मान्सून भजीशिवाय अपूर्ण आहे (Monsoon). बाहेर रिमझिम सरी बरसल्यावर भजी खणायची इच्छा होतेच. बेसनाच्या बॅटरमध्ये कांदा किंवा बटाट्याच्या चकत्या बुडवून आपण भजी तळतो (Weight Loss). पण जर आपण वेट लॉस करीत असाल तर, भजी खाणं योग्य की अयोग्य? असा प्रश्न निर्माण होतो (Fitness). फ्राईड भज्यांमध्ये कितीप्रमाणात कॅलरीज असतात. जर वेट लॉस जर्नीमध्ये भजी खाल्ली तर वेट लॉस होऊ शकते का? भजी खाण्याची इच्छा झाली तर किती प्रमाणात खावी?
या प्रश्नांची उत्तर देताना फिटनेस ट्रेनर सुशील धनावडे सांगतात, ' तळलेली भजी खाताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हवेत. भजी खाताना त्यात किती प्रमाणात कॅलरीज आहेत? हे पाहायला हवे. भज्यांमध्ये कॅलरीज, फॅट्स, कार्ब्स आणि प्रोटीन देखील असते. पण १०० ग्राम भज्यांमध्ये ३०० ते ३५० कॅलरीज असतात. १ ग्राम फॅटमध्ये ९ कॅलरीज असतात. त्यामुळे भजी खाताना आपण दिवभरात किती कॅलरीज इनटेक करता? भजी खाल्ल्याने शरीराला किती फॅट्स मिळत आहे? याचा विचार करूनच भजी खा'(Healthy pakodas that can help in weight loss).
भजी खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
- तळलेल्या भजीऐवजी बेक केलेल्या किंवा स्टीम्ड भजी खा. एअर फ्रायरमध्ये भजी तयार करा.
- भजी तळताना कमी तेलाचा वापर करा.
चहासोबत कधीही खाऊ नका ५ गोष्टी; अपचन वाढेल कारण तब्येतीसाठी ‘हा’ पदार्थ अतिशयक घातक
- भजीसोबत हिरवी चटणी किंवा दही खा.
- एकाच वेळी जास्त भजी खाऊ नका.
- भजी खाल्ल्यावर व्यायाम करा किंवा थोडे चाला.
इतर पर्याय
- भजीऐवजी फळे, भाज्या किंवा नट्स खा.
साऊथ इंडियन पारंपरिक पद्धतीची बटाट्याची भाजी करा फक्त १५ मिनिटांत, चमचमीत इतकी की खातच राहावी!
- हेल्दी स्नॅक्ससाठी घरगुती पॉपकॉर्न किंवा चणा मसाला खा.
- पाणी आणि हर्बल चहा भरपूर प्या.