दुपारचं जेवण अगदी व्यवस्थित झालं तरीही साधारण ५ वाजेच्या आसपास चहाची तल्लफ लागतेच. चहा- बिस्किट यांचा आस्वाद घेतला तरीही साधारण सहाच्या आसपास पुन्हा काहीतरी हलकं- फुलकं खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय खावं कळत नाही. कारण आपल्याला खूप कमी खायचं असतं. ते खाणं थोडं जरी जास्त झालं तरी त्याचा परिणाम लगेच रात्रीच्या जेवणावर होतो. म्हणून मग बरेच जण संध्याकाळची छोटीशी भूक भागविण्यासाठी कधी एखादं फळ खातात तर कधी चिवडा, लाडू, लाह्या असं काही तोंडात टाकतात. हे तर तुम्ही खा, पण त्याबरोबरच थोडा बदल म्हणून या काही बिया खाऊन पाहा (Healthy Seeds And Nuts For Snacking). अगदी चमचाभर या बिया खाल्ल्या तरी त्यातून बरीच एनर्जी मिळेल. शिवाय आरोग्याला अनेक फायदेही होतील.(benefits of eating nuts and seeds)
आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरणाऱ्या बिया..
तब्येतीच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या बिया अतिशय उपयुक्त ठरतात. एरवी त्या एवढ्याशा असतात म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्या बिया म्हणजे खऱ्या अर्थाने शरीरासाठी पोषक असणाऱ्या घटकांचे पॉवर हाऊस आहेत. त्या बिया नेमक्या कोणत्या आणि त्यातून आरोग्याला काय काय लाभ होतात याची माहिती डाएट एक्सपर्ट मॅक्झिम याँग यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.
Diwali : मोत्याचा तनमणी ते चिंचपेटी, पाहा पारंपरिक ते आधुनिक सुंदर मोत्याचे दागिने-दिवाळीतला खास साज
१. त्यापैकी पहिल्या आहेत भोपळ्याच्या बिया. या बिया जर तुम्ही २ ते ३ टेबलस्पून खाल्ल्या तर त्यातून भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आणि प्रोटीन्स मिळतात. रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी, हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात. मूड चांगला ठेवण्यासाठी आणि रात्री शांत झोप येण्यासाठी आवश्यक असणारे tryptophan, serotonin आणि melatonin हे घटकही त्यात चांगल्या प्रमाणात असतात.
२. सुर्यफुलाच्या बियांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असतात. याशिवाय त्यातून योग्य प्रमाणात फायबर, हेल्दी फॅट्स मिळतात. त्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्राॅल नियंत्रित राहण्यास मदत होते.
दिवाळीसाठी 'अशी' सजवा तुमच्या फ्लॅटची बाल्कनी, छोट्याशा जागेत आकर्षक सजावट करण्यासाठी ७ टिप्स
३. अनेक जण टरबूज खाताना त्यातल्या बिया काढून टाकतात. पण खरतर या बिया अतिशय पौष्टिक असतात. त्यांच्यामध्ये प्रोटीन्स, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, झिंक हे घटक चांगल्या प्रमाणात असतात. या बिया जर तुम्ही भाजून खाल्त्या तर अधिक उत्तम.
४. जवस देखील अतिशय पौष्टिक असतात. त्यांच्यातून ओमेगा ३ फॅटी ॲसिड योग्य प्रमाणात मिळते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. शिवाय त्यातून चांगल्या प्रमाणात फायबर मिळतात, जे पचनासाठी उपयुक्त ठरतात.