थंडीच्या दिवसांत वजन कमी करणे हा एक मोठा टास्कच असतो. कारण या ऋतूत नेहमीपेक्षा जास्त भूक लागते आणि शरीरात सुस्तपणा अधिक जाणवतो. अशा परिस्थितीत, आहार आणि व्यायामाचे नियम पाळणे थोडे कठीण होते. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्यामुळे आपल्याला अधिक भूक लागते अशावेळी तोंडावर ताबा ठेवला नाही तर वजन वाढीची शक्यता असते. थंडीचे दिवस म्हटलं की, आपल्याला काहीतरी गरमागरम किंवा चटपटीत खावंसं वाटत. वातावरणातील गारव्यामुळे आपण अशा पदार्थांवर अगदी मनसोक्त ताव मारुन तुटून पडतो. त्यामुळे वजन वाढीची समस्या सतावते(Healthy Breakfast Options To Lose Weight In Winter Season).
आपल्याला थंडीच्या दिवसांत वाढलेलं वजन कमी करण्यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागते. परंतु आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये काही आवश्यक ते आरोग्यदायी बदल केले तर वजन कमी करणे अगदी सहज शक्य होऊ शकते. हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या आरोग्याला पोषक आणि पोटभरीचा हेल्दी नाश्ता करणे गरजेचे असते. अशावेळी नेमकं काय खावं सुचत नाही. यंदाच्या हिवाळ्यात जर तुम्ही वजन कमी करणार असाल तर पोटभरीचे पण हेल्दी व पौष्टिक असे कोणते पदार्थ खावेत ते पाहूयात(5 Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight In Winter Season).
हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी नाश्ताला खावेत असे ५ पदार्थ...
१. पराठे :- हिवाळ्यात आपण हेल्दी आणि पौष्टिक पराठे नाश्ताला खाऊ शकता. हिवाळ्यात मुळा, कोबी आणि मेथी अशा अनेक भाज्या ताज्या आणि फ्रेश मिळतात. या सिझनल भाज्या वापरुन आपण हेल्दी आणि पौष्टिक पराठे तयार करू शकता. हिवाळ्यात हेल्दी पराठे खाल्ल्याने फायबर आणि अनेक पौष्टिक खनिजे आपल्या आरोग्याला मिळतात. पराठा खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक लागणार नाही आणि यामुळे इतरवेळी नको ते पदार्थ खाण्याचे प्रमाणही कमी होईल, यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. पराठे करताना ते नॉन-स्टिक पॅनमध्ये किंवा कमी तेलात तयार करावे.
विद्या बालनने केलेलं 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट नेमकं काय? काय खाल्लं म्हणून उतरलं वजन सरसर...
२. टोफू किंवा पनीर भुर्जी :- वजन कमी करण्यासाठी आणि हिवाळ्यात वारंवार भूक लागू नये म्हणून आपण नाश्त्याला टोफू किंवा पनीर भुर्जी खाऊ शकता. टोफू आणि पनीर खाल्ल्याने आपल्या शरीराची रोजची प्रोटीनची गरज भागवली जाते. यामुळे आपले पोट खूप वेळासाठी भरलेले राहते, त्यामुळे हिवाळ्यात वारंवार लागणारी भूक रोखली जाते. टोफू आणि पनीर भुर्जी खाल्ल्याने कार्ब्ससोबतच प्रोटीन आणि फायबर देखील मिळतील. यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाणही वाढणार नाही आणि वजन कमी करण्यात मदत होईल.
३. पालक आणि पनीर चिला :- आपण हिवाळ्यात नाश्ताला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरुन चिला तयार करु शकता. पालकाची प्युरी बेसनच्या पिठात मिसळून कणकेसारखे मळून घ्यावे. त्यात पनीरचे स्टफिंग घालावे. पालक आणि पनीर चिला मधून तुम्हाला प्रोटिन्स आणि आयर्न दोन्ही योग्य प्रमाणात मिळतील. वजन कमी करण्यासोबतच, हिवाळ्यात लागणाऱ्या वारंवार भूकेवर नियंत्रण ठेवले जाईल.
४. नाचणीची इडली :- हिवाळ्यात नाचणी खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरु शकते. या इडलीमध्ये कॅल्शियमसोबतच प्रोटिन्स आणि आवश्यक खनिजे देखील असतात. नाचणीची इडली खाल्ल्याने आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते आणि हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्तीही टिकून राहते. नाश्त्यात आपण दोन ते तीन नाचणीच्या इडल्या खाऊ शकतो.
५. बाजरीचा डोसा :- वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यात बाजरीचा डोसा नाश्त्याला खाणे हा देखील उत्तम पर्याय आहे. यामुळे बाजरीतील सर्व पोषक घटक आपल्या शरीराला मिळतील. बाजरीत असणाऱ्या उष्ण गुणधर्मामुळे हिवाळ्यात बाजरी आवर्जून खाल्ली पाहिजे. हिवाळ्यात बाहेरच्या गारव्यापासून संरक्षण व्हावे यासाठी बाजरी, नाचणी, बार्ली, गहू अशा सर्व धान्यांच्या पीठांचा वापर करुन आपण डोसा तयार करु शकतो. या डोश्यात आपण आपल्या आवडीप्रमाणे चीज आणि भाज्या घालून उत्तपा देखील करु शकता. असे हेल्दी व पौष्टिक डोसे खाल्ल्याने तुम्हाला आवश्यक ते प्रोटीन आणि फायबर दोन्ही मिळतील.
चमचाभर जिरे वाढलेले वजन-पोटाची ढेरी करतील कमी! करा ‘हा’ जादूई उपाय- सोपा आणि असरदार...
हिवाळ्यात असे हेल्दी व पौष्टिक पदार्थ खाऊन तसेच यासोबत थोडा एक्सरसाइज करुन आपण हिवाळ्यात देखील वजन कमी करु शकता.