Join us

अंजिर कसे खावेत-भिजवून की सुके? योग्य पद्धत पाहा; शुगर-बी.पी कंट्रोलमध्ये राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:24 IST

Health Which Is More Healthier Soaked Or Dries Figs : अंजिर कोणाला सुके खायला आवडतात तर काहीजण ओले खातात.

अंजिर (Anjeer) एक खूप पौष्टीक आणि फायदेशीर असे फळ आहे. यात व्हिटामीन्स मिनरल्स मोठ्या प्रमाणात असते.  अंजिराचे फळं सुकवून सुकं अंजिर बनवलं जातं. ज्याचा तुम्ही हेल्दी ड्रायफ्रुट्समध्ये समावेश करू शकता. यात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, फायबर्स, एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते यात फायबर्सही असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि गॅसेस होक नाही. अंजिर कोणाला सुके खायला आवडते तर काहीजण ओले खातात. पण अंजिरचे सेवन नेमके कसे करावे ते  समजून घ्यायला हवे. असे केल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतील. (Health Which Is More Healthier Soaked Or Dries Figs)

अंजिर खाण्याचे फायदे

वेबएमडीच्या रिपोर्टनुसार यात  मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. हे फळ खाल्ल्ल्यानं हाय ब्लड प्रेशर, हाय ब्लड शुगरची समस्या नियंत्रणात राहते. बीपी, हार्ट डिसिजचं कारण ठरू शकते आणि पचनक्रियेवरही याचा परिणाम होतो. गॅसेसची समस्या दूर करण्यासाठी अंजिर खाणं फायदेशीर ठरतं, कॅल्शियममुळे हाडं मजबूत राहतात. बोन्स डेंसिटी वाढते. ऑस्टिओपॅरोसिस सारख्या आजारांपासून बचाव होतो. याशिवाय यातील फायबर्समुळे वजनही कमी होते.

जेवताना १ चमचा ही चटणी खा; वजन भराभर कमी होईल-हाडं राहतील बळकट, चटणीची सोपी रेसिपी

प्रत्येकालाच अंजीर खायला आवडतं. कोणी सुकं अंजीर खातं तर कोणी भिजवून खातं.  अंजिर कोणत्या पद्धतीने कसे खावेत ते  समजून घ्यायला हवं. अंजिरमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स असतात आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास बरेच पोषक तत्व मिळतात. अंजिर तुम्ही दूधात भिजवूनही खाऊ शकता.

अंजिर कधी भिजवावेत?

पाणी किंवा दूधात सुके अंजिर घालून रात्रभर तसंच ठेवा. एक ग्लास दूधात किंवा पाण्यात अंजिर भिजवा. रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यानंर रिकाम्या पोटी याचे सेवन करा. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स