Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डोळ्यांचा थकवा, सुटलेलं पोट आणि केसांचं आरोग्य- समस्या 3 उत्तर 1 - आहारात हवीच एक गोष्ट

डोळ्यांचा थकवा, सुटलेलं पोट आणि केसांचं आरोग्य- समस्या 3 उत्तर 1 - आहारात हवीच एक गोष्ट

3 Main Benefits of White Onion: सध्या या तिन्ही समस्या अनेक जणांना आहेतच... किंवा तिघांपैकी एक- दोन समस्या प्रत्येकाला जाणवत आहेतच. त्यासाठीच तर बघा हा एक खास उपाय. (Healthy benefits of white onion)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 02:34 PM2022-06-20T14:34:02+5:302022-06-26T18:18:07+5:30

3 Main Benefits of White Onion: सध्या या तिन्ही समस्या अनेक जणांना आहेतच... किंवा तिघांपैकी एक- दोन समस्या प्रत्येकाला जाणवत आहेतच. त्यासाठीच तर बघा हा एक खास उपाय. (Healthy benefits of white onion)

Healthy benefits of white onion, best food to reduce belly fat, eye fatigue and good for healthy hair | डोळ्यांचा थकवा, सुटलेलं पोट आणि केसांचं आरोग्य- समस्या 3 उत्तर 1 - आहारात हवीच एक गोष्ट

डोळ्यांचा थकवा, सुटलेलं पोट आणि केसांचं आरोग्य- समस्या 3 उत्तर 1 - आहारात हवीच एक गोष्ट

Highlightsभरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनाच्या समस्या कमी होतात. चयापचय क्रिया सुधारते आणि त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबीचे थर साचणं कमी होतं.

आजकाल प्रत्येकाचा स्क्रिनटाईम वाढलेला आहे. मग ते ५- ६ वर्षांचं लहान मुल असो किंवा मग सत्तरी गाठलेले आजोबा असाे. कोणी टाईमपास म्हणून तर काेणी गरज आणि काम म्हणून स्क्रिनवर वेळ घालवत असतो. यामुळे साहजिकच डोळ्यांना थकवा (eye fatigue due to screen time) येतो. दुसरं म्हणजे आजकाल बऱ्याच जणांचं काम बैठ्या स्वरुपाचं आहे. यामुळे शारिरीक हालचाली कमी होतात. त्यामुळे पचनाच्या वेगवेगळ्या समस्या जाणवतात आणि मग जाडी वाढणे, पोट सुटणे (how to do belly fat loss) किंवा मग ब्लोटिंग होणे, असा त्रासही होऊ लागतो. तिसरं म्हणजे केस खूप गळणे (hair fall), अकाली पांढरे होणे (gray hair), केसांमधला कोंडा (dandruff), केसांना चमक नसणे, अशा समस्यांचंही प्रमाण वाढलं आहे. म्हणूनच तर सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी या तिन्ही समस्यांसाठी एक साेपा उपाय सांगितला आहे. 

 

ऋजुता दिवेकर सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असतात. लोकल आणि सिझनल फूड घेण्याचं महत्त्व लोकांना पटवून देणं, हा त्यांचा उद्देश असतो. खाण्यात जर व्हरायटी आणली आणि आपल्या भागात मिळणारे सगळे पदार्थ, सगळी फळं खाल्ली तर उत्तम आरोग्य राखता येतं, असं त्यांचं मत. त्यानुसार त्यांनी नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली असून यामध्ये त्यांनी वरील तिन्ही समस्यांवर एक अतिशय सोपा उपाय सुचविला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पांढरा कांदा हा अतिशय गुणकारी असतो. प्रोटीन्सचा सुपर धमाका, राजगिरा क्रंच बार! करायला सोपी-मस्त रेसिपी 

पांढरा कांदा खाल्ल्याने वरील ३ फायदे तर होतातच, पण त्याशिवायही आरोग्याला अनेक लाभ होतात. या पोस्टमध्ये ऋजुता यांनी पांढऱ्या कांद्याची सोप्या पद्धतीने कोशिंबीर कशी करायची, याविषयीही माहिती दिली आहे.

 

पांढरा कांदा खाण्याचे फायदे (Benefits Of White Onion)
- भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनाच्या समस्या कमी होतात. चयापचय क्रिया सुधारते आणि त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबीचे थर साचणं कमी होतं.
- केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी पांढरा कांदा उपयुक्त ठरतो.
- पांढऱ्या कांद्यामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
- पांढऱ्या कांद्याच्या नियमित सेवनामुळे रक्तामध्ये गुठळ्या होत नाहीत. कारण त्यात असणारे सल्फर रक्त पातळ ठेवण्यास मदत करते.
- रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- काही संशोधनानुसार असं सांगण्यात आलं आहे की पांढऱ्या कांद्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारतं आणि शांत झोप लागण्यास मदत होते. 

 

पांढऱ्या कांद्याची कोशिंबीर रेसिपी
साहित्य

पांढरा कांदा, मिरचीचे तुकडे, लिंबू, भाजून कुटलेले शेंगदाणे किंवा काजू, चवीनुसार मीठ, चिमुटभर साखर
रेसिपी
- सगळ्यात आधी कांदा बारीक चिरून घ्या.
- त्यानंतर त्यात थोडंसं लिंबू पिळा.
- मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे टाका.
- शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करा आणि तो टाका. शेंगदाणेऐवजी काजू ही वापरू शकता. 
- यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर टाकून हलवा. कांद्याची कोशिंबीर झाली तयार. एखादा मिनिट ती सेट होऊ द्या आणि लगेचच ताटात वाढून घ्या.
- या कोशिंबिरीमुळे कांदा खाण्याचे फायदे तर मिळतातच, शिवाय शेंगदाणे, लिंबाचा रस यांचेही लाभ होतात. 

 

Web Title: Healthy benefits of white onion, best food to reduce belly fat, eye fatigue and good for healthy hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.