Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट कमीच होत नाहीये? सकाळी नाश्त्याला ५ पदार्थ खा, झरझर घटेल वजन-व्हाल लवकर फिट

पोट कमीच होत नाहीये? सकाळी नाश्त्याला ५ पदार्थ खा, झरझर घटेल वजन-व्हाल लवकर फिट

Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight : रागी,ज्वारी, बाजरी, सातू यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं फायबर्स, प्रोटीन्स यांसारखे पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 01:38 PM2023-07-30T13:38:17+5:302023-07-30T14:04:30+5:30

Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight : रागी,ज्वारी, बाजरी, सातू यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं फायबर्स, प्रोटीन्स यांसारखे पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते.

Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight : Simple Breakfast Ideas for Weight Loss | पोट कमीच होत नाहीये? सकाळी नाश्त्याला ५ पदार्थ खा, झरझर घटेल वजन-व्हाल लवकर फिट

पोट कमीच होत नाहीये? सकाळी नाश्त्याला ५ पदार्थ खा, झरझर घटेल वजन-व्हाल लवकर फिट

वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच डाएटही तितकंच महत्वाचं असतं. तुम्ही जे काही खाता पिता त्याचा परिणाम तुमच्या वजनावर होत असतो.  वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन्स आणि पदार्थ उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही आपल्या आहारात  मल्टीग्रेन पदार्थांचाही समावेश करू शकता. (Health Tips) रागी,ज्वारी, बाजरी, सातू यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं फायबर्स, प्रोटीन्स यांसारखे पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. आपल्या आहारात मल्टीग्रेनपासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करा. काही पदार्थ तुम्ही सहज घरी बनवू शकता. (Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight)

मल्टीग्रेन इडली

इडलीत कमीत कमी कॅलरीज असतात. म्हणून वजन  कमी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.  मल्टीग्रेन इडली  बनवण्यासाठी तुम्ही नाचणी, ज्वारी, बाजरी, गव्हाचा वापर करू शकता. यात मेथीच्या बीयाही मिक्स करा ज्यामुळे डायबिटीस कमी होण्यास मदत होते.

मल्टीग्रेट पराठा

मल्टीग्रेन पराठा खाल्ल्ल्यानं लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.   मल्टीग्रेन पराठा खाल्ल्यानं तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. फक्त तुम्हाला पराठा बनवताना कमीत कमी तेला-तुपाचा वापर करावा लागेल. सोया, रागी, ज्वारी पासून बनवलेल्या पराठ्यात अनेक पोषक घटक असतात.

मल्टीग्रेन चिला

यात नाजणी, ज्वारी, रवा, बेसन यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. वजन कमी करण्यसाठी हा उत्तम पर्याय आहे. हा चिला  खाल्ल्याने तुम्हाला जास्तीत जास्त वेळ  भूक लागणार नाही आणि पोट भरलेलं राहील. यामुळे  तुम्ही एक्स्ट्रा कॅलरीज खाणार नाहीत.

पोहे

जर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला पोहे खात असाल तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटीक वाटतं. पोह्यात कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे  शरीराला अधिकाधिक एनर्जी मिळते. नाश्त्याला पोहे खाल्ल्यानं तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. जर तुम्ही डायबिटीक किंवा BP चे पेशंट असाल तरीही हा पदार्थ नाश्त्याला खाणं फायद्याचं ठरेल.

मोड आलेली कडधान्य

नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्य खाणे देखील फायदेशीर आहे.  तुम्ही मूग, मटकी हरभरे सकाळी उठल्यानंतर खाऊ शकता. हे नियमित खाल्ल्याने शरीराला प्रथिने, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात, जे निरोगी शरीरासाठी आवश्यक मानले जातात.

Web Title: Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight : Simple Breakfast Ideas for Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.