Join us  

बैठी जीवनशैलीमुळे वजन घटेना? दुपारच्या जेवणात खा ४ चमचमीत पदार्थ; खाऊन घटवा वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 10:00 AM

Healthy Lunch Ideas For Weight Loss : लंचमध्ये वजन कमी करण्यासाठी चपाती - भातासोबत हे २ पदार्थ खा..

व्यस्त रुटीनमध्ये स्वतःला फिट ठेवणं हे खरंच आव्हानात्मक आहे (Weight Loss). मुख्य म्हणजे बैठी जीवनशैलीमुळे वेट लॉस करणं कठीण आहे. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते (Lunch Time). सकाळ, दुपार आणि सायंकाळच्या जेवणाव्यतिरिक्त आपण बसल्या बसल्या बऱ्याच गोष्टी खातो. ज्यामुळे वजन वाढते. अनेकदा लोक सकाळी आणि सायंकाळचा डाएट प्लॅन फॉलो करतात, पण दुपारच्या जेवणात हेल्दी पदार्थ खात नाही. किंवा लंच स्किप करतात.

दुपारचे जेवण हे आहाराचा एक मुख्य भाग आहे. लंचमध्ये प्रोटीन, कॅलरी, फायबर, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. लंचमध्ये कोणते पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होते? याची माहिती आहारतज्ज्ञ अर्चना बत्रा यांनी दिली आहे(Healthy Lunch Ideas For Weight Loss).

वजन कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात खा ५ पदार्थ

भाज्या

भाजीपाला हा आपल्या भारतीय जेवणाचा मुख्य भाग आहे. अधिक भाज्या खाल्ल्याने शरीराला पुरेसे पौष्टीक घटक मिळतात. आपण दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता. पालेभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि बी मुबलक प्रमाणात असते. हे पौष्टीक घटक शरीराला मिळाल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

हाडं कमजोर- नजर धूसर झाली? व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे, शरीर देते ४ संकेत

कडधान्य

दुपारच्या जेवणात भाज्यांव्यतिरिक्त कडधान्य खाऊ शकता. कडधान्यांमध्ये प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय कडधान्य सहज पचतात. ज्यामुळे पचनक्रियेत कोणतीही अडचण येत नाही.

राजमा

भातासोबत आपण दुपारच्या राजमा खाऊ शकता. राजमामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, सोडियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे पचनक्रियेत कोणतेही अडथळे येत नाही.

हिरड्यातून रक्त - सतत दात दुखतात? ५ प्रकारच्या भाज्या अजिबात खाऊ नका; दात होतील कमकुवत

चपाती किंवा ब्राऊन राईस

वजन कमी करण्याच्या दरम्यान, बरेच जण चपाती आणि भात खाणं टाळतात. पण आपण दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस आणि चपाती खाऊ शकता. चपातीमध्ये व्हिटॅमिन B1, B2, B3, लोह आणि पोटॅशियम असते. तर, ब्राउन राईसमध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि फॉलिक ॲसिड आढळते. याचे सेवन केल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नहेल्थ टिप्सआरोग्य