Join us  

हाडांना बळकटी देणारे व्हिटॅमिन K आहारातून मिळतंय ना? व्हिटॅमिन K कडे दुर्लक्ष कराल, तर ......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:31 PM

व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई यांच्याबाबत आपण सातत्याने ऐकतो. पण या व्हिटॅमिन्स इतकंच  महत्त्वाचं  आहे व्हिटॅमिन K.

ठळक मुद्देज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान खूपच त्रास होतो, अशा महिलांनी व्हिटॅमिन K ची तपासणी जरूर करून घ्यावी. 

आपल्याला जेव्हा कोणती दुखापत होते, तेव्हा अधिक रक्तस्त्राव होऊ नये आणि रक्त वेळच्यावेळी गोठावे, यासाठी व्हिटॅमिन के महत्त्वाचं असतं. एवढं आपण शालेय जीवनापासून प्रत्येकवेळी ऐकतो. पण फक्त रक्त गोठविण्यासाठीच व्हिटॅमिन के उपयुक्त असतं, असं नव्हे. हाडांना मजबूती देण्याचं काम व्हिटॅमिन के द्वारे होतं. यासोबतच इतरही अनेक गोष्टींसाठी व्हिटॅमिन के उपयुक्त आहे. व्हीटॅमिन K ची कमतरता शरीरात अनेक व्याधी निर्माण करू शकते. K1 आणि K2 असे व्हिटॅमिन के चे दोन प्रकार आहेत. 

 

व्हिटॅमिन K चे सेवन का महत्त्वाचेजखम झाल्यानंतर रक्तस्त्राव थांबून रक्त गोठविण्याची क्रिया सुरू व्हावी म्हणून व्हिटॅमिन K अत्यंत महत्त्वाचे आहे. हाडांना मजबूती देण्यासाठी कॅल्शियमची गरज असते, हे आपण जाणून आहोत. पण तेवढीच गरज व्हिटॅमिन K ची देखील असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन K ची कमतरता असेल तर हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. व्हिटॅमिन K जर योग्य प्रमाणात मिळाले नाही, तर आतड्यांचे कार्य बिघडते. यामुळे चयापचय क्रियाही मंदावू शकते आणि पोटाचे अपचनासंबंधी आजार वाढू शकतात. 

 

पाळीतला त्रास कमी करण्यासाठी महत्त्वाचे व्हिटॅमिन Kपाळीमध्ये पाेटदुखी, अतिरक्तस्त्राव असा जर त्रास होत असेल, तर त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण व्हिटॅमिन K ची कमतरता देखील यामागचे एक मुख्य कारण असून शकते, हे जाणून घ्या. पाळीदरम्यान महिलांच्या शरिरात जे हार्मोन्स स्त्रवतात, त्यांना नियंत्रित करण्याचे काम व्हिटॅमिन K द्वारे केले जाते. त्यामुळे ज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान खूपच त्रास होतो, अशा महिलांनी व्हिटॅमिन K ची तपासणी जरूर करून घ्यावी. 

 

गर्भारपणातील नॉशिया कमी करण्यासाठीही उपयुक्त्गर्भारपणातील पहिले तीन ते चार महिने बहुतांश महिलांना उलटी, मळमळ, चकरा येणे, अन्नावरची वासना उडणे, पदार्थांचे वास येेणे असा त्रास जाणवतो. व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे हे त्रास खूप जास्त जाणवतात. त्यामुळे गर्भवती महिलांनीही व्हिटॅमिन के युक्त आहार घ्यावा. गर्भाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठीही आईच्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन के असणे गरजेेचे आहे. 

 

कशातून मिळते व्हिटॅमिन K- व्हिटॅमिन K योग्य प्रमाणात मिळण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आवर्जून केले पाहिजे. पालक हा व्हिटॅमिन K चा मोठा स्त्राेत आहे. - बीटरूटमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन K असते.- दही किंवा फ्रेश ताकातून देखील व्हिटॅमिन K मिळते.- व्हिटॅमिन K साठी किवी, ॲव्हाकॅडो, डाळिंब, गाजर, कोबी, ब्रोकोली खाल्ले पाहिजे.- हिरवे मटार, लिंबू, बदाम, चिकन, अंडी यातूनही व्हिटॅमिन K मिळते.  

टॅग्स :आरोग्यपौष्टिक आहारफिटनेस टिप्स