Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भाजलेले की भिजवलेले? ९९ टक्के लोकांना माहीत नसते चणे खाण्याची योग्य पद्धत, आयुर्वेद सांगते की....

भाजलेले की भिजवलेले? ९९ टक्के लोकांना माहीत नसते चणे खाण्याची योग्य पद्धत, आयुर्वेद सांगते की....

Soaked Chana Or Roasted Chana : भाजलेले चणे खाल्ल्याने फक्त वजन कमी होत नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:04 AM2024-02-13T11:04:35+5:302024-02-13T11:21:39+5:30

Soaked Chana Or Roasted Chana : भाजलेले चणे खाल्ल्याने फक्त वजन कमी होत नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतात.

Health Which Is More Benefical Soaked Chana Or Roasted Chana Knows Health Benefits | भाजलेले की भिजवलेले? ९९ टक्के लोकांना माहीत नसते चणे खाण्याची योग्य पद्धत, आयुर्वेद सांगते की....

भाजलेले की भिजवलेले? ९९ टक्के लोकांना माहीत नसते चणे खाण्याची योग्य पद्धत, आयुर्वेद सांगते की....

प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी तर कोणी मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी भाजलेल्या चण्याचे सेवन करतो. भाजलेले चणे खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. (Health Which Is More Benefical Soaked Chana Or Roasted Chana) हिवाळ्याच्या (Winter Care Tips) दिवसांत या चण्याचे अधिकाधिक सेवन केले  जाते. भाजलेले चणे खाल्ल्याने फक्त वजन कमी होत नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतात. भाजलेले की भिजवलेले चणे खावेत असा प्रश्न अनेकांना पडतो. आहारतज्ज्ञ शितल  गिरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Soaked Chana Or Roasted Chana)

भिजवलेले की भाजलेले कसे चणे खावेत?

आहारतज्ज्ञ शितल गिरी सांगतात की भाजलेले आणि भिजवलेले दोन्ही चणे तब्येतीसाठी फायदेशीर ठरतात. मोड आलेले चणे खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. भिजवलेल्या चण्यांमध्ये बी-कॉम्पलेक्स असते. यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने मसल्स मजबूत राहतात. पचनक्रिया चांगली राहते. डायबिटीज, थायरॉईडचा  धोका टळतो. जे लोक अंडरवेट आहेत त्यांनी भाजलेले चणे खाऊ नये.

आहारतज्ज्ञांच्यामते नियमित गुळ आणि चणे खाऊन दिवसाची सुरूवात केल्याने मांसपेशी मजबूत राहतात. हे कॉम्बिनेशन्स जिम करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे चयापचन चांगले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. एक्सपर्ट्सच्यामते चणे आणि गुळ खाल्ल्याने गॅस, एसिडीटीच्या समस्या टाळण्यास मदत होते. चण्यांमधील फायबर्स शरीराला पोषण देतात. सॅलेडच्या स्वरूपात कांदा, टोमॅटो घालून तुम्ही चणे खाऊ शकता.

हे सुपर फूड डायजेटिव्ह एंजाईम्स सक्रिय करण्याचे काम करतात. चणे आणि गुळाचे कॉम्बिनेशन मेमरी चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. नियमित  सेवन केल्याने शरीरातील हॉर्मोन सेरोटोनिन वाढते. यामुळे ब्रेन फंक्शन  चांगले राहते आणि ताण-तणाव कमी  होतो. दातांना मजबूती देण्यासाठी चणे फायदेशीर ठरतात फॉस्फरेस दातांना मजबूत ठेवते.

मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल

याव्यतिरिक्त हृदया आरोग्यही चांगले राहतात.  याशिवाय रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. चणे खाल्ल्याने शरीर एर्नजेटिक राहते. चणे खाल्ल्याने शरीरात प्रोटीन्सची कमतरता भरून निघते. चण्यांमधील गुणधर्म रक्त वाढवण्यास मदत करते आणि एनिमिया त्रास होत नाही. 

Web Title: Health Which Is More Benefical Soaked Chana Or Roasted Chana Knows Health Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.