Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मुलांना भुकच लागत नाही, काहीही करा, खातच नाहीत? मग खायला द्या हे ५ पदार्थ रोज 

मुलांना भुकच लागत नाही, काहीही करा, खातच नाहीत? मग खायला द्या हे ५ पदार्थ रोज 

Health: मुलांना कधी सपाटून भूकच लागत नाही.. काहीही दिलं तरी नाहीच म्हणतात.. अशी तुमचीही तक्रार ? मग हे काही घरगुती उपाय (home remedies) करून बघा.. भूक वाढेल आणि तब्येत सुधारेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:55 PM2021-12-17T13:55:40+5:302021-12-17T14:00:04+5:30

Health: मुलांना कधी सपाटून भूकच लागत नाही.. काहीही दिलं तरी नाहीच म्हणतात.. अशी तुमचीही तक्रार ? मग हे काही घरगुती उपाय (home remedies) करून बघा.. भूक वाढेल आणि तब्येत सुधारेल...

Health issue: Problem of Loss of appetite, home remedies and solutions for proper digestion | मुलांना भुकच लागत नाही, काहीही करा, खातच नाहीत? मग खायला द्या हे ५ पदार्थ रोज 

मुलांना भुकच लागत नाही, काहीही करा, खातच नाहीत? मग खायला द्या हे ५ पदार्थ रोज 

Highlightsअशा लोकांची पचनक्रिया सुधारण्यासाठी सगळ्यात आधी प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणूनच काही घरगुती उपाय करून बघा... 

खूप भूक लागते, सतत काही तरी खावंसं वाटतं... ही जशी एक समस्या आहे ना, तशीच याच्या अगदी उलट समस्या काही जणांमध्ये आणि विशेषत: टीन एज मुलांमध्ये दिसून येते... ही समस्या म्हणजे भुकच लागत नाही (Loss of appetite).. काहीही करा जेवणच जात नाही.. अशा मुलांच्या आई त्यांच्यावर कायम वैतागलेल्या असतात. आपण एवढं चांगलं चुंगलं करतो, पण मुलं धड जेवतंच नाहीत, अशी या आई लोकांची कायमची तक्रार... काही प्रौढ लोकांमध्येही ही समस्या दिसून येते. जेवण पोटभर न केल्यामुळे या लोकांची तब्येत मग कायमच किडकिडीत राहते.. तुमच्या मुलांना किंवा घरातलया कोणाला अशी समस्या असेल तर हे काही पदार्थ त्यांना खायला द्या (Loss of appetite, home remedies in marathi). लगेच फरक जाणवेल..

 

भुकच न लागणे ही समस्या आपल्या पचनक्रियेशी संबंधित आहे.. पचन क्रिया चांगली नसेल तर खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे मग नंतर काही खावेसेच वाटत नाही, अशी या लोकांची मुळ समस्या आहे. त्यामुळे अशा लोकांची पचनक्रिया सुधारण्यासाठी सगळ्यात आधी प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणूनच पचन क्रिया सुधारण्यासाठी काही घरगुती उपाय करून बघा... 

 

१. कोमटपाणी, लिंबू आणि मध
Warm water with lemon

पचन क्रिया सुधारायची असेल तर हा उपाय खूपच प्रभावी ठरतो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हा उपाय करून बघा. यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या. पाणी कोमट असावे. गरम किंवा थंड नाही. या पाण्यात मध्यम आकाराचे अर्धे लिंबू पिळून टाका. त्यात अर्धा टेबलस्पून मध घाला. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते, शरीर नैसर्गिकदृष्ट्या डिटॉक्स होत जाते. त्यामुळे भुकही वाढते. 

 

२. ग्रीन टी
Green tea

पचनशक्ती चांगली करण्यासाठी ग्रीन टी घेणे फायदेशीर ठरते. भूक लागत नसेल तर काही दिवस दररोज सकाळी दुधाचा चहा घेण्याऐवजी ग्रीन टी घेऊन बघा.. ग्रीन टी मध्ये असणारे घटक पोटाच्या समस्या दूर तर करतातच पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात. 

 

३. ओवा आणि कोमट पाणी
Ova and warm water

लहानपणी पोट दुखायला लागलं, पोट बिघडलं की आई, आजी ओवा खायला द्यायच्या हे अनेकांना आठवत असेल. हा उपाय पचनक्रियेसाठी अतिशय चांगला आहे. यासाठी दररोज रात्री झोपताना १ टी स्पून ओवा चावून चावून खा. कितीही तिखट लागला तरी ओवा व्यवस्थित चावा आणि त्यानंतर १ ग्लास गरम पाणी प्या. हा उपाय नियमितपणे केल्यास नक्कीच भूक वाढण्यास मदत होईल.  

 

४. काळी मिरे आणि लवंग
black pepper and cloves

हा उपाय देखील भूक वाढीसाठी प्रभावी ठरतो. यासाठी दोन तीन काळे मिरे आणि एक लवंग एकत्र करून बारीक कुटून घ्या. यामध्ये थोडासा मध टाका आणि हे चाटण रोज रात्री झोपण्यापुर्वी घ्या. त्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्या. हा उपाय पचन क्रिया सुधारून भूक वाढण्यासाठी उपयुक्त ठरतो. 
 

Web Title: Health issue: Problem of Loss of appetite, home remedies and solutions for proper digestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.