Join us  

प्रोटीन हवंय भरपूर तर रोज १ मूठभर शेंगदाणे खा, हाडांना बळकटी-घोडयासारखी ताकद येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 4:55 PM

Health Benefits Of peanuts : शेंगदाणे प्लांट बेस्ड प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत.  १०० ग्राम शेंगदाण्यातून २५.८ ग्राम प्रोटीन मिळते.

बदाम,  अक्रोड, मनुके, काजू यांसारखे नट्स, ड्राय  फ्रुट्स ताकदीचा खजिना मानले जातात. याच कारणामुळे बदामाची किंमतही जास्त असते. नट्स खाल्लाने शरीराला बरेच फायदे मिळतात.  (Health Benefits Of peanuts) अभ्यासात  समोर आलेल्या माहितीनुसार नट्स खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यसा मदत होते, डायबिटीस कंट्रोल होते, वजन कमी होण्यास मदत होते. केस आणि त्वचा चांगली राहते, आरोग्यही सुधारते. ( What Are Benefits Of Eating Peanuts Daily)

जेव्हा कधीही सगळ्यात पॉव्हरफुल नट्सबाबत बोलले जाते तेव्हा बदाम सर्वात प्रभावी मानले जाता. बदामाला नट्सचा राजा असेही म्हणतात. याव्यतिरिक्त  अक्रोड, पिस्ता यांसारखे नट्ससुद्धा पॉव्हरफुल असतात. पोषक तत्वांच्या बाबती बोलायचे झाले तर बदाम पुढे आहे पण सर्वांनाच बदाम खायला आवडतं असं नाही. बदाम आवडत नसतील तर तुम्ही शेंगदाणे  खाऊ शकता. 

युएसडीच्या रिपोर्टनुसार जर फायबर्सबाबत बोलायचे झाले तर बदामात सर्वात जास्त फायबर्स असतात. यात व्हिटामीन ई, मॅग्नेशियम, आणि कॅल्शियम असते. फॉस्फरेसस, पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे. या सेल्समुळे इम्यून सिस्टीम चांगली राहते. बदामात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. व्यायामानंतर बदाम खाल्ल्याने मसल्स रिकव्हरी होण्यास मदत होते. 

शेंगदाणे प्लांट बेस्ड प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत.  १०० ग्राम शेंगदाण्यातून २५.८ ग्राम प्रोटीन मिळते. प्रोटीन्सत सेल्स बिल्डींगसाठी आणि सेल्स रिपेअरींगसाठी गरजेचे असतात. यात प्रोटीन्सचे प्रमाणही भरपूर असते.  फॅटी एसिड्स असतात.  शेंगदाण्यांमध्ये  मोनोसॅच्युरेटेड आणि पोलीसॅच्युरेडेट फॅटी एसिड्स असतात.  अमेरिकन हार्ट असोशियेशनच्या रिपोर्टनुसार यामुळे हार्ट डिसीज आणि स्ट्रोकचा धोका टाळता येतो. 

जे लोक सकाळी लवकर उठून भिजवलेले शेंगदाणे  खातात त्यांना एसिडीटी, गॅस, अपचन, अन्य पोटाच्या संबंधित समस्या उद्भवत नाहीत. त्यांची डायजेस्टीव्ह सिस्टीम चांगली राहते. शेंगदाण्यांमध्ये फायबर्सचे  प्रमाण जास्त  असते. ज्यामुळे पोटदुखी आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. बदामाप्रमाणेच शेंगदाणे खाल्ल्याने मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. स्मरणशक्ती चांगली राहते आणि मेंदू तेज होतो. शेंगदाणे त्वचा आणि  केसांसाठी फायदेशीर ठरतात. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स