Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नाश्त्याला नागलीचा डोसा; पोटभर चवीने खावा असा 'हेल्दी ब्रेकफास्ट' , वेटलॉस स्पेशल

नाश्त्याला नागलीचा डोसा; पोटभर चवीने खावा असा 'हेल्दी ब्रेकफास्ट' , वेटलॉस स्पेशल

आरोग्यदायी गोष्टी म्हणजे बेचव आणि नावडतं काही तरी असणार असं वाटतं. पण नाचणीचा डोसा म्हटल्यावर कपाळावर आठ्या पाडून घेण्याची गरज नाही. कारण हा डोसा इतका चविष्ट आणि कुरकुरीत लागतो की खाणार्‍याला तो आवडतोच. डोशाचे विविध चविष्ट प्रकार आहेत त्यातला नागलीचा डोसा हा एक प्रकार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 04:39 PM2021-09-30T16:39:33+5:302021-09-30T16:47:49+5:30

आरोग्यदायी गोष्टी म्हणजे बेचव आणि नावडतं काही तरी असणार असं वाटतं. पण नाचणीचा डोसा म्हटल्यावर कपाळावर आठ्या पाडून घेण्याची गरज नाही. कारण हा डोसा इतका चविष्ट आणि कुरकुरीत लागतो की खाणार्‍याला तो आवडतोच. डोशाचे विविध चविष्ट प्रकार आहेत त्यातला नागलीचा डोसा हा एक प्रकार आहे.

Healthy and Weight loss special: Ragi dosa is Healthy Breakfast and great start your day | नाश्त्याला नागलीचा डोसा; पोटभर चवीने खावा असा 'हेल्दी ब्रेकफास्ट' , वेटलॉस स्पेशल

नाश्त्याला नागलीचा डोसा; पोटभर चवीने खावा असा 'हेल्दी ब्रेकफास्ट' , वेटलॉस स्पेशल

Highlightsनागलीचा डोसा सकाळच्या नाश्त्यात असला की दिवसची हलकी फुलकी आणि उत्साहवर्धक सुरुवात होते. नागली डोश्यात फायबरचं प्रमाण चांगलं असतं. पचन सुधारण्यास हा डोसा मदत करतो. नागली डोसा ग्लुटेन फ्री आहे. त्यामुळे गव्हातील ग्लुटेनची अँलर्जी असलेल्यांसाठी नागलीचा डोसा हा फायदेशीर ठरतो.

अमूक एक पदार्थ खायलाच हवा कारण की तो आरोग्यदायी आहे, असं म्हटलं की कपाळावर आठ्या पडतात, नाकं मुरडली जातात. कारण आरोग्यदायी गोष्टी म्हणजे ी बेचव आणि नावडतं काही तरी असणार असं वाटतं. पण नाचणीचा डोसा म्हटल्यावर कपाळावर आठ्या पाडून घेण्याची गरज नाही. कारण हा डोसा इतका चविष्ट आणि कुरकुरीत लागतो की खाणार्‍याला तो आवडतोच. डोशाचे विविध चविष्ट प्रकार आहेत त्यातला नागलीचा डोसा हा एक प्रकार आहे.

Image: Google

नागलीचा डोसा चवीआधी ओळखला जातो तो त्याच्या पौष्टिकतेसाठी. कारण नागली डोश्यात फायबरचं प्रमाण चांगलं असतं. पचन सुधारण्यास हा डोसा मदत करतो. सकाळच्या नाश्त्यात वरचेवर नागलीचा डोसा असला की तो हदयाचं आरोग्यही जपतो.अँण्टिऑक्सिडण्ट आणि प्रथिनंयुक्त असलेला नागली डोसा ग्लुटेन फ्री आहे. त्यामुळे गव्हातील ग्लुटेनची अँलर्जी असलेल्यांसाठी नागलीचा डोसा हा फायदेशीर ठरतो. नागलीचा डोसा सकाळच्या नाश्त्यात असला की दिवसची हलकी फुलकी आणि उत्साहवर्धक सुरुवात होते. म्हणूनच नागली डोसा हा आरोग्यदायी समजला जातो. तो चविष्ट कसा करता येतो हे त्याची पाककृती जाणून घेतल्यास समजते. मुळातच नागलीच्या पिठाला एक विशिष्ट चव असते. ती चव डोसा करताना टाकलेल्या इतर घटकांमुळे आणखी वाढते. नागलीचा हा आरोग्यदायी आणि चविष्ट डोसा करायला फार वेळ आणि कष्ट लागत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा डोसा सगळ्यांना आवडू शकतो असा आहे. एकदा करुन तर पाहा!

Image: Google

नागलीचा डोसा करणार कसा?

नागलीचा डोसा करण्यासठी 1 कप नागलीचं पीठ, पाव कप तांदूळ पीठ, पाव कप थोडा जाडसर चिरलेला कांदा, पाव कप दही, 2 हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरे, मीठ आणि कढीपत्ता एवढी सामग्री घ्यावी.

Image: Google

एका खोलगट भांड्यात नागलीचं पीठ, तांदूळ पीठ घ्यावं. ते चांगलं एकत्र करुन घ्यावं. नंतर त्यात चिरलेला कांदा, दही , बारीक चिरलेली मिरची, मीठ आणि दही घालावं. हे आधी पिठात चांगलं मिसळून घ्यावं. नंतर त्यात थोडं पाणी घालून पिठ चांगलं फेटून घ्यावं. पीठ चांगलं फेटल्यानं त्यात गुठळ्या राहात नाही. नंतर हे पीठ झाकून दोन तास बाजूला ठेवावं. दोन तासात पीठ आंबतं. डोसा करण्याआधी एका कढईत थोडं तेल घ्यावं. त्यात मोहरी , जिरे आणि कढीपत्ता घालावा. हा तडका डोशाच्या मिश्रणात घालावा. तडका चांगला मिसळून घ्यावा. एका नॉनस्टिक तव्यवर थोडंसं तेल लावून एका गोल चमच्यानं किंवा वाटीनं मिश्रण तव्यावर टाकून ते गोल पसरुन घ्यावं. डोसा कुरकुरीत होण्यासाठी डोशाचं मिश्रण सगळीकडून चांगलं पसरलं जायला हवं. मध्यम आचेवर डोसा शेकावा. डोशाची एक बाजू शेकली गेली की डोसा तव्यावरुन उतरवावा. हा डोसा दुसर्‍या बाजूने शेकण्याची गरज नसते. हा डोसा सांभार आणि चटणीसोबत खावा.

Web Title: Healthy and Weight loss special: Ragi dosa is Healthy Breakfast and great start your day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.