Join us  

बारीक व्हायचंय मग नाश्ता कशाला सोडायचा? नाश्त्याला ८ पदार्थ खा; वजन आपोआप कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 9:20 AM

Breakfast Foods That Help You Lose Weight (Vajan Kami Karnyasathi Tips) : वजन कमी होण्यासाठी सकाळच्या नाश्त्याला काय खाता हे फार महत्वाचं असतं.

वेटलॉस करण्यासाठी लोक जिमला जातात तर काहीजण डाएट फॉलो  करतात तर काहीजण फास्टींगचे वेगवेगळे उपाय  शोधतात. (Weight Loss Breakfast) खरं पाहता वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची काही गरज नाही मेटाबॉलिक रेट योग्य असायला हवा. (Vajan kami karnyasathi kay khave) ज्यामुळे अन्न वेगाने पचण्यास मदत होईल.

काही व्यायाम प्रकार केल्याने मांसपेशी चांगल्या राहतात. वजन कमी होण्यासाठी सकाळच्या नाश्त्याला काय खाता हे फार महत्वाचं असतं. (Healthy Breakfast Recipes to Lose weight) वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्याला काय खाता येईल. त्याचे ऑपश्न्स पाहूया. (Vajan Kami Karnyasathi Tips)

1) ओट्सचा डोसा (Oats Dosa)

ओट्स  नाश्त्याला खाल्ल्याने बराचवेळ भूक लागत नाही. हाय फायबर्सयुक्त ओट्सचा आहारात समावेश करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ओट्स चिला किंवा दूधात भिजवलेले ओट्स खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म वेगानं होतो आणि फॅट्ससपचवण्याची गती सुद्धा वाढते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, ओट्स पाण्यात भिजवून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात काळी मिरी,  जीरं आणि मीठ घालून या मिश्रणाचे डोसे बनवा.

१ महिना भात न खाल्ल्यास शरीरात दिसतील 'हे' बदल, तज्ज्ञ सांगतात भात न खाण्याचे परिणाम

२) मूग डाळीचा डोसा (Moong Dal Dosa)

मूग डाळीचा डोसा वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतो. हाय फायबर्सयुक्त मूगाच्या डाळीचा डोसा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली रहाते. यासाठी रात्रभर मुगाची डाळ  भिजवून ठेवा. सकाळी वाटून घ्या यात कोथिंबीर, कांदा,  गाजर आणि टोमॅटो घालून बारीक करून घ्या. वरून थोडं मीठ, काळी मिरी आणि लाल मिरची पावडर घाला. हिरव्या चटणीबरोबर हा डोसा सर्व्ह करा. 

३) नाचणीचा डोसा (Ragi Dosa)

नाचणीचा डोसा हाय फायबर, प्रोटीन आणि मल्टीन्युट्रिएंट्सनी परिपूर्ण आहे.  ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तुम्ही यात मीठ आणि इतर मसाले घालून  स्टफिंग तयार करू शकता.  यात  तुम्ही इतर भाज्या बारीक करून घालू शकता. वजन कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

दुधापेक्षा दुप्पट कॅल्शियम देतील ८ पदार्थ; प्रोटीन-कॅल्शियम भरभरून मिळेल, हाडं होतील बळकट

४) पोहे (Pohe)

पोह्याचा चिवडा किंवा मऊ कांदेपोहे तुम्ही सकाळच्यावेळी खाऊ शकता. लो-कॅलरीजयुक्त पोहे खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं याशिवाय बराचवेळ भूकही लागत नाही. पोहे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पोह्यात शेंगदाणे, बटाटे घालून तुम्ही खाऊ शकता. जेणेकरून त्यातील पोषण मुल्य वाढतील.

५) फळं(Fruits)

फळं खाण्यासाठी नाश्त्याची ही  वेळ उत्तम ठरते. सकाळच्यावेळी  फळं खाल्ल्यानं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते आणि क्रेव्हिंग्सही कमी होतात.

६) थालीपीठ (Thalipith)

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही नाश्त्याला सर्व धान्यांनी परिपूर्ण थालीपीठाचा समावेश करू शकता. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.

७) दलिया (Daliya)

 दलिया सकाळच्या जेवणात खाल्ल्याने फॅ्टस वाढत नाहीत. हे एक लो कॅलरी  फूड आहे. 

८) स्प्राऊट्स सॅलेड (Sprouts salad)

 मूग, मटकी अशा कडधान्यांचे सॅलेड कांदा टोमॅटो घालून तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता. 

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स