नाश्ता, ब्रेकफास्ट किंवा डिनरमध्ये चपाती असतेच (Food). उत्तम आरोग्यासाठी चपाती खाण्याचा सल्ला आपल्याला मिळतो. पण फिटनेस फ्रिक लोक चपाती खाणं टाळतात. चपाती खाल्ल्याने वजन वाढते असं काहींचा समज आहे (Cooking Tips). पण जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, कणकेत ३ पदार्थ मिसळून पोळ्या करू शकता.
यामुळे पोळ्याही परफेक्ट बनतील, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. पण गव्हाच्या कणकेत कोणत्या ३ गोष्टी मिसळल्याने आरोग्याला फायदा होईल? यामुळे पोटाची चरबी कमी होऊ शकते का?(Healthy Rotis for Weight Loss; 3 Nutrient Packed Options).
फ्लेक्ससीड पावडर
अळशीच्या बियांमध्ये फायबर आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात. जे वेट लॉससाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यासाठी कणिक मळताना त्यात १ ते २ चमचे अळशीच्या बियांची पावडर घालून मिक्स करा, व त्याच्या पोळ्या तयार करा. पोळ्या पौष्टीक होतील.
वर्ल्ड कप जिंकताच लेकरांना फोन करणारा ' हा ' बाप पाहा, काय सांगता कुटुंबासाठी वेळ नाही..
मेथी दाणे
मेथी दाण्यांमध्ये वेट लॉस करणारे गुणधर्म असतात. त्यात लोह, फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी सारखे पौष्टीक घटक असतात. मेथीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्मही असतात. जे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करण्यास मदत करते. यासाठी रात्रभर पाण्यात मेथी दाणे भिजत ठेवा. सकाळी पेस्ट तयार करून कणकेत मिसळा, आणि पोळ्या तयार करा. यामुळे पचनक्रिया सभूकही कमी होईल.
प्रेमाची ताकद काय असते, विराट आणि अनुष्काला विचारा, त्यांनी आपले नाते कसे जपले - वाचा..
जिरे पावडर
वजन कमी करण्यासाठी आपण जिऱ्याचे पाणी पितो. आपण कणकेतही जिरे पावडर मिसळू शकता. जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यासाठी आपण कणकेत जिरे पावडर मिसळून पोळ्या तयार करू शकता. या पोळ्या खाल्ल्याने वजन नक्कीच घटेल.