Join us  

मोड आलेल्या मेथ्या म्हणजे सुपरफूड! डॉक्टर सांगतात, कोवळी मेथी लागेल कडू पण खा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 2:32 PM

Health Expert Says Methi Sprouts Is The Real Super Food: माेड आलेल्या मेथ्या या खऱ्या अर्थाने सुपरफूड आहेत. त्यामुळे त्या कितीही कडवट लागल्या तरी चमचाभर तरी खायलाच पाहिजेत असं डाॅक्टर सांगतात...

ठळक मुद्देमेथी दाण्यांमधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे हाडांची दुखणी नको असतील तर त्यांच्या बळकटीसाठी नियमितपणे मोड आलेल्या मेथ्या खायला सुरुवात करा... 

प्रत्येक स्वयंपाक घरात मेथ्या किंवा मेथी दाणे असतातच. पण ते आपण खूपच कमी पदार्थांमध्ये वापरतो. त्यामुळे त्या बऱ्याच कमी प्रमाणात खाल्ल्या जातात. खरं तर मेथ्या एवढ्या आरोग्यदायी आहेत की त्या आपण दररोज थोड्या का होईना पण खायलाच पाहिजेत, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. पण त्यांच्या कडवट चवीमुळे मात्र आपण त्या टाळतो. जर मेथ्या रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी त्या इतर कडधान्यांप्रमाणे मोड आणून खाल्ल्या तर त्यांचा कडवटपणा अजिबात जाणवत नाही. काही डॉक्टरांच्या मते मोड आलेल्या मेथ्या हे खऱ्या अर्थाने सुपरफूड आहे. बघा ते खाल्ल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात...

 

मोड आलेल्या मेथ्या खाण्याचे फायदे

१. इंडियन एक्सप्रेस ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार आहारतज्ज्ञ पीएस सुष्मा असं सांगत आहेत की मोड आलेल्या मेथ्यांमधून व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. विशेषत: व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी साठी तर मोड आलेल्या मेथ्या हा एक उत्तम स्त्रोत आहे. 

मनिष मल्होत्रांच्या दिवाळी पार्टीत अभिनेत्री नेसल्या 'अशा' साड्या- कोणी झालं ट्रोल तर काहींवर नेटकरी फिदा....

२. मोड आलेल्या मेथ्यांमधून योग्य प्रमाणात फायबर मिळत असल्यामुळे पचनाचे अनेक त्रास कमी होतात. ज्यांना नेहमीच कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो, त्यांनी मोड आलेल्या मेथ्या नियमितपणे खायला पाहिजेत.

 

३. रक्तातील साखरेचे प्रमाण तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मोड आलेल्या मेथ्या खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी तर त्या आवर्जून खायलाच पाहिजेत, असं डॉक्टर सांगतात.

ऐश्वर्या नारकरांनी दिवाळीसाठी सजवलं घर! बघा घरातल्या छोट्याशा कोपऱ्याला कसा दिला मस्त लूक...

४. मेथी दाण्यांमधून भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टी इन्फ्लामेटरी कम्पाउंड मिळतात. त्यामुळे शरीरावर आलेली सूज बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. ॲण्टी ऑक्सिडंट्स शरीरात पुरेशा प्रमाणात असतील तर आपोआपच अनेक आजारांचा धोका कमी होतो.  

५. मेथी दाण्यांमधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे हाडांची दुखणी नको असतील तर त्यांच्या बळकटीसाठी नियमितपणे मोड आलेल्या मेथ्या खायला सुरुवात करा... 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआरोग्यहेल्थ टिप्स