उन्हाळा सुरु झाला की आपण जास्तीतजास्त थंड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो. कारण उन्हाळ्यात आधीच सगळीकडे उष्णता वाढलेली असते. वाढत्या उष्णतेत आणखीनच उष्ण पदार्थ खाल्ले तर त्रास होतोच. त्यामुळे यादिवसांत शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी थंड पदार्थ जास्त प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात पपई जरा उष्ण प्रकृतीचं फळ. त्यामुळे उन्हाळ्यात (summer special) पपई खावी की नाही, हा संभ्रम अनेकांच्या मनात असतोच. म्हणूनच त्याविषयीची ही सविस्तर माहिती.. (eating papaya in summer is healthy or not?)
वास्तविक पाहता कोणतंही फळ उष्ण असल्यामुळे किंवा थंड असल्यामुळे एखाद्या सिझनमध्ये अजिबातच खायचं नाही, असं नसतं.. उन्हाळ्यातलं एक मुख्य फळ म्हणजे आंबा. उन्हाळ्यात तर सगळेच आंबे खातात. आंबा हे देखील एक उष्ण प्रकृतीचं फळ मानलं जातं. पण जर मर्यादित प्रमाणात आंबा खाल्ला तर त्याचा निश्चितच शरीराला फायदा होतो. तसंच पपईचंही आहे. उन्हाळ्यात पपई खावी पण ती किती खावी आणि केव्हा खावी, याचं प्रमाण ठरलेलं आहे. त्यानुसार जर पपईचं सेवन केलं तर नक्कीच पुढील फायदे दिसून येतील.
पपई खाण्याचे फायदे (benefits of eating papaya)
- पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर आणि प्रोटीन्स असतात. त्यामुळे योग्य प्रमाणात पपई खाणं नेहमीच फायदेशीर ठरतं.
- रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पपई उपयुक्त ठरते.
- पपईमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेसाठी पपई अतिशय गुणकारी आहे.
- उन्हाळ्यात बऱ्याचदा काही खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी पपई खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरते. कारण पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत नाही.
- पपईमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे उन्हाळ्यात होणारा डिहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी पपई योग्य प्रमाणात खाणे फायदेशीर मानले जाते.
पपई खाण्याची योग्य वेळ कोणती (what is the correct time of eating papaya?)
- सकाळचा नाश्ता ते दुपारचे जेवण यांच्यामधला जो काळ आहे, त्यावेळी पपई खावी.
- टी टाईम स्नॅक्स म्हणूनही तुम्ही दुपारी चहाच्या आधी पपई खाऊ शकता.
- ऑफिसमधून आल्यानंतर रात्रीच्या जेवणाला कधीकधी वेळ असतो. यामधल्या काळातही भुक लागली असल्यास पपई खाता येते.