Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दिवाळीत खाणं खूप झाल्यानं अपचनाचा त्रास- ॲसिडिटी वाढली, तर हा घ्या इन्स्टंट काढा- हाताशी ठेवा रेसिपी

दिवाळीत खाणं खूप झाल्यानं अपचनाचा त्रास- ॲसिडिटी वाढली, तर हा घ्या इन्स्टंट काढा- हाताशी ठेवा रेसिपी

Simple Recipe for Herbal Tea: दिवाळीत खूप हेवी खाणं झाल्याने अपचन, ॲसिडीटी, डोकेदुखी, नॉशिया असा काही त्रास झाला, तर लगेचच हा काढा घेऊन टाका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 08:02 AM2022-10-22T08:02:04+5:302022-10-22T08:05:01+5:30

Simple Recipe for Herbal Tea: दिवाळीत खूप हेवी खाणं झाल्याने अपचन, ॲसिडीटी, डोकेदुखी, नॉशिया असा काही त्रास झाला, तर लगेचच हा काढा घेऊन टाका.

Herbal tea or kadha for acidity, indigestion, How to control migraine pain? | दिवाळीत खाणं खूप झाल्यानं अपचनाचा त्रास- ॲसिडिटी वाढली, तर हा घ्या इन्स्टंट काढा- हाताशी ठेवा रेसिपी

दिवाळीत खाणं खूप झाल्यानं अपचनाचा त्रास- ॲसिडिटी वाढली, तर हा घ्या इन्स्टंट काढा- हाताशी ठेवा रेसिपी

Highlightsॲसिडिटी, मायग्रेन, नॉशिया, डोकेदुखी, पीसीओएस, हायपरटेन्शन, हाय कोलेस्टरॉल अशा सगळ्या समस्या कमी करण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरतो.

दिवाळीत फराळाचे पदार्थ तर गोड- तेलकट- तुपकट असतातच, पण या काळात जेवणाचा बेतही चांगलाच हेवी असतो. घरी पाहूणे येणार असल्याने किंवा आपण कुणाच्या तरी घरी पाहूणे म्हणून जाणार असल्याने सगळा स्वयंपाक साग्रसंगीत केलेला असतो. एकतर जेवणातले जड- मसालेदार पदार्थ आणि दुसरं म्हणजे दिवाळीचा फराळ, असा सगळाच जड- जड बेत झाल्याने बऱ्याच जणांना ॲसिडिटी, अपचन, डोकेदुखी, खाद्यपदार्थांचा नॉशिया येणं, असे त्रास होतात. असा काही त्रास दिवाळीत जाणवलाच, तर हा सगळा त्रास कमी करणारा हा इन्स्टंट काढा कसा करायचा ते बघून ठेवा.

 

कसा करायचा काढा?
१. ही रेसिपी डॉ. दिक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

२. काढा तयार करण्यासाठी आपल्याला १ ग्लास म्हणजेच साधारणपणे ३०० मिली पाणी, कढीपत्त्याची १५ पाने, पुदिन्याची १५ पाने, १ टेबलस्पून बडिशेपाची दाणे, २ टेबलस्पून धने हे सामान लागणार आहे. 

३. पातेल्यात पाणी घ्या आणि गॅसवर उकळायला ठेवा. पाण्यात वरील सर्व साहित्य टाका आणि ५ ते ७ मिनिटे पाणी मध्यम आचेवर उकळू द्या. गरमागरम काढा झाला तयार.  

४. रोज सकाळी चहा- कॉफी पिऊन दिवसाची सुरुवात करण्याऐवजी हा हर्बल टी घेणं कधीही उत्तम.

 

काढा पिण्याचे फायदे
१. ॲसिडिटी, मायग्रेन, नॉशिया, डोकेदुखी, पीसीओएस, हायपरटेन्शन, हाय कोलेस्टरॉल अशा सगळ्या समस्या कमी करण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरतो.

२. वारंवार पोटदुखीचा त्रास होत असेल, तरी काही दिवस हा काढा पिऊन बघावा.

३. पित्त किंवा वात दोषाचा त्रास होत असल्यास हा काढा घ्या, त्रास कमी होईल.

४. गॅसेस आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. 
 

Web Title: Herbal tea or kadha for acidity, indigestion, How to control migraine pain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.