Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Health Tips for Summer: उन्हाळ्यात खडीसाखर खाण्याचे 5 फायदे; करा छोटा बदल साखर वापरता तिथं वापरा खडी साखर

Health Tips for Summer: उन्हाळ्यात खडीसाखर खाण्याचे 5 फायदे; करा छोटा बदल साखर वापरता तिथं वापरा खडी साखर

Health Tips: वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात अनेक जणांना उष्णतेचा त्रास होतो. शरीरातील उष्णता कमी करून उन्हाळा सुसह्य करायचा असेल, तर उन्हाळ्यात हा छोटा बदल कराच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 05:27 PM2022-03-19T17:27:33+5:302022-03-19T17:28:12+5:30

Health Tips: वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात अनेक जणांना उष्णतेचा त्रास होतो. शरीरातील उष्णता कमी करून उन्हाळा सुसह्य करायचा असेल, तर उन्हाळ्यात हा छोटा बदल कराच...

Health Tips for Summer: 5 Benefits of Eating Rock Sugar in Summer; Make small changes. Use sugar instead of powdered sugar | Health Tips for Summer: उन्हाळ्यात खडीसाखर खाण्याचे 5 फायदे; करा छोटा बदल साखर वापरता तिथं वापरा खडी साखर

Health Tips for Summer: उन्हाळ्यात खडीसाखर खाण्याचे 5 फायदे; करा छोटा बदल साखर वापरता तिथं वापरा खडी साखर

Highlightsओबडधोबड आकाराचीच खडीसाखर खावी. जी खडीसाखर एकसारख्या आकाराची असते, ती रिफाईंड शुगरचाच एक प्रकार असते. ती खाणे टाळावे. 

भारतात अनेक ठिकाणी होळी सणाच्या दिवशी लहान मुलांना साखर गाठी (rock sugar) देण्याची, तसेच देवालाही साखरगाठी किंवा खडीसाखरेची गाठी वाहण्यात येते. ही साखर गाठी नंतर गुढी उभारल्यानंतर गुढीच्याही गळ्यात दिसते. ऋतू बदलत असतानाच या गाठीचं होणारं आगमन मोठं सुचक आहे. साखर गाठी हा खडीसाखरेचाच एक प्रकार. विशिष्ठ प्रक्रिया करून खडीसाखर जेव्हा दोऱ्यात गुंफण्यात येते, तेव्हा तिला साखरगाठी म्हणतात. ही खडीसाखर किंवा सााखरगाठी उन्हाळ्यात खाणं अतिशय आरोग्यदायी मानलं जातं.

 

खडीसाखर ही आपल्या नेहमीच्या रिफाईंड साखरेपेक्षा खूप जास्त पोषक असते. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. याशिवाय खडीसाखर प्रकृतीसाठी थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यात खडीसाखर कायम सोबत ठेवावी आणि खावी. त्यामुळे उष्णता वाढत नाही आणि ऊन लागण्याचा त्रास होत नाही. खडीसाखर खाताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. ओबडधोबड आकाराचीच खडीसाखर खावी. जी खडीसाखर एकसारख्या आकाराची असते, ती रिफाईंड शुगरचाच एक प्रकार असते. ती खाणे टाळावे. 

 

खडीसाखर खाण्याचे फायदे (Benefits of eating khadi sakhar)
१. उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने अनेकांना नाकातून रक्त येण्याचा त्रास होतो. शरीरात उष्णता निर्माण झाल्यामुळे होणारा हा त्रास कमी करायचा असल्यास खडीसाखर खाणे अतिशय फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात नियमितपणे खडीसाखरेचा छोटास तुकडा चघळल्यास हा त्रास कमी होईल. 
२. उन्हाळ्याच्या सुरुवातीला अनेक जणांना तोंड येण्याचा त्रास होतो. वातावरण उष्ण होऊ लागते. हा ऋतूबदल सहन न झाल्याने अनेक जणांना तोंडात फोड किंवा अल्सर येतात. अशा पद्धतीने तोंड आले असेल तर खडीसाखर चघळा. यामुळे शरीरातील उष्णता तर कमी होईलच पण तोंडात काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यास ते देखील कमी होण्यास मदत होईल. 

 

३. खडीसाखर नियमितपणे खाल्ल्यामुळे मुतखड्याचा त्रासही कमी होतो. 
४. खशात खवखव होत असेल, जुनाट खोकल्याने त्रस्त असाल तर नियमितपणे खडीसाखर खा.
५. उन्हाळ्यात जेवण कमी जाते. त्यामुळे अनेक जणांना थकवा, अशक्तपणा असा त्रास जाणवतो. असा त्रास होत असल्यास उन्हाळ्यात दूधात खडीसाखर टाकून प्या किंवा खडीसाखरेचा छोटा तुकडा नियमितपणे चघळा. यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा कमी होतो. 

असा करा खडीसाखरेचा वापर
- खडीसाखरेचा तुकडा रोज खाणे जमत नसेल तर रोज साखरेऐवजी खडीसाखर खात चला...
- दूध, चहा, सरबत यासाठी खडीसाखर वापरत चला. 
- कोशिंबीरी, तात्पुरते केलेले कैरीचे लोणचे यासारख्या पदार्थांमध्येही साधी साखर घालण्याऐवजी खडीसाखरेचा चुरा करून घाला. 

 

Web Title: Health Tips for Summer: 5 Benefits of Eating Rock Sugar in Summer; Make small changes. Use sugar instead of powdered sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.