Join us  

सकाळच्या नाश्त्याला इडली सांबार खाण्याचे ५ फायदे, पचन आणि पोषण दोन्हीसाठी उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 8:37 AM

Health Benefits of Rice Idli And Sambhar : हा लो फॅट नाश्ता असल्यामुळे एक्स्ट्रा कॅलरीजही वाढत नाहीत.

नाश्त्याला अनेकदा दक्षिण भारतीय पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. इडली, डोसा, मेंदूवडा, सांबर, अप्पम, डाळ वडा ही अनेकांची पहिली पसंती असते. हे पदार्थ घरी सुद्धा अगदी सहज, सोप्या पद्धतीनं बनवता येतात. नाश्त्याला  इडली सांभर खाणं फायदेशीर ठरतं का? (Cooking Tips & Hacks) याचे आरोग्याला काय काय फायदे मिळतात ते समजून घेऊ.(Benefits of Rice Idli And Sambhar)

डॉ.  राम जावळे यांनी इंस्टग्रामवर नाश्त्याला हा पदार्थ खाण्याचं महत्व सांगितले आहे. (idli sambar benefits)नाश्त्यासाठी इडली सांबार हा उत्तम पर्याय आहे. कारण इडली हा पीठ आंबवून केलेला पदार्थ आहे. आंबवलेल्या पीठात बरेच प्री बायोटिक्स, प्रो बायोटिक्स असतात जे पोटासाठी आणि आतड्यांसाठी चांगले असतात. (Here Is Why You Should Start Eating Idli Sambar)

नाश्त्याला इडली सांबर का खायचं? (Health Benefits of Rice Idli And Sambhar)

1) यात तांदूळ आणि उडीदाची डाळ असते. उडीदाची डाळ हा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. याशिवाय तांदळातून कार्बोहायड्रेट्सही मिळतात. या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमुळे शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात. यामुळे पचनक्रिया चांगली राहते, बद्धकोष्टतेचा त्रासही दूर होतो, पोट साफ व्हायला मदत होते, वजन नियंत्रणात राहतं, रक्तदाबही नियंत्रणात राहतो तसेच हृदयाचे आजार होण्याची शक्यता कमी होते. हा लो फॅट नाश्ता असल्यामुळे एक्स्ट्रा कॅलरीजही वाढत नाहीत.

२) इडली बनवण्यासाठी वाफेचा वापर केला जातो. यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. एका मध्यम आकाराच्या इडलीत जवळपास ४० कॅलरीजअसतात. यात कोलेस्टेरॉलही असते याशिवाय सॅच्युरेडेट फॅट्सही  नसतात म्हणून नाश्त्याला हा पदार्थ खाणं तब्येतीसाठी उत्तम मानलं जातं.

३) ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या जाणवत असल्यास इडलीचे सेवन फायदेशीर ठरते. इडलीत सोडीयम मोठ्या प्रमाणात असते. एका मध्यम आकाराच्या इडलीत जवळपास ६५ मिलीग्राम सोडियम असते. तब्येतीच्या दृष्टीने इडली फायदेशीर ठरते. 

इडली बनवण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी इडलीचे तांदूळ आणि उडीदाची डाळ वेगवेगळ्या भांड्यात गरम पाण्यात ४ ते ५ तासांसाठी भिजवून ठेवा. नंतर वाटून पेस्ट बनवा. ही पेस्ट रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा, त्यात चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा त्यात मिसळा.  सकाळी इडलीच्या साच्याला तेल लावून त्यात पेस्ट घाला. १५ ते १८ मिनिटांपर्यंत इडली व्यवस्थित शिजू द्या. नंतर सांबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स