily)

नाश्त्याला इडली खाण्याचे फायदे (Why Idli is The Best Weight Loss Food)

१) इडली हा पदार्थ करायला अगदी सोपा  आहे. अचानक तुमचं इडली खाण्याचे मन झाले तर तुम्ही रवा भिजवून इस्टंट इडलीसुद्धा घरी बनवू शकता.

२) हे फर्मेंडेट फूड असल्यामुळे पोटाच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरते. आंबवण्याच्या प्रकियेमुळे यातील न्युट्रिएंट्स अधिक वाढतात.

३) हा पदार्थ तयार करण्याासाठी तेल आणि मसाल्यांची आवश्यकता नसते, म्हणून पचायलाही हा पदार्थ हलका असतो. 

४) इडली एक फायबर रिच फूड आहे ज्यामुळे  पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आणि लवकर भूकही लागत नाही. 

५) यात ट्रांसफॅट किंवा सॅच्युरेडेट फॅट्स नसतात. म्हणून इडली खाण्यासाठी तुम्हाला जास्त विचार करण्याची काही गरज नाही.

बारीक होण्यासाठी वरण-भात का सोडायचा? 'या' पद्धतीने डाळ शिजवा-वजन कंट्रोलमध्ये राहील

६) जर तुम्ही डायटिंग करत असाल तरीही इडली खाऊ शकतात. आपल्या भूकेनुसार २ किंवा ३ इडल्या खायच्या ते तुम्ही ठरवू शकता. 

७) आहार आणि फिटनेसची काळजी घेत तुम्ही रवा, ओट्,  नाचणी किंवा मल्टीग्रेन इडली खाऊ शकता.  

८) इडली चवीला टेस्टी आणि सॉफ्ट असते. म्हणूनच रोजच्या आहारात तुम्ही इडलीचा समावेश करायला हवा. सकाळ केलेली इडली तुम्ही संध्याकाळी चहाबरोबर खा शकता. 

पोट सुटलंय, व्यायामासाठी वेळ नाही? रात्री १० नंतर गरम पाण्यात हा पदार्थ मिसळून प्या, झरझर घटेल वजन

९) इडली एक वेट लॉस फ्रेंडली डाएट आहे. ज्यामुळे २ ऐवजी ४ इडल्या खाल्ल्यातरी वजन वाढत नाही

१०) इडली अधिक पौष्टीक होण्यासाठी तुम्ही तांदूळ वाटताना त्यात मुगाची किंवा उडीदाची भिजवलेली डाळ मिसळू शकता. 

Web Title: Health Benefits Of Idli Sambhar Eating : Why Idli is The Best Weight Loss Food Advantages of Eating Idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.