आपल्या रोजच्या डाएटमध्ये फळांचा समावेश करणे अतिशय आवश्यक असते. निरोगी आरोग्यासाठी रोज एक किंवा दोन फळ खाण महत्वाचे असते. आपल्या आरोग्याशी संबंधित कित्येक समस्यांवर नैसर्गिक औषधोपचार म्हणून फळे खाणे फायदेशीर ठरते. याचबरोबर फळ खाल्ल्याने वेगवेगळ्या आजारांपासून आपला बचाव देखील केला जातो. फळांमध्ये आरोग्यास आवश्यक त्या पोषकतत्त्वांचा योग्य प्रमाणात साठा असतो. फळे आपल्या शरीराला ऊर्जा पुरवतात तसेच शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात, त्यामुळे आपण फळे खाण्यास जास्त पसंती देतो.
बहुतेकवेळा आपण आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतो. असे डाएट करताना फळांचा त्यात खूप मोठा सहभाग असतो. फळांशिवाय डाएट पूर्ण होऊच शकत नाही. फळांमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असते परंतु फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपली पचनशक्ती सुरळीत ठेवण्यात मदत होते. याशिवाय फळांमुळे चयापचय क्रियेचा वेगही वाढतो. याचा उपयोग वजन नियंत्रणात ठेवण्यात होतो. यासाठीच डाएटमध्ये फळ खाल्ली जातात. असे असले तरीही फळं खाताना योग्य प्रमाणाबरोबरच योग्य वेळेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. जर आपण वजन कमी करण्याच्या इच्छेने आपल्या आहारात भरपूर फळांचा समावेश करत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी फळं खात असताना या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. ज्या फळांमध्ये कॅलरी, फायबर आणि ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते ती चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पदार्थांसोबत खाल्ल्याने विशेषतः यामुळे वजन वाढण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात(Health Include Fruits This Way In Your Diet For Instant Weight Loss).
वजन कमी करण्यासाठी फळे नेमकी कशी खावीत ?
१. कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेली फळे खा :- वजन कमी करण्यासाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे खावीत. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांमध्ये बेरी, चेरी, सफरचंद आणि पेर या फळांचा समावेश होतो. ही फळे आपल्यातील साखर हळूहळू रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेत सोडतात. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि वजन वाढण्यास हातभार लावणाऱ्या स्पाइकला प्रतिबंध केला जातो.
पोट सुटले, टायर दिसतात ? ५ सोपे उपाय, पोट होईल कमी...
२. प्रोटीन रिच पदार्थांसोबत फळे खावीत :- फळं खाण अधिक संतुलित आणि फायदेशीर करण्यासाठी प्रथिनयुक्त पदार्थांसोबत फळे एकत्रित करून खावीत. ग्रीक योगर्ट, चीज किंवा फळे यांसारख्या प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांसह मूठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहण्यास आणि जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत मिळते.
रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...
३. रिकाम्या पोटी फळे खाणे टाळा :- अनेकांना असे वाटते की फळे आरोग्यदायी असतात आणि ती आपण कधीही खाऊ शकतो. सर्व फळे रिकाम्या पोटी खाऊ नये कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. हे टाळण्यासाठी, ज्यात प्रथिनांचे प्रमाण भरपूर असेल असा संतुलित आहार किंवा स्नॅक्स यांच्यासोबत फळे खाण्याला प्राधान्य द्यावे.
घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...
४. किती प्रमाणात फळे खावी याकडे लक्ष द्यावे :- फायदेशीर असलेली कोणतीही गोष्ट मर्यादित प्रमाणात घेतली तरच त्याच्या खाण्याचा शरीराला फायदा होतो. हे फळांच्या बाबतीतही आहे. फळ खाण हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेच, परंतु तरीही त्यात नैसर्गिक साखर आणि कॅलरीज असतात. म्हणून, खाताना फळं आपण एका वेळी किती प्रमाणात खात आहोत याची काळजी घ्यावी. याचबरोबर विशेषतः वजन कमी करताना एकाच वेळी अधिक प्रमाणात फळं खाणे टाळावे.
५. फळांच्या ज्यूस ऐवजी फळं खाणे कधीही चांगले :- फळं खाण्यासोबतच फळांचा ज्यूस पिण्याची सवय केली जाते, परंतु फळांच्या तुलनेत ज्यूसमध्ये फायबर नसतात, तर साखर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असू शकते. आहारात फायबरचा समावेश करण्यासाठी संपूर्ण फळांचा समावेश करणे कधीही चांगले आहे. ज्यामुळे पचन तसेच भूक नियंत्रित करण्यास मदत करते.