लठ्ठपणा सध्याच्या जीवनात एक वेगानं वाढणारी समस्या म्हणून उद्यास येत आहे. वेगाने वाढणार्या वजन आणि पोटाच्या चरबीमुळे लाखो लोक त्रस्त आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपला आहार. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते लठ्ठपणा आणि पोटाटी चरबीमुळे केवळ आपले व्यक्तिमत्त्व खराब होत नाही तर अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. व्यस्त जीवनशैली आणि योग्य नाष्ता ही लठ्ठपणाची सर्वात मोठी कारणे आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या न्याहारीवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि अशा पदार्थांकडे दुर्लक्ष करावे लागेल. ज्यामुळे वजन वाढू शकतं.
प्रोसेस्ड फूडपासून लांब राहा
डाएट एक्सपर्ट्स रंजना सिंह त्यांनी सांगितले की तुम्ही नाष्त्याला तळलेले पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तळलेल्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे वजन वेगानं वाढू शकतं. असे पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तेल, मसाल्यांचा वापर केला जातो. चिप्स, पॉपकॉर्न, ड्राई फ्रूट्स, स्नॅक्स, फ्रोजेन फूड्स प्रोसेस फूड या प्रकारात येतात.
मैदायुक्त पदार्थांचे सेवन
सकाळी उठल्यानंतर नाष्ता करताना पौष्टीक आहार घ्या. कारण रात्रभर आपण काहीही खाल्लेलं नसतं त्यामुळे चांगल्या झोपेची गरज असते. अशावेळी मैदायुक्त पदार्थ टाळा. अशा पदार्थांच सेवन केल्यास तुमचे पोट भरेल पण जास्त वेळ उर्जा राहणार नाही. आणि काही वेळानंतर झोप यायला सुरूवात होईल. म्हणून शरीरासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सकाळी सकाळी गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास महागात पडू शकतं. आणि शरीराचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे योग्य आहार घ्या. आणि शरीर उत्साही ठेवा.
पॅक्ड फळांचा रस
फ्रुट ज्यूसमध्ये आर्टिफिशियल फ्लेवर्स असल्यामुळे सोडा आणि साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे कॅलरीज वाढतात. तसंच पचनक्रिया व्यवस्थित राहत नाही. त्यापेक्षा तुम्ही सकाळच्या नाष्त्यासाठी ताजी फळं खाण्याचा प्रयत्न करा.
पॅन केक
अनेकांना सकाळी ऑफिसला गेल्यानंतर पॅनकेक्स, कुकिज, बिस्किट्स खाण्याची सवय असते. यामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे भूक वाढते. तसंच यात ट्रांस फॅट्स असतात. जे आरोग्यासाठी हानीकारक असतात.
नाष्त्याला काय खायला हवं?
डॉ. रंजना सिंह म्हणतात की, ''तुम्ही नाष्त्यामध्ये शक्य तेवढे घरी तयार केलेले पदार्थ खावे. आपल्या नाष्त्यात बाजरी, नाचणी, मका आणि ज्वारीचा समावेश करा. पांढर्या तांदळाऐवजी ब्राऊन तांदूळ खा. नाष्त्यासाठी सर्व डाळींपासून तयार झालेल्या पदार्थांचे सेवन करा. कारण ते आरोग्यासाठी सर्वात चांगले आहे आणि याची चवही चांगली आहे.''