Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्या लिंबाच्या सालींचा चहा, पावसाळ्यात चवीला मस्त! लिंबाइतकेच सत्व, साल फेकू नका

प्या लिंबाच्या सालींचा चहा, पावसाळ्यात चवीला मस्त! लिंबाइतकेच सत्व, साल फेकू नका

लिंबाच्या सालींमध्ये (lemon peel) जीवनसत्वं, खनिजं आणि फायबर असतात. त्याचा उपयोग (health benefits of lemon peel) आरोग्यास करुन घेण्यासाठी लिंबाच्या सालींचा चहा करुन पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. लिंबाच्या सालीचा चहा प्यायल्यानं (lemon peel tea benefits) आरोग्यास अनेक फायदे होतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 10:05 AM2022-08-05T10:05:21+5:302022-08-05T10:10:01+5:30

लिंबाच्या सालींमध्ये (lemon peel) जीवनसत्वं, खनिजं आणि फायबर असतात. त्याचा उपयोग (health benefits of lemon peel) आरोग्यास करुन घेण्यासाठी लिंबाच्या सालींचा चहा करुन पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. लिंबाच्या सालीचा चहा प्यायल्यानं (lemon peel tea benefits) आरोग्यास अनेक फायदे होतात. 

Health benefits of lemon peel tea. | प्या लिंबाच्या सालींचा चहा, पावसाळ्यात चवीला मस्त! लिंबाइतकेच सत्व, साल फेकू नका

प्या लिंबाच्या सालींचा चहा, पावसाळ्यात चवीला मस्त! लिंबाइतकेच सत्व, साल फेकू नका

Highlightsलिंबाच्या सालींच्या चहामध्ये फ्लेवोनाॅइड्स आणि क जीवनसत्वं असल्यानं त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.लिंबाच्या सालींमध्ये असलेल्या क जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाच्या सालीतील गुणधर्मांचा उपयोग होतो.

लिंबाची साली  (lemon peel) विना उपयोगाची म्हणून सरळ फेकून दिली जातात. पण अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की लिंबाच्या रसापेक्षा सालींमध्ये जास्त सत्वं असतं. लिंबाच्या सालीत असलेले जैविक घटक आरोग्यासाठी (health benefits of lemon peel)  फायदेशीर असतात. त्याचा आरोग्यासाठी उपयोग करुन घेण्याची सोपी पध्दत आहारतज्ज्ञ सिमरन सैनी यांनी सांगितला आहे. त्या सांगतात की लिंबाच्या सालींमध्ये जीवनसत्वं, खनिजं आणि फायबर असतात. त्याचा उपयोग आरोग्यास करुन घेण्यासाठी लिंबाच्या सालींचा चहा (lemon peel tea)  करुन पिण्याचा सल्ला देतात. लिंबाच्या सालीचा चहा प्यायल्यानं आरोग्यास ( health benefits of lemon peel tea)  अनेक फायदे होतात. 

Image: Google

लिंबाच्या सालींचा चहा का प्यावा?

1. लिंबाच्या सालींच्या चहामध्ये डी लिमोनेन, क जीवनसत्वं आणि ॲण्टिऑक्सिड्ण्टस असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, ह्दयाचं आरोग्य सुधारण्यासाठी लिंबाच्या सालींच्या चहाचा चांगला उपयोग होतो. लिंबाच्या सालींच्या चहामध्ये जिवाणुविरोधक गुणधर्म असतात.  लिंबाच्या सालींच्या चहामध्ये फ्लेवोनाॅइड्स आणि क जीवनसत्वं असल्यानं त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो. तसेच यामुळे त्वचेचा पोतही सुधारतो. 

2. सर्दी, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी, चयापचय क्रिया सुधारण्यासाठी लिंबाच्या सालींचा चहा प्रभावी असतो. 

3. लिंबाच्या सालींमध्ये डी लिमोनेन हे फ्लेवोनाॅइड ॲण्टिऑक्सिड्ण्टस असतात. त्यामुळे लिंबाच्या सालींचा चहा प्यायल्यानं हदयरोग, टाइप 2 मधुमेह यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. 

4. लिंबाच्या सालींमध्ये असलेल्या क जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.  आजारी पडण्याची लक्षणं दिसताच लिंबाच्या सालींचा चहा प्यायला सुरुवात केल्यास आजाराचा धोका टळतो किंवा आजाराची तीव्रता कमी होते. 

5. लिंबाच्या सालीत थोड्या प्रमाणात पोटॅशियम असतं, जे शरीरातील  पेशींसाठी उपयुक्त असत. खूप घाम येण्याची समस्या असल्याच लिंबाच्या सालींचा चहा अवश्य प्यावा

6. पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाच्या सालीतील गुणधर्मांचा उपयोग होतो. लिंबाच्या सालीत असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुदृढ होते. लिंबाच्या सालीचा चहा प्यायल्यानं आतड्यांना असलेली सूज कमी होवून चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. 

Image: Google

लिंबाच्या सालीचा चहा कसा करावा?

लिंबाच्या सालीचा चहा करण्यासाठी लिंबाची साली, 1 कप पाणी, आल्याचा छोटा तुकडा आणि 1 मोठा चमचा मध घ्यावं. चहा करण्यासाठी भांड्यात लिंबाची साली, आल्याचे तुकडे आणि 1 कप पाणी घालावं. ते 2-3 मिनिटं उकळून घ्यावं. पाणी गाळून घ्यावं. त्यात मध घालून चहा प्यावा.

Web Title: Health benefits of lemon peel tea.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.