भात हे असेच एक कार्बोहायड्रेट्स समृद्ध अन्न आहे, जे जगभरात खाल्ले जाते. भारत, चीन आणि आग्नेय आशियासह काही देशांमध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो. तांदूळ अनेक प्रकारात आणि रंगात येतो. प्रत्येक प्रकारच्या तांदळाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. असे मानले जाते की भातामध्ये कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त फायबर आणि प्रथिने आढळतात. (According to ayurveda doctor know how to cook rice to get more health benefits)
जर आपण भात बनवण्याबद्दल बोललो तर बहुतेक लोकांना दोन प्रकारे भात बनवायला आवडतो. पहिली पद्धत म्हणजे तांदूळ पाण्यात उकळून पाणी काढून टाकणे आणि दुसरी पद्धत म्हणजे पाणी न काढता तांदूळ उकळणे. आता प्रश्न असा आहे की त्याचे सर्वाधिक फायदे मिळवण्यासाठी भात बनवण्याची योग्य पद्धत कोणती? (Healthiest Way To Cook Rice)
आयुर्वेदिक डॉक्टर रेखा राधामणी यांच्या मते तांदूळ हे आयुर्वेदात औषध मानले जाते. तांदूळ हा आयुर्वेदात समाविष्ट केलेला पहिला खाद्यपदार्थ आहे. जो पचायला हलका असतो. पण भाताचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी भात बनवण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी.(How to Cook Perfect Rice)
भात बनवण्याची पहिली पद्धत (What are the four steps to cooking rice)
सर्वप्रथम, तांदूळ वाहत्या पाण्यात धुवावे जोपर्यंत त्यातील घाण निघत नाही. जर तुम्ही रोज भात खात असाल तर सोना मसुरी किंवा आंबे मोहर जातीचा भात खावा. बासमती तांदूळ जड असतो आणि महिन्यातून एकदा किंवा दोनदा खाणे चांगले. काही लोक भात बनवताना चुकीची पद्धत वापरतात आणि ती म्हणजे ते एका भांड्यात पाणी आणि तांदूळ एकत्र शिजवतात. त्याऐवजी आधी भांड्यातलं पाणी उकळून घ्यावं. त्यानंतर त्यात भात टाकावा.
रोज सकाळी १० मिनिटं घरीच करा हा व्यायाम; बाराही महिने निरोगी अन् कायम फिट
तांदूळ धुतल्यानंतर आपण ते एका तासासाठी पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात भिजवावे. आयुर्वेदात असे मानले जाते की कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी तांदूळ किंवा डाळ पाण्यात भिजवल्यास त्याचे पौष्टिक मूल्य वाढते.
रात्री लवकर अन् शांत झोप येण्यासाठी ५ उपाय; पडल्या पडल्यात ढाराढूर झोपाल
भात बनवताना भांडे व्यवस्थित झाकून ठेवा आणि उकळी आल्यावर झाकण काढून भात शिजवा. मध्ये तपासत राहा नाहीतर तांदूळ ओला होऊ शकतो. भात चांगला शिजला असे वाटल्यावर भांड्यातील जास्तीचे पाणी काढून टाका. भात पूर्ण शिजल्यानंतर डाळीबरोबर किंवा आमटीबरोबर याचा आस्वाद घ्या.